1 ULB ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत. BSB BSB: Blessed are those whose way is blameless, who walk in the Law of the LORD.
2 ULB जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत. BSB BSB: Blessed are those who keep His testimonies and seek Him with all their heart.
3 ULB ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात. BSB BSB: They do no iniquity; they walk in His ways.
4 ULB तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत. BSB BSB: You have ordained Your precepts, that we should keep them diligently.
5 ULB मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. BSB BSB: Oh, that my ways were committed to keeping Your statutes!
6 ULB मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही. BSB BSB: Then I would not be ashamed when I consider all Your commandments.
7 ULB मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन, तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन. BSB BSB: I will praise You with an upright heart when I learn Your righteous judgments.
8 ULB मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस. BSB BSB: I will keep Your statutes; do not utterly forsake me.
9 ULB तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने. BSB BSB: How can a young man keep his way pure? By guarding it according to Your word.
10 ULB मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस. BSB BSB: With all my heart I have sought You; do not let me stray from Your commandments.
11 ULB मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे. BSB BSB: I have hidden Your word in my heart that I might not sin against You.
12 ULB हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; मला तुझे नियम शिकव. BSB BSB: Blessed are You, O LORD; teach me Your statutes.
13 ULB मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन. BSB BSB: With my lips I proclaim all the judgments of Your mouth.
14 ULB तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो. BSB BSB: I rejoice in the way of Your testimonies as much as in all riches.
15 ULB मी तुझ्या नियमांचे मनन करीन, आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. BSB BSB: I will meditate on Your precepts and regard Your ways.
16 ULB मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही. BSB BSB: I will delight in Your statutes; I will not forget Your word.
17 ULB आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, आणि तुझे वचन पाळावे. BSB BSB: Deal bountifully with Your servant, that I may live and keep Your word.
18 ULB माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. BSB BSB: Open my eyes that I may see wondrous things from Your law.
19 ULB मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस. BSB BSB: I am a stranger on the earth; do not hide Your commandments from me.
20 ULB तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे. BSB BSB: My soul is consumed with longing for Your judgments at all times.
21 ULB तू गर्विष्ठांना रागावतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत. BSB BSB: You rebuke the arrogant—the cursed who stray from Your commandments.
22 ULB माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे. BSB BSB: Remove my scorn and contempt, for I have kept Your testimonies.
23 ULB अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो. BSB BSB: Though rulers sit and slander me, Your servant meditates on Your statutes.
24 ULB तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत. BSB BSB: Your testimonies are indeed my delight; they are my counselors.
25 ULB माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. BSB BSB: My soul cleaves to the dust; revive me according to Your word.
26 ULB मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव. BSB BSB: I recounted my ways, and You answered me; teach me Your statutes.
27 ULB मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे. BSB BSB: Make clear to me the way of Your precepts; then I will meditate on Your wonders.
28 ULB माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर. BSB BSB: My soul melts with sorrow; strengthen me according to Your word.
29 ULB असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव. BSB BSB: Remove me from the path of deceit and graciously grant me Your law.
30 ULB मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. BSB BSB: I have chosen the way of truth; I have set Your ordinances before me.
31 ULB मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस. BSB BSB: I cling to Your testimonies, O LORD; let me not be put to shame.
32 ULB मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस. BSB BSB: I run in the path of Your commandments, for You will enlarge my heart.
33 ULB हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन. BSB BSB: Teach me, O LORD, the way of Your statutes, and I will keep them to the end.
34 ULB मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन. BSB BSB: Give me understanding that I may obey Your law, and follow it with all my heart.
35 ULB तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे. BSB BSB: Direct me in the path of Your commandments, for there I find delight.
36 ULB माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर. BSB BSB: Turn my heart to Your testimonies and not to covetous gain.
37 ULB निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर. BSB BSB: Turn my eyes away from worthless things; revive me with Your word.
38 ULB तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर. BSB BSB: Establish Your word to Your servant, to produce reverence for You.
39 ULB ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. BSB BSB: Turn away the disgrace I dread, for Your judgments are good.
40 ULB पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. BSB BSB: How I long for Your precepts! Revive me in Your righteousness.
41 ULB हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो. BSB BSB: May Your loving devotion come to me, O LORD, Your salvation, according to Your promise.
42 ULB जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे. BSB BSB: Then I can answer him who taunts, for I trust in Your word.
43 ULB तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो. BSB BSB: Never take Your word of truth from my mouth, for I hope in Your judgments.
44 ULB मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन. BSB BSB: I will always obey Your law, forever and ever.
45 ULB मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. BSB BSB: And I will walk in freedom, for I have sought Your precepts.
