1 ULB मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. BSB BSB: The plans of the heart belong to man, but the reply of the tongue is from the LORD.
2 ULB मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. BSB BSB: All a man’s ways are pure in his own eyes, but his motives are weighed out by the LORD.
3 ULB आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील. BSB BSB: Commit your works to the LORD and your plans will be achieved.
4 ULB परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. BSB BSB: The LORD has made everything for His purpose—even the wicked for the day of disaster.
5 ULB प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. BSB BSB: Everyone who is proud in heart is detestable to the LORD; be assured that he will not go unpunished.
6 ULB कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील. BSB BSB: By loving devotion and faithfulness iniquity is atoned for, and by the fear of the LORD one turns aside from evil.
7 ULB मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो. BSB BSB: When a man’s ways please the LORD, He makes even the man’s enemies live at peace with him.
8 ULB अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा, न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे. BSB BSB: Better a little with righteousness than great gain with injustice.
9 ULB मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो. BSB BSB: A man’s heart plans his course, but the LORD determines his steps.
10 ULB दैवी निर्णय राजाच्या ओठात असतात, न्याय करताना त्याच्या मुखाने कपटाने बोलू नये. BSB BSB: A divine verdict is on the lips of a king; his mouth must not betray justice.
11 ULB परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते; पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे. BSB BSB: Honest scales and balances are from the LORD; all the weights in the bag are His concern.
12 ULB जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते. BSB BSB: Wicked behavior is detestable for kings, for a throne is established through righteousness.
13 ULB नीतिमत्तेने बोलणाऱ्या ओठाने राजाला आनंद होतो, आणि जे कोणी सरळ बोलतात ते त्यास प्रिय आहेत. BSB BSB: Righteous lips are a king’s delight, and he who speaks honestly is beloved.
14 ULB राजाचा क्रोध मृत्यू दूतांसारखा आहे. पण सुज्ञ मनुष्य त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. BSB BSB: The wrath of a king is a messenger of death, but a wise man will pacify it.
15 ULB राजाच्या मुखतेजात जीवन आहे, आणि त्याचा अनुग्रह शेवटल्या पावसाच्या मेघासारखा आहे. BSB BSB: When a king’s face brightens, there is life; his favor is like a rain cloud in spring.
16 ULB सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे. रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा. BSB BSB: How much better to acquire wisdom than gold! To gain understanding is more desirable than silver.
17 ULB दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे, जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो. BSB BSB: The highway of the upright leads away from evil; he who guards his way protects his life.
18 ULB नाशापूर्वी गर्व येतो, आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे. BSB BSB: Pride goes before destruction, and a haughty spirit before a fall.
19 ULB गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर विनम्र असणे चांगले. BSB BSB: It is better to be lowly in spirit among the humble than to divide the spoil with the proud.
20 ULB जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो. BSB BSB: Whoever heeds instruction will find success, and blessed is he who trusts in the LORD.
21 ULB जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते. BSB BSB: The wise in heart are called discerning, and pleasant speech promotes instruction.
22 ULB ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे. BSB BSB: Understanding is a fountain of life to its possessor, but the discipline of fools is folly.
23 ULB सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; आणि त्याच्या वाणित विद्येची भर घालते. BSB BSB: The heart of the wise man instructs his mouth and adds persuasiveness to his lips.
24 ULB आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत. BSB BSB: Pleasant words are a honeycomb, sweet to the soul and healing to the bones.
25 ULB मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे. BSB BSB: There is a way that seems right to a man, but its end is the way of death.
26 ULB कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते; त्याची भूक त्यास ते करायला लावते. BSB BSB: A worker’s appetite works for him because his hunger drives him onward.
27 ULB नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे. BSB BSB: A worthless man digs up evil, and his speech is like a scorching fire.
28 ULB कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो. BSB BSB: A perverse man spreads dissension, and a gossip divides close friends.
29 ULB जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो. BSB BSB: A violent man entices his neighbor and leads him down a path that is not good.
30 ULB जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो. BSB BSB: He who winks his eye devises perversity; he who purses his lips is bent on evil.
31 ULB पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो. BSB BSB: Gray hair is a crown of glory; it is attained along the path of righteousness.
32 ULB ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे. BSB BSB: He who is slow to anger is better than a warrior, and he who controls his temper is greater than one who captures a city.
33 ULB पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे. BSB BSB: The lot is cast into the lap, but its every decision is from the LORD.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.