1 ULB शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो. BSB BSB: A gentle answer turns away wrath, but a harsh word stirs up anger.
2 ULB सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते. BSB BSB: The tongue of the wise commends knowledge, but the mouth of the fool spouts folly.
3 ULB परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात. BSB BSB: The eyes of the LORD are in every place, observing the evil and the good.
4 ULB आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे. BSB BSB: A soothing tongue is a tree of life, but a perverse tongue crushes the spirit.
5 ULB मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो, पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो. BSB BSB: A fool rejects his father’s discipline, but whoever heeds correction is prudent.
6 ULB नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते. BSB BSB: The house of the righteous has great treasure, but the income of the wicked is trouble.
7 ULB ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते, पण मूर्खाचे हृदय असे नाही. BSB BSB: The lips of the wise spread knowledge, but not so the hearts of fools.
8 ULB दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे. BSB BSB: The sacrifice of the wicked is detestable to the LORD, but the prayer of the upright is His delight.
9 ULB दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतिचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो. BSB BSB: The LORD detests the way of the wicked, but He loves those who pursue righteousness.
10 ULB जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे, आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल. BSB BSB: Discipline is harsh for him who leaves the path; he who hates correction will die.
11 ULB अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत? BSB BSB: Sheol and Abaddon lie open before the LORD—how much more the hearts of men!
12 ULB निंदकाला शिक्षेची चीड येते; तो सुज्ञाकडे जात नाही. BSB BSB: A mocker does not love to be reproved, nor will he consult the wise.
13 ULB आनंदी हृदय मुख आनंदित करते, पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो. BSB BSB: A joyful heart makes a cheerful countenance, but sorrow of the heart crushes the spirit.
14 ULB बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते, पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते. BSB BSB: A discerning heart seeks knowledge, but the mouth of a fool feeds on folly.
15 ULB जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात, पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे. BSB BSB: All the days of the oppressed are bad, but a cheerful heart has a continual feast.
16 ULB पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे. BSB BSB: Better a little with the fear of the LORD than great treasure with turmoil.
17 ULB पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा, जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे. BSB BSB: Better a dish of vegetables where there is love than a fattened ox with hatred.
18 ULB रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो. BSB BSB: A hot-tempered man stirs up strife, but he who is slow to anger calms dispute.
19 ULB आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते. BSB BSB: The way of the slacker is like a hedge of thorns, but the path of the upright is a highway.
20 ULB शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो. BSB BSB: A wise son brings joy to his father, but a foolish man despises his mother.
21 ULB बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो. पण जो समंजस आहे तो सरळ मार्गाने जातो. BSB BSB: Folly is joy to one who lacks judgment, but a man of understanding walks a straight path.
22 ULB जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात, पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात. BSB BSB: Plans fail for lack of counsel, but with many advisers they succeed.
23 ULB मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो; आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे! BSB BSB: A man takes joy in a fitting reply—and how good is a timely word!
24 ULB सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. BSB BSB: The path of life leads upward for the wise, that he may avoid going down to Sheol.
25 ULB परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो. BSB BSB: The LORD tears down the house of the proud, but He protects the boundaries of the widow.
26 ULB परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत. BSB BSB: The LORD detests the thoughts of the wicked, but the words of the pure are pleasant to Him.
27 ULB चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो, पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल. BSB BSB: He who is greedy for unjust gain brings trouble on his household, but he who hates bribes will live.
28 ULB नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते. BSB BSB: The heart of the righteous ponders how to answer, but the mouth of the wicked blurts out evil.
29 ULB परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो. BSB BSB: The LORD is far from the wicked, but He hears the prayer of the righteous.
30 ULB नेत्राचा प्रकाश अंतःकरणाला आनंद देतो, आणि चांगली बातमी शरीराला निरोगी आहे. BSB BSB: The light of the eyes cheers the heart, and good news nourishes the bones.
31 ULB जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल. BSB BSB: He who listens to life-giving reproof will dwell among the wise.
32 ULB जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो, परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. BSB BSB: He who ignores discipline despises himself, but whoever heeds correction gains understanding.
33 ULB परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते. BSB BSB: The fear of the LORD is the instruction of wisdom, and humility comes before honor.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.