1 ULB ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत. शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो, पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु:खी करतो. BSB BSB: The proverbs of Solomon: A wise son brings joy to his father, but a foolish son grief to his mother.
2 ULB दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते. BSB BSB: Ill-gotten treasures profit nothing, but righteousness brings deliverance from death.
3 ULB परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो. BSB BSB: The LORD does not let the righteous go hungry, but He denies the craving of the wicked.
4 ULB आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात. पण उद्योग्याचा हात संपत्ती मिळवतो. BSB BSB: Idle hands make one poor, but diligent hands bring wealth.
5 ULB उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे, परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे. BSB BSB: He who gathers in summer is a wise son, but he who sleeps during harvest is a disgraceful son.
6 ULB नितीमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, पण बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो. BSB BSB: Blessings are on the head of the righteous, but the mouth of the wicked conceals violence.
7 ULB नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते; पण वाईट करणाऱ्याचे नाव नष्ट होते. BSB BSB: The memory of the righteous is a blessing, but the name of the wicked will rot.
8 ULB जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते. BSB BSB: A wise heart will receive commandments, but foolish lips will come to ruin.
9 ULB जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो, परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल. BSB BSB: He who walks in integrity walks securely, but he who perverts his ways will be found out.
10 ULB जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, बडबड्या मूर्खाची अधोगती होते. BSB BSB: He who winks the eye causes grief, and foolish lips will come to ruin.
11 ULB नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो. BSB BSB: The mouth of the righteous is a fountain of life, but the mouth of the wicked conceals violence.
12 ULB द्वेष भांडण उत्पन्न करतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते. BSB BSB: Hatred stirs up dissension, but love covers all transgressions.
13 ULB विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे. BSB BSB: Wisdom is found on the lips of the discerning, but a rod is for the back of him who lacks judgment.
14 ULB शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात, परंतु मूर्खाचे मुख म्हणजे अरिष्ट जवळ आणते. BSB BSB: The wise store up knowledge, but the mouth of the fool invites destruction.
15 ULB श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे; गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो. BSB BSB: The wealth of the rich man is his fortified city, but poverty is the ruin of the poor.
16 ULB नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे; दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे. BSB BSB: The labor of the righteous leads to life, but the gain of the wicked brings punishment.
17 ULB जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे, पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो. BSB BSB: Whoever heeds instruction is on the path to life, but he who ignores reproof goes astray.
18 ULB जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे. BSB BSB: The one who conceals hatred has lying lips, and whoever spreads slander is a fool.
19 ULB जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही, परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे. BSB BSB: When words are many, sin is unavoidable, but he who restrains his lips is wise.
20 ULB जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे; पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे. BSB BSB: The tongue of the righteous is choice silver, but the heart of the wicked has little worth.
21 ULB नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो. BSB BSB: The lips of the righteous feed many, but fools die for lack of judgment.
22 ULB परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही. BSB BSB: The blessing of the LORD enriches, and He adds no sorrow to it.
23 ULB दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे. BSB BSB: The fool delights in shameful conduct, but a man of understanding has wisdom.
24 ULB दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल. BSB BSB: What the wicked man dreads will overtake him, but the desire of the righteous will be granted.
25 ULB दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे. BSB BSB: When the whirlwind passes, the wicked are no more, but the righteous are secure forever.
26 ULB जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे. BSB BSB: Like vinegar to the teeth and smoke to the eyes, so is the slacker to those who send him.
27 ULB परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील. BSB BSB: The fear of the LORD prolongs life, but the years of the wicked will be cut short.
28 ULB नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील. BSB BSB: The hope of the righteous is joy, but the expectations of the wicked will perish.
29 ULB जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील, दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे. BSB BSB: The way of the LORD is a refuge to the upright, but destruction awaits those who do evil.
30 ULB नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत. BSB BSB: The righteous will never be shaken, but the wicked will not inhabit the land.
31 ULB नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते, पण कपटी जीभ कापली जाईल. BSB BSB: The mouth of the righteous brings forth wisdom, but a perverse tongue will be cut out.
32 ULB नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते, पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते. BSB BSB: The lips of the righteous know what is fitting, but the mouth of the wicked is perverse.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.