2 ULB येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते. BSB BSB: and Jesus and His disciples had also been invited to the wedding.
3 ULB मग द्राक्षारस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” BSB BSB: When the wine ran out, Jesus’ mother said to Him, “They have no more wine.”
4 ULB येशू तिला म्हणाला, “बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.” BSB BSB: “Woman, what is that to you and to Me?” Jesus replied. “My hour has not yet come.”
6 ULB तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. BSB BSB: Now six stone water jars had been set there for the Jewish rites of purification. Each could hold from twenty to thirty gallons.
7 ULB येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. BSB BSB: Jesus told the servants, “Fill the jars with water.” So they filled them to the brim.
8 ULB मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले. BSB BSB: “Now draw some out,” He said, “and take it to the master of the banquet.” They did so,
9 ULB द्राक्षारस बनलेले पाणी? भोजनकारभार्याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, (पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते) तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून, BSB BSB: and the master of the banquet tasted the water that had been turned into wine. He did not know where it was from, but the servants who had drawn the water knew. Then he called the bridegroom aside
10 ULB त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.” BSB BSB: and said, “Everyone serves the fine wine first, and then the cheap wine after the guests are drunk. But you have saved the fine wine until now!”
11 ULB येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. BSB BSB: Jesus performed this, the first of His signs, at Cana in Galilee. He thus revealed His glory, and His disciples believed in Him.
12 ULB त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत. BSB BSB: After this, He went down to Capernaum with His mother and brothers and His disciples, and they stayed there a few days.
13 ULB मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरुशलेम शहरास वर गेला. BSB BSB: When the Jewish Passover was near, Jesus went up to Jerusalem.
14 ULB आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले. BSB BSB: In the temple courts He found men selling cattle, sheep, and doves, and money changers seated at their tables.
15 ULB तेव्हा त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले. BSB BSB: So He made a whip out of cords and drove all from the temple courts, both sheep and cattle. He poured out the coins of the money changers and overturned their tables.
16 ULB व त्याने कबुतरे विकणार्यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” BSB BSB: To those selling doves He said, “Get these out of here! How dare you turn My Father’s house into a marketplace!”
17 ULB तेव्हा ‘तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. BSB BSB: His disciples remembered that it is written: “Zeal for Your house will consume Me.”
18 ULB त्यावरून यहूदी त्यास म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हास तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?” BSB BSB: On account of this, the Jews demanded, “What sign can You show us to prove Your authority to do these things?”
19 ULB येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.” BSB BSB: Jesus answered, “Destroy this temple, and in three days I will raise it up again.”
20 ULB यावरुन यहूदी अधिकारी म्हणाले, “परमेश्वराचे हे भवन बांधण्यास शेहचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?” BSB BSB: “This temple took forty-six years to build,” the Jews replied, “and You are going to raise it up in three days?”
21 ULB तो तर आपल्या शरीररूपी भवनाविषयी बोलला होता. BSB BSB: But Jesus was speaking about the temple of His body.
22 ULB म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला. BSB BSB: After He was raised from the dead, His disciples remembered that He had said this. Then they believed the Scripture and the word that Jesus had spoken.
23 ULB आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरुशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. BSB BSB: While He was in Jerusalem at the Passover Feast, many people saw the signs He was doing and believed in His name.
24 ULB असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्यास स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता. BSB BSB: But Jesus did not entrust Himself to them, for He knew them all.
25 ULB शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्यास गरज नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे तो ओळखीत होता. BSB BSB: He did not need any testimony about man, for He knew what was in a man.