1 ULB परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. BSB BSB: Hallelujah! How good it is to sing praises to our God, how pleasant and lovely to praise Him!
2 ULB परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. BSB BSB: The LORD builds up Jerusalem; He gathers the exiles of Israel.
3 ULB तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. BSB BSB: He heals the brokenhearted and binds up their wounds.
4 ULB तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. BSB BSB: He determines the number of the stars; He calls them each by name.
5 ULB आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही. BSB BSB: Great is our Lord, and mighty in power; His understanding has no limit.
6 ULB परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. BSB BSB: The LORD sustains the humble, but casts the wicked to the ground.
7 ULB गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा. BSB BSB: Sing to the LORD with thanksgiving; make music on the harp to our God,
8 ULB तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो. BSB BSB: who covers the sky with clouds, who prepares rain for the earth, who makes grass to grow on the hills.
9 ULB तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. BSB BSB: He provides food for the animals, and for the young ravens when they call.
10 ULB घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तिमान पायांत तो आनंद मानत नाही. BSB BSB: He does not delight in the strength of the horse; He takes no pleasure in the legs of a man.
11 ULB जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. BSB BSB: The LORD is pleased with those who fear Him, who hope in His loving devotion.
12 ULB हे यरुशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर. BSB BSB: Exalt the LORD, O Jerusalem; praise your God, O Zion!
13 ULB कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत. BSB BSB: For He strengthens the bars of your gates and blesses the children within you.
14 ULB तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. BSB BSB: He makes peace at your borders; He fills you with the finest wheat.
15 ULB तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. BSB BSB: He sends forth His command to the earth; His word runs swiftly.
16 ULB तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. BSB BSB: He spreads the snow like wool; He scatters the frost like ashes;
17 ULB तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? BSB BSB: He casts forth His hail like pebbles. Who can withstand His icy blast?
18 ULB तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते. BSB BSB: He sends forth His word and melts them; He unleashes His winds, and the waters flow.
19 ULB त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले. BSB BSB: He declares His word to Jacob, His statutes and judgments to Israel.
20 ULB त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा. BSB BSB: He has done this for no other nation; they do not know His judgments. Hallelujah!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.