46 ULB मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही. BSB BSB: I will speak of Your testimonies before kings, and I will not be ashamed.
47 ULB मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत. BSB BSB: I delight in Your commandments because I love them.
48 ULB ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन. BSB BSB: I lift up my hands to Your commandments, which I love, and I meditate on Your statutes.
49 ULB तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस. BSB BSB: Remember Your word to Your servant, upon which You have given me hope.
50 ULB माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते; BSB BSB: This is my comfort in affliction, that Your promise has given me life.
51 ULB गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही. BSB BSB: The arrogant utterly deride me, but I do not turn from Your law.
52 ULB हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, आणि मी आपले समाधान करतो. BSB BSB: I remember Your judgments of old, O LORD, and in them I find comfort.
53 ULB दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, म्हणून संताप माझा ताबा घेतो. BSB BSB: Rage has taken hold of me because of the wicked who reject Your law.
54 ULB ज्या घरात मी तात्पुरता राहतो; तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत. BSB BSB: Your statutes are songs to me in the house of my pilgrimage.
55 ULB हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो. BSB BSB: In the night, O LORD, I remember Your name, that I may keep Your law.
56 ULB हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत. BSB BSB: This is my practice, for I obey Your precepts.
57 ULB परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे. BSB BSB: The LORD is my portion; I have promised to keep Your words.
58 ULB मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर; BSB BSB: I have sought Your face with all my heart; be gracious to me according to Your promise.
59 ULB मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली. BSB BSB: I considered my ways and turned my steps to Your testimonies.
60 ULB मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, आणि मी उशीर केला नाही. BSB BSB: I hurried without hesitating to keep Your commandments.
61 ULB दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. BSB BSB: Though the ropes of the wicked bind me, I do not forget Your law.
62 ULB मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो. BSB BSB: At midnight I rise to give You thanks for Your righteous judgments.
63 ULB तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे. BSB BSB: I am a friend to all who fear You, and to those who keep Your precepts.
64 ULB हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव. BSB BSB: The earth is filled with Your loving devotion, O LORD; teach me Your statutes.
65 ULB हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस. BSB BSB: You are good to Your servant, O LORD, according to Your word.
66 ULB योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे. BSB BSB: Teach me good judgment and knowledge, for I believe in Your commandments.
67 ULB पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे. BSB BSB: Before I was afflicted, I went astray; but now I keep Your word.
68 ULB तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव. BSB BSB: You are good, and You do what is good; teach me Your statutes.
69 ULB गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन. BSB BSB: Though the arrogant have smeared me with lies, I keep Your precepts with all my heart.
70 ULB त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे. BSB BSB: Their hearts are callous and insensitive, but I delight in Your law.
71 ULB मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो. BSB BSB: It was good for me to be afflicted, that I might learn Your statutes.
72 ULB सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत. BSB BSB: The law from Your mouth is more precious to me than thousands of pieces of gold and silver.
73 ULB तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन. BSB BSB: Your hands have made me and fashioned me; give me understanding to learn Your commandments.
74 ULB तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे. BSB BSB: May those who fear You see me and rejoice, for I have hoped in Your word.
75 ULB हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे. BSB BSB: I know, O LORD, that Your judgments are righteous, and that in faithfulness You have afflicted me.
76 ULB तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वासनियतेने सांत्वन कर. BSB BSB: May Your loving devotion comfort me, I pray, according to Your promise to Your servant.
77 ULB मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे. BSB BSB: May Your compassion come to me, that I may live, for Your law is my delight.
78 ULB गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन; BSB BSB: May the arrogant be put to shame for subverting me with a lie; I will meditate on Your precepts.
79 ULB तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. BSB BSB: May those who fear You turn to me, those who know Your testimonies.
80 ULB मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे. BSB BSB: May my heart be blameless in Your statutes, that I may not be put to shame.
81 ULB मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे. BSB BSB: My soul faints for Your salvation; I wait for Your word.
82 ULB माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील? BSB BSB: My eyes fail, looking for Your promise; I ask, “When will You comfort me?”
83 ULB कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही. BSB BSB: Though I am like a wineskin dried up by smoke, I do not forget Your statutes.
84 ULB तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील? BSB BSB: How many days must Your servant wait? When will You execute judgment on my persecutors?
85 ULB गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्त्र झुगारले आहे. BSB BSB: The arrogant have dug pits for me in violation of Your law.
86 ULB तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर. BSB BSB: All Your commandments are faithful; I am persecuted without cause—help me!
