1 UDB तुम्हाला इतरांवर प्रेम करण्यास सक्षम बनवावे ही प्रार्थना तुम्ही देवाला कळकळीने करायलाच हवी. आत्मा तुम्हाला देईल त्या कृपादांनानी आमच्या सहविश्वासू बंधूला मजबूत करण्यासाठी तुम्हांला सक्षम बनवावे अशी देखील प्रार्थना त्याला करा; तो तुम्हाला जो संदेश सांगण्यासाठी देतो ते त्याचे संदेश घोषित करण्यासाठी तुम्हांला सक्षम बनवावे ही प्रार्थना विशेषतः तुम्ही त्याला करा. BSB BSB: Earnestly pursue love and eagerly desire spiritual gifts, especially the gift of prophecy.
2 UDB आत्म्याच्याद्वारे दिल्या गेलेल्या एका भाषेत एखादा व्यक्ती बोलत असतो, तेव्हा तो लोकांबरोबर बोलत नाही, तर तो देवाबरोबर बोलतो, कारण कोणीही त्याला समजू शकत नाही. आत्मा त्याच्या स्वत:च्या पुढे जातो त्याप्रमाणेच तो त्याला या गोष्टीविषयी सांगत असतो. BSB BSB: For he who speaks in a tongue does not speak to men, but to God. Indeed, no one understands him; he utters mysteries in the Spirit.
3 UDB दुसऱ्या बाजूस, देवापासून येणाऱ्या संदेशाची घोषणा करणारा संदेष्टा थेट लोकांबरोबर बोलतो. त्यांनी मजबूत होण्याकरता त्यांना मदत व्हावी, त्यांनी खंबीर असावे म्हणून त्यांना मदत व्हावी, आणि त्यांना आराम देण्यासाठी जेणेकरून ते दुःखात असतानाही ते आंनदी राहतील म्हणून तो हे करतो. BSB BSB: But he who prophesies speaks to men for their edification, encouragement, and comfort.
4 UDB एखादा व्यक्ती जो आत्म्याच्या द्वारे दिल्या गेलेल्या एका भाषेत बोलतो तर तो स्वतःची उन्नती आणि स्वतःचीच मदत करतो, परंतु एखादा व्यक्ती जो देवाच्या संदेशाची घोषणा करतो तर तो प्रत्येकांची आणि मंडळीतील प्रत्येकाने त्यांच्या विश्वासात मजबूत व्हावे म्हणून मदत करतो. BSB BSB: The one who speaks in a tongue edifies himself, but the one who prophesies edifies the church.
5 UDB आता तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे अशी माझी इच्छा आहे, पंरतु देवाचा संदेश सांगण्याचे कृपादान तुम्हापैकी अधिक आणि अधिकांकडे असले तर ते संपूर्ण मंडळीसाठी अधिक हिताचे होईल. देवापासून आलेल्या संदेशाची जो कोणीही घोषणा करतो तो त्याच्या सहविश्वासू बंधूला मजबूत करण्यासाठी मदत करतो. म्हणून ह्या कारणामुळे, इतर विविध भाषांमध्ये संदेश घोषित करणाऱ्यांपेक्षाही अधिक महत्वाचे काम तो करतो आहे—त्या संदेशाचा अर्थ सांगणारा कोणी सक्षम असला तरच त्याचा उपयोग होतो. BSB BSB: I wish that all of you could speak in tongues, but I would rather have you prophesy. He who prophesies is greater than one who speaks in tongues, unless he interprets so that the church may be edified.
6 UDB मी तुमच्याकडे आलो आणि मी केवळ आत्म्याद्वारे दिल्या गेलेल्या भाषेतच बोलत आहे, तर त्याचा उपयोग तुम्हांला कसा होईल? जोपर्यंत मी तुम्हांला बोलणार नाही आणि तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या गोष्टींची माहिती देणार नाही तोपर्यंत, किंवा तुम्हांला ठाऊक नसलेल्या सत्याविषयी समजण्यास मदत करेल तोपर्यंत किंवा मी तुम्हाला तुम्ही पूर्वी न ऐकलेले काही संदेश तुम्हांला घोषित करीत नाही तोपर्यंत, किंवा मी तुम्हाला तुम्ही पूर्वी कधीही न शिकलेल्या काही नियंमाना मी शिकवेल तोपर्यंत, ते तुमची मदत करू शकणार नाही. BSB BSB: Now, brothers, if I come to you speaking in tongues, how will I benefit you, unless I bring you some revelation or knowledge or prophecy or teaching?
