1 ULB परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा. BSB BSB: Hallelujah! Praise the name of the LORD. Give praise, O servants of the LORD,
2 ULB परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, तुम्ही त्याची स्तुती करा. BSB BSB: who stand in the house of the LORD, in the courts of the house of our God.
3 ULB परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे. BSB BSB: Hallelujah, for the LORD is good; sing praises to His name, for it is lovely.
4 ULB कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे. BSB BSB: For the LORD has chosen Jacob as His own, Israel as His treasured possession.
5 ULB परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे. BSB BSB: For I know that the LORD is great; our Lord is above all gods.
6 ULB परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो. BSB BSB: The LORD does all that pleases Him in the heavens and on the earth, in the seas and in all their depths.
7 ULB तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो. BSB BSB: He causes the clouds to rise from the ends of the earth. He generates the lightning with the rain and brings forth the wind from His storehouses.
8 ULB त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले. BSB BSB: He struck down the firstborn of Egypt, of both man and beast.
9 ULB हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले. BSB BSB: He sent signs and wonders into your midst, O Egypt, against Pharaoh and all his servants.
10 ULB त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तिमान राजांना मारून टाकले, BSB BSB: He struck down many nations and slaughtered mighty kings:
11 ULB अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला. BSB BSB: Sihon king of the Amorites, Og king of Bashan, and all the kings of Canaan.
12 ULB त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला. BSB BSB: He gave their land as an inheritance, as a heritage to His people Israel.
13 ULB हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील. BSB BSB: Your name, O LORD, endures forever, Your renown, O LORD, through all generations.
14 ULB कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल. BSB BSB: For the LORD will vindicate His people and will have compassion on His servants.
15 ULB राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत. BSB BSB: The idols of the nations are silver and gold, made by the hands of men.
16 ULB त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत. BSB BSB: They have mouths, but cannot speak; they have eyes, but cannot see;
17 ULB त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. BSB BSB: they have ears, but cannot hear; nor is there breath in their mouths.
18 ULB जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत. BSB BSB: Those who make them become like them, as do all who trust in them.
19 ULB हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा; अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. BSB BSB: O house of Israel, bless the LORD; O house of Aaron, bless the LORD;
20 ULB लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा. BSB BSB: O house of Levi, bless the LORD; you who fear the LORD, bless the LORD!
21 ULB जो परमेश्वर यरुशलेमेत राहतो, त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा. BSB BSB: Blessed be the LORD from Zion—He who dwells in Jerusalem. Hallelujah!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.