1 UDB माझ्या विश्वासातील बंधूनो, तुम्हाला माहिती आहे की तुमच्याबरोबरचा आमचा वेळ अगदी मौल्यवान होता. BSB BSB: You yourselves know, brothers, that our visit to you was not in vain.
2 UDB जरी फिलिप्पै शहरातील लोकांनी पूर्वी आमच्याशी वाईट वागणुक केली आणि आमचा अपमान केला, तरी देव आमच्या धैर्याचे कारण होता हे तुम्ही जाणता. याचा परिणाम असा झाला की, देवाने जे तुम्हास सांगण्यास पाठवले होते; जरी तुमच्या शहरातील काही लोकांनी आम्हांस विरोध केला तरी तो शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितला. BSB BSB: As you are aware, we had already endured suffering and shameful treatment in Philippi. But in the face of strong opposition, we were bold in our God to speak to you the gospel of God.
3 UDB जेव्हा आम्ही तुम्हांला देवाचे वचन पालन करण्यासाठी उत्तेजन दिले, तेव्हा आम्ही तुमच्याशी खोटे असे काही बोललो नाही. आणि अनैतिक मार्गांनी आम्ही स्वत: साठी काही मिळवू इच्छिले नाही किंवा आम्ही तुम्हाला व इतर कोणालाही फसवण्याचा प्रयत्नही केला नाही. BSB BSB: For our appeal does not arise from deceit or ulterior motives or trickery.
4 UDB उलट, तुम्हाला सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हावर भरोसा ठेवला, कारण त्याने आम्हांला पारखले आणि आम्ही हे काम करण्यास योग्य लोक असल्याचे त्याने समजले. आम्ही लोकांना शिकवतो तेव्हा, त्यांना जे ऐकावेसे वाटते ते आम्ही बोलत नाही. उलट, देव जे आमच्याशी बोलतो, ते आम्ही सांगतो, कारण आमच्या सर्व विचारांची तो पारख करतो. BSB BSB: Instead, we speak as those approved by God to be entrusted with the gospel, not in order to please men but God, who examines our hearts.
5 UDB तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडून काहीही मिळविण्यासाठी आम्ही तुमची स्तुती करीत नाही, आणि कुठलीही गोष्ट देण्याबद्दल आम्ही तुम्हाला राजी केले नाही. हे सत्य आहे, देवाला माहित आहे. BSB BSB: As you know, we never used words of flattery or any pretext for greed. God is our witness!
6 UDB किंवा तुमच्या कडून काही घेण्याचा प्रयत्न केला अथवा तुमच्यातील कोणीही आमचा आदर करावा असे इच्छीले नाही, जेव्हा की, आम्हास ख्रिस्ताने पाठवले आहे, ह्याकारणास्तव आम्ही तुमच्याकडे काहीही मागणी करू शकलो असतो. BSB BSB: Nor did we seek praise from you or from anyone else, although as apostles of Christ we had authority to demand it.
7 UDB याउलट, ज्या प्रकारे एखादी आई आपल्या स्वतःच्या बाळाची काळजी करते, त्याप्रमाणे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य असे होतो. BSB BSB: On the contrary, we were gentle among you, like a nursing mother caring for her children.
8 UDB कारण आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, म्हणून देवाने दिलेली सुवार्ता वैयक्तिकरित्या आपल्याला सांगत असतांना आम्हांला आनंद झाला. आम्ही तुमच्याकरता जे काही करू शकलो ते सर्व काही करण्यास आम्हांला आनंद झाला कारण आम्ही तुम्हावर खूप प्रेम करायला सुरूवात केली आहे. BSB BSB: We cared so deeply that we were delighted to share with you not only the gospel of God, but our own lives as well. That is how beloved you have become to us.
9 UDB माझ्या सहविश्वासू बंधूनो, तुम्हाला ठाऊक आहे की आम्ही दिवसभर आणि रात्रीही कसे कष्टाने काम केले. अशा प्रकारे आम्ही पैशांची कमाई केली, जेणेकरून आम्हांला आवश्यक असलेल्या गोष्टी देण्यासाठी आम्हांला आपल्यापैकी कोणासही विचारण्याची गरज भासणार नाही. आम्ही देवाकडून आलेली सुवार्ता सांगत असतांना ह्या गोष्टी केल्या. BSB BSB: Surely you recall, brothers, our labor and toil. We worked night and day so that we would not be a burden to anyone while we proclaimed to you the gospel of God.
10 UDB तुम्हा विश्वासणाऱ्यांप्रती आम्ही चांगले आणि योग्य असे जीवन जगलो आहे, अशासाठी की कोणीही टीका करू नये, हे देवाला आणि तुम्हालाही ठाऊक आहे. BSB BSB: You are witnesses, and so is God, of how holy, righteous, and blameless our conduct was among you who believed.