7 UDB मी बासरी किंवा वीणा वाजवली तर आणि लोकांप्रमाणे ते जिवंत प्राणी नाहीत, आणि ती बासरी निर्माण करीत असलेला आवाज आणि विण्यातून निघणारा आवाज यात फरक नाही, तर कोणते वाद्य मी वाजवत होतो हे सांगण्यासाठी कोणीही सक्षम नाही. BSB BSB: Even in the case of lifeless instruments, such as the flute or harp, how will anyone recognize the tune they are playing unless the notes are distinct?
8 UDB आणि एका सैनिकाने तुतारीला असमाधानकारकपणे फुकंले, तर सैन्याला युद्धासाठी सज्ज व्हायचे की नाही याची कल्पना होणार नाही. BSB BSB: Again, if the trumpet sounds a muffled call, who will prepare for battle?
9 UDB ते असे तेव्हा असते जेव्हा तुम्ही शब्द उच्चारता तेव्हा कोणीच तुम्हांला समजू शकत नाही: तुम्ही काय बोलला आहात हे कोणीही समजू शकणार नाही. BSB BSB: So it is with you. Unless you speak intelligible words with your tongue, how will anyone know what you are saying? You will just be speaking into the air.
10 UDB जगामध्ये निश्चितपणे अनेक भाषा आहेत, आणि ज्यांना त्या समजतात त्यापैकी सर्व त्या अर्थ देतात. BSB BSB: Assuredly, there are many different languages in the world, yet none of them is without meaning.
11 UDB परंतु एखाद्याची भाषा मला समजत नसेल, तर त्याला मी एका विदेश्यासारखा होईल, आणि तो देखील मला विदेश्यासारखाच होईल. BSB BSB: If, then, I do not know the meaning of someone’s language, I am a foreigner to the speaker, and he is a foreigner to me.
12 UDB आत्म्याने तुमच्याद्वारे कार्य करावे म्हणून तुम्ही खूप इच्छुक आहात, म्हणून मंडळीतील विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याचे पालन करावे म्हणून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. BSB BSB: It is the same with you. Since you are eager to have spiritual gifts, strive to excel in gifts that build up the church.
13 UDB देवाने तुम्हांला दिलेल्या भाषेत तुम्ही काय म्हणता त्याचा अर्थ लावण्यासाठी देवाने तुम्हांला सक्षम करावे, त्या कारणासाठी प्रार्थना करा. BSB BSB: Therefore, the one who speaks in a tongue should pray that he may interpret.
14 UDB कोणीएक अशा भाषेत प्रार्थना करतो तर त्याचा आत्मा निश्चितपणे प्रार्थना करतो, पण त्याचे मन तसे करत नाही. BSB BSB: For if I pray in a tongue, my spirit prays, but my mind is unfruitful.
15 UDB म्हणूनच, आम्ही आमच्या आत्म्याने प्रार्थना केली पाहीजे, परंतु आमच्या बुद्धीनेही प्रार्थना केली पाहीजे. आणि त्याचप्रमाणे आम्ही गातो तर देवाची स्तुती करतो. BSB BSB: What then shall I do? I will pray with my spirit, but I will also pray with my mind. I will sing with my spirit, but I will also sing with my mind.
16 UDB तुम्ही केवळ तुमच्या आत्म्यातच देवाची स्तुती करण्याचा आग्रह धरला, तर तुम्ही काय म्हणत आहात हे बाहेरील व्यक्तीला कधीच समजणार नाही, आणि त्या संदेशाशी सहमत होण्यास तो कधीही सक्षम होणार नाही. BSB BSB: Otherwise, if you speak a blessing in spirit, how can someone who is uninstructed say “Amen” to your thanksgiving, since he does not know what you are saying?
17 UDB कारण तुम्ही आत्म्याने देवाचा धन्यवाद कराल तर हे बरे आहे आणि तुमच्यासाठी चांगले होईल, परंतु तुम्ही इतर विश्वासणाऱ्यांची मदत करत नाही. BSB BSB: You may be giving thanks well enough, but the other one is not edified.
18 UDB मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुमच्या कोणापेक्षाही अधिक भाषा बोलतो. BSB BSB: I thank God that I speak in tongues more than all of you.
19 UDB परंतु मंडळीला खूप बोलण्याऐवजी, देवाने मला दिलेल्या अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, शब्दांनी मी शिकवू शकतो म्हणून, मी केवळ माझ्या मनातील पाच शब्द बोलू इच्छितो. BSB BSB: But in the church, I would rather speak five coherent words to instruct others than ten thousand words in a tongue.
