1 ULB मग येशू वल्हांडणाच्या सहा दिवस आधी बेथानीस आला आणि ज्या लाजराला येशूने मरण पावलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. BSB BSB: Six days before the Passover, Jesus came to Bethany, the hometown of Lazarus, whom He had raised from the dead.
2 ULB म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले आणि मार्था वाढीत होती. पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यात लाजर हा एक होता. BSB BSB: So they hosted a dinner for Jesus there. Martha served, and Lazarus was among those reclining at the table with Him.
3 ULB तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले. BSB BSB: Then Mary took about a pint of expensive perfume, made of pure nard, and she anointed Jesus’ feet and wiped them with her hair. And the house was filled with the fragrance of the perfume.
4 ULB तेव्हा, त्याच्या शिष्यांतला एक, त्यास धरून देणार होता तो यहूदा इस्कार्योत म्हणाला, BSB BSB: But one of His disciples, Judas Iscariot, who was going to betray Him, asked,
5 ULB “हे सुवासिक तेल तीनशे चांदीच्या नाण्यांस विकून ते गरीबास का दिले नाही?” BSB BSB: “Why wasn’t this perfume sold for three hundred denarii and the money given to the poor?”
6 ULB त्यास गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला. BSB BSB: Judas did not say this because he cared about the poor, but because he was a thief. As keeper of the money bag, he used to take from what was put into it.
7 ULB यावरुन येशूने म्हटले, “तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे. BSB BSB: “Leave her alone,” Jesus replied. “She has kept this perfume in preparation for the day of My burial.
8 ULB कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही.” BSB BSB: The poor you will always have with you, but you will not always have Me.”
9 ULB तो तेथे आहे असे यहूद्यातील पुष्कळ लोकांस कळले आणि केवळ येशूकरता नाही, तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले. BSB BSB: Meanwhile a large crowd of Jews learned that Jesus was there. And they came not only because of Him, but also to see Lazarus, whom He had raised from the dead.
10 ULB पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला. BSB BSB: So the chief priests made plans to kill Lazarus as well,
11 ULB कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. BSB BSB: for on account of him many of the Jews were deserting them and believing in Jesus.
12 ULB दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेम शहरास येत आहे असे ऐकून, BSB BSB: The next day the great crowd that had come to the feast heard that Jesus was coming to Jerusalem.
13 ULB खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!” धन्यवादित असो. BSB BSB: They took palm branches and went out to meet Him, shouting: “Hosanna!” “Blessed is He who comes in the name of the Lord!” “Blessed is the King of Israel!”
14 ULB आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला. BSB BSB: Finding a young donkey, Jesus sat on it, as it is written:
15 ULB ‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. BSB BSB: “Do not be afraid, O Daughter of Zion. See, your King is coming, seated on the colt of a donkey.”
16 ULB या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर, त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते. BSB BSB: At first His disciples did not understand these things, but after Jesus was glorified they remembered what had been done to Him, and they realized that these very things had also been written about Him.
17 ULB त्याने लाजराला कबरेतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली. BSB BSB: Meanwhile, many people who had been with Jesus when He called Lazarus from the tomb and raised him from the dead continued to testify.
18 ULB त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्यास भेटावयास गेले. BSB BSB: That is also why the crowd went out to meet Him, because they heard that He had performed this sign.
19 ULB मग परूशी एकमेकांस म्हणाले, “तुमचे काहीच चालत नाही, हे तुम्ही पाहता; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.” BSB BSB: Then the Pharisees said to one another, “You can see that this is doing you no good. Look how the whole world has gone after Him!”
20 ULB सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते. BSB BSB: Now there were some Greeks among those who went up to worship at the feast.
21 ULB त्यांनी गालील प्रांतातील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंती केली की, “साहेब, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.” BSB BSB: They came to Philip, who was from Bethsaida in Galilee, and requested of him, “Sir, we want to see Jesus.”
22 ULB फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; अंद्रिया व फिलिप्प यांनी येऊन येशूला सांगितले. BSB BSB: Philip relayed this appeal to Andrew, and both of them went and told Jesus.
23 ULB येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. BSB BSB: But Jesus replied, “The hour has come for the Son of Man to be glorified.