11 UDB तुम्हाला हे देखील ठाऊक आहे की, तुमच्यातील प्रत्येकाशी आपल्या मुलांवर जसे प्रेम करावे अशा पित्याप्रमाणे आम्ही तुमच्याशी वागलो. BSB BSB: For you know that we treated each of you as a father treats his own children—
12 UDB तुम्ही देवाच्या लोकांसारखे असावे, यासाठी आम्ही सदैव तुम्हास जोरदारपणे उत्तेजीत आणि प्रोत्साहित करतो, कारण त्याने तुम्हास त्याचे लोक होण्यास निवडले आहे, ज्यांना तो त्याच्या महान सामर्थ्याने स्वत:स राजा असे प्रगट करील. BSB BSB: encouraging you, comforting you, and urging you to walk in a manner worthy of God, who calls you into His own kingdom and glory.
13 UDB ह्याकारणास्तव आम्ही देवाचे आभार मानतो, अशासाठी की आम्ही सांगितलेली सुवार्ता जेव्हा तुम्ही ऐकली व खऱ्या वचनास अंगीकारले आहे. असे वचन जे देवाने आम्हास दिले आहे. आम्हा स्वत:कडून ते बोलावले गेले नाही. आम्ही देवाचे यासाठी ही आभार मानतो की तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवल्या कारणाने, तो तुमचे जीवनात बदलत आहे. BSB BSB: And we continually thank God because, when you received the word of God that you heard from us, you accepted it not as the word of men, but as it truly is, the word of God, which is also now at work in you who believe.
14 UDB आम्ही या गोष्टींविषयी निश्चित आहोत कारण तुम्ही यहूदीयातील विश्वासू बांधवांच्या कृत्यांप्रमाणे कार्य केले आहे. जेव्हा ख्रिस्ता मुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तणूक केली, अशाच रितीने, जेव्हा तुमच्या सहकाऱ्यांनी तुमच्याशी गैरवर्तणूक केली आणि ती तुम्ही सहन केली आणि ते सहन करण्याद्वारे ते देखील ख्रिस्त येशूमध्ये सामील झाले आहेत. BSB BSB: For you, brothers, became imitators of the churches of God in Judea that are in Christ Jesus. You suffered from your own countrymen the very things they suffered from the Jews,
15 UDB त्या यहूदी लोकांनी सुद्धा प्रभू येशू आणि अनेक संदेष्ट्यांना ठार मारले होते. आणि इतर गैरयहूदीयांनी आम्हास पुष्कळ गावे सोडून जाण्यास भाग पाडले. जे सर्व मनुष्यास चांगले आहे, त्याच्या विरुद्धात त्यांनी काम करुन, देवाला क्रोधीत केले आहे. BSB BSB: who killed both the Lord Jesus and their own prophets and drove us out as well. They are displeasing to God and hostile to all men,
16 UDB उदाहरणार्थ, ते आम्हांला गैरयहूद्यांना सुवार्ता सांगण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात, देवाने त्यांना वाचवावे अशी त्यांची बिलकूल इच्छा नाही. त्यांनी एवढे पाप केले आहे की, त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे. BSB BSB: hindering us from telling the Gentiles how they may be saved. As a result, they continue to heap up their sins to full capacity; the utmost wrath has come upon them.
17 UDB माझ्या विश्वासातील बंधूनो, आपल्यापासून थोड्या काळासाठी जरी आम्ही दूर गेलो तरी आईवडीलांचे बाळ हरवावे असे आम्हास वाटते. आम्हांला तुमच्यासोबत राहण्याची तीव्र इच्छा आहे. BSB BSB: Brothers, although we were torn away from you for a short time (in person, not in heart), our desire to see you face to face was even more intense.
18 UDB ह्याच कारणास्तव, मी, पौल, तुम्हाला पाहण्यासाठी दुसऱ्यांदा तुमच्याकडे परत येण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येक वेळी सैतानाने आम्हास परत येण्यापासून रोखले. BSB BSB: For we wanted to come to you—indeed I, Paul, tried again and again—but Satan obstructed us.
19 UDB खरंच, तुम्ही असल्या कारणाने आम्ही अशी आशा करतो की देवाचे काम व्यवस्थीत चालू आहे, आम्हांला हर्षीत करणारे तुम्हीच आहात. तुम्ही असल्या कारणाने आम्ही आशा करतो की, देवाची सेवा करण्यात आम्ही यशस्वी झालो. हे आपल्यामुळे तसेच इतरांच्यामुळेही आहे की आम्ही आशा करतो की प्रभू येशू जेव्हा पृथ्वीवर परत येईल तेव्हा आपल्याला प्रतिफळ देईल. BSB BSB: After all, who is our hope, our joy, our crown of boasting, if it is not you yourselves in the presence of our Lord Jesus at His coming?
20 UDB खरंच, तुमच्यामुळेच आजही आम्ही प्रसन्न झालो आणि आनंदी आहोत! BSB BSB: You are indeed our glory and our joy.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.