87 ULB त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत. BSB BSB: They almost wiped me from the earth, but I have not forsaken Your precepts.
88 ULB तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन. BSB BSB: Revive me according to Your loving devotion, that I may obey the testimony of Your mouth.
89 ULB हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे. BSB BSB: Your word, O LORD, is everlasting; it is firmly fixed in the heavens.
90 ULB तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते. BSB BSB: Your faithfulness continues through all generations; You established the earth, and it endures.
91 ULB त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात. BSB BSB: Your ordinances stand to this day, for all things are servants to You.
92 ULB जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता. BSB BSB: If Your law had not been my delight, then I would have perished in my affliction.
93 ULB मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे. BSB BSB: I will never forget Your precepts, for by them You have revived me.
94 ULB मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. BSB BSB: I am Yours; save me, for I have sought Your precepts.
95 ULB दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन. BSB BSB: The wicked wait to destroy me, but I will ponder Your testimonies.
96 ULB प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत. BSB BSB: I have seen a limit to all perfection, but Your commandment is without limit.
97 ULB अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो. BSB BSB: Oh, how I love Your law! All day long it is my meditation.
98 ULB तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत. BSB BSB: Your commandments make me wiser than my enemies, for they are always with me.
99 ULB माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो. BSB BSB: I have more insight than all my teachers, for Your testimonies are my meditation.
100 ULB वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो. BSB BSB: I discern more than the elders, for I obey Your precepts.
101 ULB तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे. BSB BSB: I have kept my feet from every evil path, that I may keep Your word.
102 ULB मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे. BSB BSB: I have not departed from Your ordinances, for You Yourself have taught me.
103 ULB तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत. BSB BSB: How sweet are Your words to my taste—sweeter than honey in my mouth!
104 ULB तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो. BSB BSB: I gain understanding from Your precepts; therefore I hate every false way.
105 ULB तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. BSB BSB: Your word is a lamp to my feet and a light to my path.
106 ULB तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे. BSB BSB: I have sworn and confirmed that I will keep Your righteous judgments.
107 ULB मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव. BSB BSB: I am severely afflicted, O LORD; revive me through Your word.
108 ULB हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव. BSB BSB: Accept the freewill offerings of my mouth, O LORD, and teach me Your judgments.
109 ULB माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. BSB BSB: I constantly take my life in my hands, yet I do not forget Your law.
110 ULB दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही. BSB BSB: The wicked have set a snare for me, but I have not strayed from Your precepts.
111 ULB तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो. BSB BSB: Your testimonies are my heritage forever, for they are the joy of my heart.
112 ULB तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे. BSB BSB: I have inclined my heart to perform Your statutes, even to the very end.
113 ULB परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते. BSB BSB: The double-minded I despise, but Your law I love.
114 ULB मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे. BSB BSB: You are my hiding place and my shield; I put my hope in Your word.
115 ULB वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. BSB BSB: Depart from me, you evildoers, that I may obey the commandments of my God.
116 ULB तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस. BSB BSB: Sustain me as You promised, that I may live; let me not be ashamed of my hope.
117 ULB मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन. BSB BSB: Uphold me, and I will be saved, that I may always regard Your statutes.
118 ULB तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत. BSB BSB: You reject all who stray from Your statutes, for their deceitfulness is in vain.
119 ULB पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो. BSB BSB: All the wicked on earth You discard like dross; therefore I love Your testimonies.
120 ULB तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते. BSB BSB: My flesh trembles in awe of You; I stand in fear of Your judgments.
121 ULB मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको. BSB BSB: I have done what is just and right; do not leave me to my oppressors.
122 ULB तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस. BSB BSB: Ensure Your servant’s well-being; do not let the arrogant oppress me.
123 ULB तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत. BSB BSB: My eyes fail, looking for Your salvation, and for Your righteous promise.
124 ULB तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव. BSB BSB: Deal with Your servant according to Your loving devotion, and teach me Your statutes.
125 ULB मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे. BSB BSB: I am Your servant; give me understanding, that I may know Your testimonies.
126 ULB ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे. BSB BSB: It is time for the LORD to act, for they have broken Your law.
127 ULB खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. BSB BSB: Therefore I love Your commandments more than gold, even the purest gold.
128 ULB यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. BSB BSB: Therefore I admire all Your precepts and hate every false way.
129 ULB तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो. BSB BSB: Wonderful are Your testimonies; therefore I obey them.
130 ULB तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षीतास ज्ञान प्राप्त होते. BSB BSB: The unfolding of Your words gives light; it informs the simple.
131 ULB मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली. BSB BSB: I open my mouth and pant, longing for Your commandments.
