1 UDB माझ्या भावांनो आणि बहिनींनो, मी तुमच्या सोबत असता, देवा विषयीचे कठीण सत्य ऐकण्यासाठी तुम्ही तयार नव्हता. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीनच जोडले गेलेल्या लहान मुलांप्रमाणे असता तर कदाचीत मी तुमच्याशी तसे बोललो असतो. BSB BSB: Brothers, I could not address you as spiritual, but as worldly—as infants in Christ.
2 UDB जशी एक आई आपल्या बाळाला दुध पाजते त्याच प्रकारे, मी तुम्हांस समजण्यास सोप्या होतील अशा गोष्टी शिकवल्या. कारण तुम्ही मांस खाण्यास तयार नव्हता. आणि आता देखील, तुम्ही तयार नाही. BSB BSB: I gave you milk, not solid food, for you were not yet ready for solid food. In fact, you are still not ready,
3 UDB जरी तुम्ही ख्रिस्ती आहात, तरी अजूनही तुम्ही अविश्वासणाऱ्यांसारखे वागता. हे मला ठाऊक आहे, कारण तुम्हापैकी पुष्कळजण एकमेकांचा हेवा करता, आणि भांडखोरपणे वागता, आणि जणूकाय तुम्ही अजूनही अविश्वासणारेच असल्याप्रमाणे न्यायनिवाडा करता. BSB BSB: for you are still worldly. For since there is jealousy and dissension among you, are you not worldly? Are you not walking in the way of man?
4 UDB तुम्ही मंडळीला फाडून तिचे तुकडे करत आहात, कारण तुमच्यातील काहीजण म्हणतात मी, पौलाने काय शिकवले, तेच आम्ही अनुसरण करीत आहोत; इतर म्हणतात अपुल्लोसाने काय शिकवले तेच आम्ही अनुसरण करीत आहोत. तुम्ही अविश्वासणाऱ्यांप्रमाणे वर्तन करीत आहात. BSB BSB: For when one of you says, “I follow Paul,” and another, “I follow Apollos,” are you not mere men?
5 UDB देवाने तुमच्या जीवनात जे महान कार्य केले त्या तुलनेत, अपुल्लोसाचे महत्व काहीच नाही. पौल देखिल महत्वाचा नाही. आम्ही दोघेही सेवक आहोत, आणि ज्याने आम्हाला नियुक्त केले त्याच देवाची आम्ही सेवा करतो. BSB BSB: What then is Apollos? And what is Paul? They are servants through whom you believed, as the Lord has assigned to each his role.
6 UDB जरी तुमच्यामध्ये देवाच्या वचनाचे बी पेरणारा मी जरी प्रथम होतो तरी सुद्धा, तो अपुल्लोसच होता ज्याने तुम्हाला विश्वासात वाढण्याची खात्री दिली. परंतु केवळ देवच तो होता जो तुमची आत्मिक वाढ होऊ देतो. BSB BSB: I planted the seed and Apollos watered it, but God made it grow.
7 UDB मला हे पुन्हा सांगु द्या: कोणी एक बी पेरतो आणि त्याला पाणी घालतो, कमीत कमी ह्याने आम्हाला काही फरक पडत नाही, केवळ देव तो आहे जो वाढ होऊ देतो. त्याने लावलेल्या एका बागेप्रमाणे तुम्ही आहात. BSB BSB: So neither he who plants nor he who waters is anything, but only God, who makes things grow.
8 UDB एखादा पेरतो आणि एखादा पाणी घालतो दोघेही सारखेच काम करतात, आणि ह्याचे प्रतिफळ म्हणून प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या वेतन देण्यात येईल. प्रत्येकाने किती कठीण परिश्रम केले त्याच्या मोजमापानूसार त्याने रक्कम भरली आहे. BSB BSB: He who plants and he who waters are one in purpose, and each will be rewarded according to his own labor.
9 UDB आम्ही दोघे देवा बरोबर एकत्र कार्य करत आहोत आणि आम्ही दोघेही देवाचे आहोत. परंतु तुमच्यासाठी, देव तुम्हाला त्याच्या शेतात वाढवत आहे. हे जणुकाय तो त्याला राहण्यासाठी तुमची बांधनी करून तुम्हाला वाढवत आहे. BSB BSB: For we are God’s fellow workers; you are God’s field, God’s building.
10 UDB देवासाठी करावयाचे कार्य त्याने मला मोफत सोपवून दिले आहे. मी तुम्हामध्ये बांधणी करण्यात पारंगत असलेल्यासारखे अतिशय काळजी पूर्वक परिश्रम केले. पण माझ्यानंतर कोणीतरी ज्याची मी सुरुवात केली त्या आधारावर बांधनी करील. इतरांनी आधीच जे केले त्यावरच प्रत्येकजण बांधतो. परंतु ते कसे बांधतात ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. BSB BSB: By the grace God has given me, I laid a foundation as an expert builder, and someone else is building on it. But each one must be careful how he builds.
11 UDB एक पाया जो अगोदरच तयार करून ठेवलेला आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पाया घातला जाऊ शकत नाही. तो पाया म्हणजे येशू ख्रिस्त होय. BSB BSB: For no one can lay a foundation other than the one already laid, which is Jesus Christ.
