1 ULB मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका, आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. BSB BSB: Listen, my sons, to a father’s instruction; pay attention and gain understanding.
2 ULB मी तुम्हास चांगला सल्ला देतो; माझी शिकवण कधीही विसरु नका. BSB BSB: For I give you sound teaching; do not abandon my directive.
3 ULB जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो, माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो, BSB BSB: When I was a son to my father, tender and the only child of my mother,
4 ULB त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले, “तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो; माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा. BSB BSB: he taught me and said, “Let your heart lay hold of my words; keep my commands and you will live.
5 ULB ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर; माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस; BSB BSB: Get wisdom, get understanding; do not forget my words or turn from them.
6 ULB ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील; त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील. BSB BSB: Do not forsake wisdom, and she will preserve you; love her, and she will guard you.
7 ULB ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर, आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव. BSB BSB: Wisdom is supreme; so acquire wisdom. And whatever you may acquire, gain understanding.
8 ULB ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल, जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील. BSB BSB: Prize her, and she will exalt you; if you embrace her, she will honor you.
9 ULB ते तुझ्या शिरावर सन्मानाचे वेष्टन देईल; ते तुला सुंदर मुकुट देईल.” BSB BSB: She will set a garland of grace on your head; she will present you with a crown of beauty.”
10 ULB माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील. BSB BSB: Listen, my son, and receive my words, and the years of your life will be many.
11 ULB मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे. BSB BSB: I will guide you in the way of wisdom; I will lead you on straight paths.
12 ULB जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही. आणि जर तू धावशील, तर तू अडखळणार नाहीस. BSB BSB: When you walk, your steps will not be impeded; when you run, you will not stumble.
13 ULB शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको; ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे. BSB BSB: Hold on to instruction; do not let go. Guard it, for it is your life.
14 ULB दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको, आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको. BSB BSB: Do not set foot on the path of the wicked or walk in the way of evildoers.
15 ULB ते टाळ, त्याजवळ जाऊ नकोस; त्यापासून मागे फीर आणि दुसऱ्या मार्गाने जा. BSB BSB: Avoid it; do not travel on it. Turn from it and pass on by.
16 ULB कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. BSB BSB: For they cannot sleep unless they do evil; they are deprived of slumber until they make someone fall.
17 ULB कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात. BSB BSB: For they eat the bread of wickedness and drink the wine of violence.
18 ULB परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे; मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे. BSB BSB: The path of the righteous is like the first gleam of dawn, shining brighter and brighter until midday.
19 ULB पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत, ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही. BSB BSB: But the way of the wicked is like the darkest gloom; they do not know what makes them stumble.
20 ULB माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष दे. माझे सांगणे ऐक. BSB BSB: My son, pay attention to my words; incline your ear to my sayings.
21 ULB ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस; ती तुझ्या अंतःकरणात ठेव. BSB BSB: Do not lose sight of them; keep them within your heart.
22 ULB कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात, आणि त्यांच्या सर्व देहाला आरोग्य देतात. BSB BSB: For they are life to those who find them, and health to the whole body.
23 ULB तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो. BSB BSB: Guard your heart with all diligence, for from it flow springs of life.
24 ULB वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव, आणि दूषित बोलणे सोडून दे. BSB BSB: Put away deception from your mouth; keep your lips from perverse speech.
25 ULB तुझे डोळे नीट समोर पाहोत, आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. BSB BSB: Let your eyes look forward; fix your gaze straight ahead.
26 ULB तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर; मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील. BSB BSB: Make a level path for your feet, and all your ways will be sure.
27 ULB तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको; तू आपला पाय वाईटापासून राख. BSB BSB: Do not swerve to the right or to the left; turn your feet away from evil.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.