132 ULB तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस. BSB BSB: Turn to me and show me mercy, as You do to those who love Your name.
133 ULB तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको. BSB BSB: Order my steps in Your word; let no sin rule over me.
134 ULB मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन. BSB BSB: Redeem me from the oppression of man, that I may keep Your precepts.
135 ULB तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव. BSB BSB: Make Your face shine upon Your servant, and teach me Your statutes.
136 ULB माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत. BSB BSB: My eyes shed streams of tears because Your law is not obeyed.
137 ULB हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत. BSB BSB: Righteous are You, O LORD, and upright are Your judgments.
138 ULB तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. BSB BSB: The testimonies You have laid down are righteous and altogether faithful.
139 ULB रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत. BSB BSB: My zeal has consumed me because my foes forget Your words.
140 ULB तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे. BSB BSB: Your promise is completely pure; therefore Your servant loves it.
141 ULB मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. BSB BSB: I am lowly and despised, but I do not forget Your precepts.
142 ULB तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे. BSB BSB: Your righteousness is everlasting and Your law is true.
143 ULB मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. BSB BSB: Trouble and distress have found me, but Your commandments are my delight.
144 ULB तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. BSB BSB: Your testimonies are righteous forever. Give me understanding, that I may live.
145 ULB मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन. BSB BSB: I call with all my heart; answer me, O LORD! I will obey Your statutes.
146 ULB मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन. BSB BSB: I call to You; save me, that I may keep Your testimonies.
147 ULB मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे. BSB BSB: I rise before dawn and cry for help; in Your word I have put my hope.
148 ULB तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. BSB BSB: My eyes anticipate the watches of night, that I may meditate on Your word.
149 ULB तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव. BSB BSB: Hear my voice, O LORD, according to Your loving devotion; give me life according to Your justice.
150 ULB जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत. BSB BSB: Those who follow after wickedness draw near; they are far from Your law.
151 ULB हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. BSB BSB: You are near, O LORD, and all Your commandments are true.
152 ULB तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. BSB BSB: Long ago I learned from Your testimonies that You have established them forever.
153 ULB माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. BSB BSB: Look upon my affliction and rescue me, for I have not forgotten Your law.
154 ULB तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. BSB BSB: Defend my cause and redeem me; revive me according to Your word.
155 ULB दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत. BSB BSB: Salvation is far from the wicked because they do not seek Your statutes.
156 ULB हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजिवन दे. BSB BSB: Great are Your mercies, O LORD; revive me according to Your ordinances.
157 ULB मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही. BSB BSB: Though my persecutors and foes are many, I have not turned from Your testimonies.
158 ULB विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत. BSB BSB: I look on the faithless with loathing because they do not keep Your word.
159 ULB तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वासनियतेने मला जिवंत ठेव. BSB BSB: Consider how I love Your precepts, O LORD; give me life according to Your loving devotion.
160 ULB तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे. BSB BSB: The entirety of Your word is truth, and all Your righteous judgments endure forever.
161 ULB अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते. BSB BSB: Rulers persecute me without cause, but my heart fears only Your word.
162 ULB ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो. BSB BSB: I rejoice in Your promise like one who finds great spoil.
163 ULB मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे. BSB BSB: I hate and abhor falsehood, but Your law I love.
164 ULB मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो. BSB BSB: Seven times a day I praise You for Your righteous judgments.
165 ULB तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते. BSB BSB: Abundant peace belongs to those who love Your law; nothing can make them stumble.
166 ULB हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत. BSB BSB: I wait for Your salvation, O LORD, and I carry out Your commandments.
167 ULB मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत. BSB BSB: I obey Your testimonies and love them greatly.
168 ULB मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे. BSB BSB: I obey Your precepts and Your testimonies, for all my ways are before You.
169 ULB हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे. BSB BSB: May my cry come before You, O LORD; give me understanding according to Your word.
170 ULB माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर. BSB BSB: May my plea come before You; rescue me according to Your promise.
171 ULB तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. BSB BSB: My lips pour forth praise, for You teach me Your statutes.
172 ULB माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. BSB BSB: My tongue sings of Your word, for all Your commandments are righteous.
173 ULB तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत. BSB BSB: May Your hand be ready to help me, for I have chosen Your precepts.
174 ULB हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे. BSB BSB: I long for Your salvation, O LORD, and Your law is my delight.
175 ULB माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो. BSB BSB: Let me live to praise You; may Your judgments sustain me.
176 ULB मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही. BSB BSB: I have strayed like a lost sheep; seek Your servant, for I have not forgotten Your commandments.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.