12 UDB त्या पायाच्या शीर्षस्थानी काय ठेवायचे ते निवडणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे आम्ही आहोत. बांधकाम करणारे सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत, आणि वाळलेला पेंढा ह्यापासून बनलेले साहित्य गोळा करतात. BSB BSB: If anyone builds on this foundation using gold, silver, precious stones, wood, hay, or straw,
13 UDB देव आमच्या कामाचा न्याय करील आणि आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्यासाठी काय काम केले हे सर्वांना दिसेल असे करील. आम्ही केलेल्या कार्याची तपासनी करण्यासाठी तो अग्नी पाठवील. देवासाठी आम्ही किती कठीण परिश्रम केले हे केवळ तो अग्नीच त्याला दाखवून देईल. BSB BSB: his workmanship will be evident, because the Day will bring it to light. It will be revealed with fire, and the fire will prove the quality of each man’s work.
14 UDB एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामाची अग्नीद्वारे चाचणी होऊन देखील जर त्याचे काम टिकून राहीले, तर त्याला त्याच्या कामाचे प्रतिफळ मिळेल. BSB BSB: If what he has built survives, he will receive a reward.
15 UDB परंतु अग्नीने जर त्याचे सर्व काम जाळून टाकले तर, तो आपले सर्व प्रतिफळ गमावून टाकील, परंतु तरीही देव त्याला वाचवील. त्याने केलेले प्रत्येक काम अग्नीने जरी खाऊन टाकले तरीसूद्धा. BSB BSB: If it is burned up, he will suffer loss. He himself will be saved, but only as if through the flames.
16 UDB तुम्ही त्याचे मंदिर आहात जेथे देव वसतो ती जागा तुम्ही आहात हे खात्रीने तुम्हाला माहित आहे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला खात्रीने माहीत असावे. BSB BSB: Do you not know that you yourselves are God’s temple, and that God’s Spirit dwells in you?
17 UDB जो कोणी त्याचे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न करील त्याला तो नष्ट करील हे देवाने अभिवचन दिले आहे. ह्याचे कारण हे आहे की त्याचे मंदिर केवळ त्याच्याच मालकीचे आहे. आणि त्याच अभिवचनाने तो तुमचे रक्षण करतो, कारण आता तुम्ही त्याचे मंदिर आहात, आणि तुम्ही केवळ त्याच्याच मालकीचे आहात! BSB BSB: If anyone destroys God’s temple, God will destroy him; for God’s temple is holy, and you are that temple.
18 UDB तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नये म्हणून सांभाळा. आपल्याला अविश्वाणाऱ्यापेक्षा अतिशय जास्त ज्ञान आहे, असे जर तुमच्यापैकी एखादा विचार करत असेल तर त्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अविश्वासणाऱ्यांना ज्या गोष्टी पाहीजे त्यापासून जर तो दूर होऊन एकटा राहिला, व असे करण्यासाठी त्यांनी त्याला मुर्ख समजले तरी ते बरे होईल. तो ह्या गोष्टींपासून दूर राहील तेव्हा, खरे ज्ञान काय आहे हे शिकण्यास तो आरंभ करील. BSB BSB: Let no one deceive himself. If any of you thinks he is wise in this age, he should become a fool, so that he may become wise.
19 UDB ज्याला जग महान ज्ञान समजते, त्याला देव खरोखर मुर्खपणा समजतो. कारण शास्त्रलेख सांगते, “देव ज्ञान्यांना त्यांच्या मुर्खपणाच्या योजनेमध्येच पकडतो.” BSB BSB: For the wisdom of this world is foolishness in God’s sight. As it is written: “He catches the wise in their craftiness.”
20 UDB आणि पुन्हा शास्त्रलेख सांगतो, “देव ज्ञान्यांच्या सर्व योजना ऐकतो, आणि त्यांचा शेवट देखील त्याला ठाऊक आहे, ते सर्वकाही गमावतील.” BSB BSB: And again, “The Lord knows that the thoughts of the wise are futile.”
21 UDB म्हणून अविश्वासणाऱ्यांचे पाहीजे तसे कौतुक करणे थांबवा, त्या गोष्टी करण्याबद्दल अभिमान बाळगणे देखील थांबवा. कारण देवाने तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या आहेत. त्याची तुलना अविश्वासणारे तुम्हाला जे काही देतील त्याच्याशी कशी करू शकता? BSB BSB: Therefore, stop boasting in men. All things are yours,
22 UDB देवाने तुमच्यासाठी पौलाला दिले आहे, आणि त्याने अपुल्लोस, आणि पेत्राला देखील तुमच्यासाठी दिले आहे. आणि देवाने हे जग, आणि तुमचे जीवन, आणि मरणावर त्याचा विजय तुम्हाला दिलेला आहे. देवाने जे सर्वकाही आता आहे आणि जे सर्वकाही भविष्यात असेल—ते तुम्हाला दिले आहे व ते सर्वकाही तुमचेच आहे; BSB BSB: whether Paul or Apollos or Cephas or the world or life or death or the present or the future. All of them belong to you,
23 UDB आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात; आणि ख्रिस्त देवाचा आहे. BSB BSB: and you belong to Christ, and Christ belongs to God.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.