20 UDB बंधूनो आणि भगिनींनो, लहान मुले जे अनेक प्रकारचे पाप करत नाहीत त्यासारखे तुम्ही झाले पाहीजे. परंतु तुम्ही स्वतःबद्दल आणि देवबद्दल विचार करता, तेव्हा तुम्ही मुलासारखे विचार करू नये, तर चांगले विचार करावे. BSB BSB: Brothers, stop thinking like children. In regard to evil be infants, but in your thinking be mature.
21 UDB देव म्हणतो ते नियमशास्त्रात लिहिले आहे, “विदेशी व अन्य भाषांमध्ये जे बोलता त्या पुरूषांद्वारे, मी माझ्या इस्त्राएल लोकांशी बोलेन; आणि तरीसुद्धा माझे लोक मला समजू शकणार नाहीत.” BSB BSB: It is written in the Law: “By strange tongues and foreign lips I will speak to this people, but even then they will not listen to Me, says the Lord.”
22 UDB म्हणून एखादा विश्वासणारा देवाने त्याला दिलेल्या एखाद्या भाषेत बोलतो आहे, तर हे बोलणे ऐकत असलेल्या अविश्वासूला कदाचित प्रभावित करते. परंतु देवापासून आलेला एक संदेश एखादा विश्वासणारा बोलत असेल, तर हे इतर विश्वासणाऱ्यांना प्रभावित करते. BSB BSB: Tongues, then, are a sign, not for believers, but for unbelievers. Prophecy, however, is for believers, not for unbelievers.
23 UDB सर्व विश्वासणारे एकमेकांशी एकत्र भेटले आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलले तर किती गोंधळात टाकणारे ते असेल हे तुम्ही पाहू शकता. कोणात्याही अविश्वासूने त्यांना ऐकले तर तो त्या सर्वांना वेडे आहेत असे म्हणेल. BSB BSB: So if the whole church comes together and everyone speaks in tongues, and some who are uninstructed or some unbelievers come in, will they not say that you are out of your minds?
24 UDB परंतु तुम्ही सर्वजणांनी देवापासून आलेल्या सत्य संदेशाना आळिपाळीने सांगितले तर, तर कोणत्याही अविश्वासूला कळून येईल की त्याने देवाविरूद्ध पाप केल्यामुळे तो दोषी आहे. BSB BSB: But if an unbeliever or uninstructed person comes in while everyone is prophesying, he will be convicted and called to account by all,
25 UDB या अविश्वासूने खरोखर काय विचार केला होता हे देव तेथे असलेल्या इतर लोकांस सांगेल. मग तो चकीत आणि भयभयीत होऊन आपल्या तोंडावर जमिनीवर पालथा पडेल, आणि तो देवाची स्तुती करीत आणि “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” असे म्हणेल. BSB BSB: and the secrets of his heart will be made known. So he will fall facedown and worship God, proclaiming, “God is truly among you!”
26 UDB बंधूनो आणि भगिनींनो, तुम्ही एकत्र येऊन देवाची उपासना करता तेव्हा ते ह्याप्रकारच्या मार्गाने असावे. तुमच्यापैकी प्रत्येकजणांनी गाण्यास एक स्तोत्र सोबत आणले पाहीजे, किंवा वचनातून काहीतरी शिकवण्यास, किंवा देवाने तुम्हाला सांगितले आहे त्याबद्दल काहीतरी सांगण्यास, किंवा देवाने दिलेल्या भाषेतील एखादा संदेश सांगण्यास, किंवा अशा एका संदेशाचा अर्थ लावण्यास तयार असावे. तुम्ही ख्रिस्ताची मंडळी आहात, म्हणून सर्वकाही एकत्रित तुम्ही करता तेव्हा एकमेकांना उत्तेजन द्यावे. BSB BSB: What then shall we say, brothers? When you come together, everyone has a psalm or a teaching, a revelation, a tongue, or an interpretation. All of these must be done to build up the church.
27 UDB देवापासून आलेल्या एका संदेशाला अन्य भाषेतून कोणी बोलण्याची इच्छा तेथे धरत असेल, तर असे दोन किंवा तीन व्यक्तीपेक्षा आधिक तेथे नसावे. त्यांनी एकावेळी एकानेच बोलावे, आणि कोणीतरी त्या संदेशाचा अर्थ सांगायला हवा. BSB BSB: If anyone speaks in a tongue, two, or at most three, should speak in turn, and someone must interpret.
