1 ULB हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव. BSB BSB: For the choirmaster. A Psalm of David. Rescue me, O LORD, from evil men. Protect me from men of violence,
2 ULB ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात. BSB BSB: who devise evil in their hearts and stir up war all day long.
3 ULB त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे. BSB BSB: They sharpen their tongues like snakes; the venom of vipers is on their lips. Selah
4 ULB हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे. BSB BSB: Guard me, O LORD, from the hands of the wicked. Keep me safe from men of violence who scheme to make me stumble.
5 ULB गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे. BSB BSB: The proud hide a snare for me; the cords of their net are spread along the path, and lures are set out for me. Selah
6 ULB मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. BSB BSB: I say to the LORD, “You are my God.” Hear, O LORD, my cry for help.
7 ULB हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस. BSB BSB: O GOD the Lord, the strength of my salvation, You shield my head in the day of battle.
8 ULB हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील. BSB BSB: Grant not, O LORD, the desires of the wicked; do not promote their evil plans, lest they be exalted. Selah
9 ULB ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो. BSB BSB: May the heads of those who surround me be covered in the trouble their lips have caused.
10 ULB त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्यात फेकण्यात येवो. BSB BSB: May burning coals fall on them; may they be thrown into the fire, into the miry pits, never to rise again.
11 ULB वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. BSB BSB: May no slanderer be established in the land; may calamity hunt down the man of violence.
12 ULB परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे. BSB BSB: I know that the LORD upholds justice for the poor and defends the cause of the needy.
13 ULB खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील. BSB BSB: Surely the righteous will praise Your name; the upright will dwell in Your presence.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.