1 ULB हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ. BSB BSB: Of David. Contend with my opponents, O LORD; fight against those who fight against me.
2 ULB तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर. BSB BSB: Take up Your shield and buckler; arise and come to my aid.
3 ULB जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. BSB BSB: Draw the spear and javelin against my pursuers; say to my soul: “I am your salvation.”
4 ULB जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत. BSB BSB: May those who seek my life be disgraced and put to shame; may those who plan to harm me be driven back and confounded.
5 ULB ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो. BSB BSB: May they be like chaff in the wind, as the angel of the LORD drives them away.
6 ULB त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो. BSB BSB: May their path be dark and slick, as the angel of the LORD pursues.
7 ULB विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. BSB BSB: For without cause they laid their net for me; without reason they dug a pit for my soul.
8 ULB त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत. BSB BSB: May ruin befall them by surprise; may the net they hid ensnare them; may they fall into the hazard they created.
9 ULB परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. BSB BSB: Then my soul will rejoice in the LORD and exult in His salvation.
10 ULB माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो. BSB BSB: All my bones will exclaim, “Who is like You, O LORD, who delivers the afflicted from the aggressor, the poor and needy from the robber?”
11 ULB अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात. BSB BSB: Hostile witnesses come forward; they make charges I know nothing about.
12 ULB माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु:खी आहे. BSB BSB: They repay me evil for good, to the bereavement of my soul.
13 ULB परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. BSB BSB: Yet when they were ill, I put on sackcloth; I humbled myself with fasting, but my prayers returned unanswered.
14 ULB मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे. BSB BSB: I paced about as for my friend or brother; I was bowed down with grief, like one mourning for his mother.
15 ULB परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले. BSB BSB: But when I stumbled, they assembled in glee; they gathered together against me. Assailants I did not know slandered me without ceasing.
16 ULB आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले. BSB BSB: Like godless jesters at a feast, they gnashed their teeth at me.
17 ULB परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव. BSB BSB: How long, O Lord, will You look on? Rescue my soul from their ravages, my precious life from these lions.
18 ULB मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन. BSB BSB: Then I will give You thanks in the great assembly; I will praise You among many people.
19 ULB माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको. BSB BSB: Let not my enemies gloat over me without cause, nor those who hate me without reason wink in malice.
20 ULB कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात. BSB BSB: For they do not speak peace, but they devise deceitful schemes against those who live quietly in the land.
21 ULB ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे. BSB BSB: They gape at me and say, “Aha, aha! Our eyes have seen!”
22 ULB हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको. BSB BSB: O LORD, You have seen it; be not silent. O Lord, be not far from me.
23 ULB हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ. BSB BSB: Awake and rise to my defense, to my cause, my God and my Lord!
24 ULB परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ. BSB BSB: Vindicate me by Your righteousness, O LORD my God, and do not let them gloat over me.
25 ULB “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. BSB BSB: Let them not say in their hearts, “Aha, just what we wanted!” Let them not say, “We have swallowed him up!”
26 ULB जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो. BSB BSB: May those who gloat in my distress be ashamed and confounded; may those who exalt themselves over me be clothed in shame and reproach.
27 ULB जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत. BSB BSB: May those who favor my vindication shout for joy and gladness; may they always say, “Exalted be the LORD who delights in His servant’s well-being.”
28 ULB तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, आणि तुझी स्तुती दिवसभर करीन. BSB BSB: Then my tongue will proclaim Your righteousness and Your praises all day long.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.