1 ULB राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; तो त्यास वाटेल तेथे वळवतो. BSB BSB: The king’s heart is a waterway in the hand of the LORD; He directs it where He pleases.
2 ULB प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात, परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो. BSB BSB: All a man’s ways seem right to him, but the LORD weighs the heart.
3 ULB योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा परमेश्वरास अधिक मान्य आहेत. BSB BSB: To do righteousness and justice is more desirable to the LORD than sacrifice.
4 ULB घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात. BSB BSB: Haughty eyes and a proud heart—the guides of the wicked—are sin.
5 ULB परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो. BSB BSB: The plans of the diligent bring plenty, as surely as haste leads to poverty.
6 ULB लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते. BSB BSB: Making a fortune by a lying tongue is a vanishing mist, a deadly pursuit.
7 ULB दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात. BSB BSB: The violence of the wicked will sweep them away because they refuse to do what is just.
8 ULB अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो. BSB BSB: The way of a guilty man is crooked, but the conduct of the innocent is upright.
9 ULB भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले. BSB BSB: Better to live on a corner of the roof than to share a house with a quarrelsome wife.
10 ULB दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो; त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही. BSB BSB: The soul of the wicked man craves evil; his neighbor finds no favor in his eyes.
11 ULB जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात; आणि जेव्हा सुज्ञास शिक्षण मिळते तेव्हा त्याच्या ज्ञानात वाढ होते. BSB BSB: When a mocker is punished, the simple gain wisdom; and when a wise man is instructed, he acquires knowledge.
12 ULB नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो, तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो. BSB BSB: The Righteous One considers the house of the wicked and brings the wicked to ruin.
13 ULB जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोहि आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही. BSB BSB: Whoever shuts his ears to the cry of the poor, he too shall cry out and receive no answer.
14 ULB गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते, आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते. BSB BSB: A gift in secret soothes anger, and a covert bribe pacifies great wrath.
15 ULB योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो. BSB BSB: Justice executed is a joy to the righteous, but a terror to the workers of iniquity.
16 ULB जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो, त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल. BSB BSB: The man who strays from the path of understanding will rest in the assembly of the dead.
17 ULB ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षारस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही. BSB BSB: He who loves pleasure will become poor; the one who loves wine and oil will never be rich.
18 ULB जो कोणी चांगले करतो त्याची खंडणी दुर्जन आहे, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो. BSB BSB: The wicked become a ransom for the righteous, and the faithless for the upright.
19 ULB भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले. BSB BSB: Better to live in the desert than with a contentious and ill-tempered wife.
20 ULB सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत, पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो. BSB BSB: Precious treasures and oil are in the dwelling of the wise, but a foolish man consumes them.
21 ULB जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो, त्यास आयुष्य, उन्नती आणि मान मिळेल. BSB BSB: He who pursues righteousness and loving devotion finds life, righteousness, and honor.
22 ULB सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो, आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो. BSB BSB: A wise man scales the city of the mighty and pulls down the stronghold in which they trust.
23 ULB जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो, तो संकटापासून आपला जीव वाचवतो. BSB BSB: He who guards his mouth and tongue keeps his soul from distress.
24 ULB गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे. तो गर्वाने उद्धट कृती करतो. BSB BSB: Mocker is the name of the proud and arrogant man—of him who acts with excessive pride.
25 ULB आळशाची वासना त्यास मारून टाकते; त्याचे हात काम करण्यास नकार देतात. BSB BSB: The craving of the slacker kills him because his hands refuse to work.
26 ULB तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो, परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही. BSB BSB: All day long he covets more, but the righteous give without restraint.
27 ULB दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते, तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे. BSB BSB: The sacrifice of the wicked is detestable—how much more so when brought with ill intent!
28 ULB खोटा साक्षीदार नाश पावेल, पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो. BSB BSB: A lying witness will perish, but the man who listens to truth will speak forever.
29 ULB दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो, पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो. BSB BSB: A wicked man hardens his face, but the upright man makes his way sure.
30 ULB परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत. BSB BSB: There is no wisdom, no understanding, no counsel that can prevail against the LORD.
31 ULB लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे. BSB BSB: A horse is prepared for the day of battle, but victory is of the LORD.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.