24 ULB मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो. BSB BSB: Truly, truly, I tell you, unless a kernel of wheat falls to the ground and dies, it remains only a seed. But if it dies, it bears much fruit.
26 ULB जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील. BSB BSB: If anyone serves Me, he must follow Me; and where I am, My servant will be as well. If anyone serves Me, the Father will honor him.
27 ULB आता माझा जीव अस्वस्थ होत आहे आणि मी काय बोलू? हे पित्या, तू या घटकेपासून माझे रक्षण कर. पण मी या कारणासाठीच या घटकेत आलो आहे. BSB BSB: Now My soul is troubled, and what shall I say? ‘Father, save Me from this hour’? No, it is for this purpose that I have come to this hour.
28 ULB हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर” तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.” BSB BSB: Father, glorify Your name!” Then a voice came from heaven: “I have glorified it, and I will glorify it again.”
29 ULB तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याशी देवदूत बोलला.” BSB BSB: The crowd standing there heard it and said that it had thundered. Others said that an angel had spoken to Him.
30 ULB येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे. BSB BSB: In response, Jesus said, “This voice was not for My benefit, but yours.
31 ULB आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल. BSB BSB: Now judgment is upon this world; now the prince of this world will be cast out.
32 ULB आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.” BSB BSB: And I, when I am lifted up from the earth, will draw everyone to Myself.”
33 ULB तो तर आपण कोणत्या मरणाने मरणार पाहिजे हे सुचविण्याकरिता हे बोलला. BSB BSB: He said this to indicate the kind of death He was going to die.
34 ULB लोकांनी त्यास विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?” BSB BSB: The crowd replied, “We have heard from the Law that the Christ will remain forever. So how can You say that the Son of Man must be lifted up? Who is this Son of Man?”
35 ULB यावरुन येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हास प्रकाश आहे तोपर्यंत चाला; यासाठी, अंधकाराने तुम्हास गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्यास आपण कोठे जातो हे कळत नाही. BSB BSB: Then Jesus told them, “For a little while longer, the Light will be among you. Walk while you have the Light, so that darkness will not overtake you. The one who walks in the darkness does not know where he is going.
36 ULB तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. BSB BSB: While you have the Light, believe in the Light, so that you may become sons of light.” After Jesus had spoken these things, He went away and was hidden from them.
37 ULB त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; BSB BSB: Although Jesus had performed so many signs in their presence, they still did not believe in Him.
38 ULB हे यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः ‘प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?’ BSB BSB: This was to fulfill the word of Isaiah the prophet: “Lord, who has believed our message? And to whom has the arm of the Lord been revealed?”
39 ULB म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही; या कारणाने यशया पुन्हा म्हणाला, BSB BSB: For this reason they were unable to believe. For again, Isaiah says:
40 ULB ‘त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे.’ BSB BSB: “He has blinded their eyes and hardened their hearts, so that they cannot see with their eyes, and understand with their hearts, and turn, and I would heal them.”
41 ULB यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला. BSB BSB: Isaiah said these things because he saw Jesus’ glory and spoke about Him.
42 ULB तरी यहूदी अधिकार्यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते. BSB BSB: Nevertheless, many of the leaders believed in Him. But because of the Pharisees they did not confess Him, for fear that they would be put out of the synagogue.
43 ULB कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले. BSB BSB: For they loved praise from men more than praise from God.
44 ULB आणि येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो. BSB BSB: Then Jesus cried out, “Whoever believes in Me does not believe in Me alone, but in the One who sent Me.
45 ULB आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्यास पाहतो. BSB BSB: And whoever sees Me sees the One who sent Me.
46 ULB जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. BSB BSB: I have come into the world as a light, so that no one who believes in Me should remain in darkness.
47 ULB कोणी जर माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर मी जगाचे तारण करायला आलो आहे. BSB BSB: As for anyone who hears My words and does not keep them, I do not judge him. For I have not come to judge the world, but to save the world.
48 ULB जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील. BSB BSB: There is a judge for the one who rejects Me and does not receive My words: The word that I have spoken will judge him on the last day.
49 ULB कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. BSB BSB: I have not spoken on My own, but the Father who sent Me has commanded Me what to say and how to say it.
50 ULB त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.” BSB BSB: And I know that His command leads to eternal life. So I speak exactly what the Father has told Me to say.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.