28 UDB तथापि, त्या संदेशाचा अर्थ लावण्यासाठी तेथे कोणीही सक्षम नसेल, तर मग देवापासून येणाऱ्या भाषेतून बोलणाऱ्याने गप्प बसावे आणि केवळ देवाशीच बोलावे. BSB BSB: But if there is no interpreter, he should remain silent in the church and speak only to himself and God.
29 UDB देवापासून आलेल्या एका संदेशाला तेथे कोणाला बोलण्याची इच्छा असेल, तर केवळ दोन किंवा तीन अशा व्यक्ती तेथे असाव्यात; आणि शास्त्रलेख काय सांगते त्यानुसार त्या संदेशाची बाकीच्या प्रत्येकांनी परीक्षा करायला हवी. BSB BSB: Two or three prophets should speak, and the others should weigh carefully what is said.
30 UDB परंतु देवाने मंडळीमध्ये बसलेल्यांपैकी कुणाला तरी संदेश उमजून सांगण्यासाठी परवानगी दिली असेल, तर मग जो संदेश देत होता त्याने गप्प बसले पाहिजे. ह्याप्रकारे, सर्व विश्वासणारे त्या संदेशाचा अर्थ ऐकू शकतात. BSB BSB: And if a revelation comes to someone who is seated, the first speaker should stop.
31 UDB प्रत्येकजण जे देवाच्या संदेशांची घोषणा करतात त्यांनी असे केलेच पाहीजे. परंतु सर्व विश्वासणारे शिकू शकतील आणि देवावर प्रेम अधिक धैर्य प्राप्त करतील म्हणून त्यांनी तसे एक एक करुन केले पाहीजे. BSB BSB: For you can all prophesy in turn so that everyone may be instructed and encouraged.
32 UDB जे सत्यतेने देवाच्या संदेशाला बोलतात त्या प्रत्येकांनी आत्मा जसा त्यांना चालवतो त्यानुसार चालावे. BSB BSB: The spirits of prophets are subject to prophets.
33 UDB कारण देव गोंधळ निर्माण करीत नाही; त्याऐवजी, तो शांती प्रस्थापित करतो. देवाने ज्यांना अगोदरच नेमले होते व त्याच्या स्वतःसाठी वेगळे केले, त्या सर्व मंडळ्यामध्ये आम्ही हे असे करतो: BSB BSB: For God is not a God of disorder, but of peace—as in all the churches of the saints.
35 UDB स्त्रीयांना शिकण्याची इच्छा असेल, तर तेव्हा उपासनेत व्यत्यय आणण्याऐवजी, त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे. कारण सेवेत व्यत्यय आणणे हे एका महिलेसाठी तिच्या पतीचा अपमान करणे आहे. BSB BSB: If they wish to inquire about something, they are to ask their own husbands at home; for it is dishonorable for a woman to speak in the church.
36 UDB ज्या लोकांद्वारे देवाने त्याचे वचन आम्हांला दिले ते लोक तुम्ही होता काय? किंवा ते केवळ तुमच्यापर्यंतच आले आहे काय? BSB BSB: Did the word of God originate with you? Or are you the only ones it has reached?
37 UDB तुमच्यामध्ये कोणीही संदेष्टा किंवा कोणीही आत्मिक असेल, तर देवाने आज्ञापिलेल्या गोष्टींना मी लिहित आहेत, हे तो समजून घेईल, आणि मी जे काय लिहिले आहे त्यानुसार तो चालेल. BSB BSB: If anyone considers himself a prophet or spiritual person, let him acknowledge that what I am writing you is the Lord’s command.
38 UDB परंतु मी जे काय लिहिले आहे त्याला जर कोणी कबूल करत नसेल, तर तुम्ही त्याला कबूल करू नये. BSB BSB: But if anyone ignores this, he himself will be ignored.
39 UDB म्हणून, बंधूनो आणि भगिनींनो, मनःपूर्वक इच्छेसह मंडळीला देवाचे संदेश सांगा; आणि देवाने दिलेल्या भाषेतून बोलण्यापासून कोणालाही मना करू नका. BSB BSB: So, my brothers, be eager to prophesy, and do not forbid speaking in tongues.
40 UDB मंडळीच्या उपासनेत जे सर्वकाही तुम्ही करता, सभ्यतेसह आणि योग्य क्रमाने पार पाडावे. BSB BSB: But everything must be done in a proper and orderly manner.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.