1 UDB माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, ज्याअर्थी तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, जो सर्वाहून खूप उंच आहे, तर तुम्ही पक्षपाताने लोकांचा आदर करणे थांबवा. BSB BSB: My brothers, as you hold out your faith in our glorious Lord Jesus Christ, do not show favoritism.
2 UDB उदाहरणार्थ कोणी सोन्याची आंगठी घातलेला, शोभायमान वस्त्रे घातलेला असा माणूस जर तुमच्या सभास्थानांत आला, आणि फाटकी वस्त्रे घातलेला दरिद्रीहि जर आंत आला, BSB BSB: Suppose a man comes into your meeting wearing a gold ring and fine clothes, and a poor man in shabby clothes also comes in.
3 UDB आणि जर तुम्ही शोभायमान वस्त्रे घातलेल्या कडे लक्ष देऊन म्हणता की, तु येथे चांगल्या ठिकाणी बैस, परंतू दरिद्य्राला म्हणता की, तू तेथे उभा राहा, अथवा येथे माझ्या पदासनाजवळ खाली बैस, BSB BSB: If you lavish attention on the man in fine clothes and say, “Here is a seat of honor,” but say to the poor man, “You must stand” or “Sit at my feet,”
4 UDB तर तुम्ही भेदभावाने एकमेकांचा न्याय करता. BSB BSB: have you not discriminated among yourselves and become judges with evil thoughts?
5 UDB माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणींनो ऐका! ज्यांची कवडीमोल अशी देखील किंमत नाही अशा गरिब लोकांनाच देवाने विश्वासात श्रीमंत होण्यासाठी निवडले आहे. म्हणजेच तो जेव्हा सर्वांवर राज्य करेल तेव्हा त्यांना अद्भूत अशा गोष्टी देणार. त्याने त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी असे करण्याचे वचन दिले आहे. BSB BSB: Listen, my beloved brothers: Has not God chosen the poor of this world to be rich in faith and to inherit the kingdom He promised those who love Him?
6 UDB पण तुम्ही तर गरीब मनुष्याला तुच्छ लेखिले! जरा ह्या गोष्टीचा विचार करा, तुमची पिळवणूक करणारे श्रीमंत लोकच नाहीत काय आणि तुम्हांला न्यायालयात नेणारे तेच लोक नाहीत काय? BSB BSB: But you have dishonored the poor. Is it not the rich who oppress you and drag you into court?
7 UDB आणि हेच ते लोक आहेत जे येशू ख्रिस्त, जो स्तुतिच्या योग्य आहे, आणि ज्याचे नाव तुम्हाला देण्यात आले त्याच्याबद्दल निंदा करतात. BSB BSB: Are they not the ones who blaspheme the noble name by which you have been called?
8 UDB आपला येशू ख्रिस्त प्रभू ह्याने पवित्रशास्त्रात आज्ञा दिली आहे, की जशी तुम्ही स्वत:वर प्रीति करता तशीच तुम्ही इतरांवरही प्रीती करा.” याचा अर्थ असा की हे तुम्ही पाळता तर तुम्ही योग्य करता. BSB BSB: If you really fulfill the royal law stated in Scripture, “Love your neighbor as yourself,” you are doing well.
9 UDB पण जर तुम्ही पक्षपात करून इतरांपेक्षा काही लोकांचाच आदर करता तर तुम्ही देवाच्या आज्ञा मोडता व चूकीचे करता. आणि नियम मोडण्याचा दोष तुमच्यावर येतो. BSB BSB: But if you show favoritism, you sin and are convicted by the law as transgressors.
10 UDB कारण जर कोणी संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करतो पण एका नियमाबाबतीत चुकतो, तर याचा अर्थ असा की तो देवाच्या संपूर्ण नियमशास्त्राबाबतीत दोषी ठरतो. BSB BSB: Whoever keeps the whole law but stumbles at just one point is guilty of breaking all of it.
11 UDB उदाहरणार्थ, “व्यभिचार करू नको” असे जो देव म्हणाला, “तो असे सुद्धा म्हणाला की, “खून करू नको.” म्हणून जर तुम्ही व्यभिचार करीत नाही पण खून करता तर तुम्ही ती व्यक्ती बनता जी देवाचे नियमशास्त्र मोडते. BSB BSB: For He who said, “Do not commit adultery,” also said, “Do not murder.” If you do not commit adultery, but do commit murder, you have become a lawbreaker.
12 UDB तर नेहमी इतरांबद्दल अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे शिक्षा होणाऱ्या आपल्याला पापांपासून स्वातंत्र्य मिळते. BSB BSB: Speak and act as those who are going to be judged by the law that gives freedom.
13 UDB जो दयाळूपणे वागला नसेल त्याचा न्यायही देव त्याच्यावर दया न दाखविताच करील. पण जर आपण इतरांप्रती दयाळू असू तर देव आपला न्याय करेल तेव्हा आपणास घाबरण्याची गरज नाही. BSB BSB: For judgment without mercy will be shown to anyone who has not been merciful. Mercy triumphs over judgment.
15 UDB जर एखादा बंधू किंवा भगिनी यांना कपड्यांची आवश्यकता असेल व त्यांना रोजचे अन्नसुद्धा मिळत नसेल; BSB BSB: Suppose a brother or sister is without clothes and daily food.
16 UDB आणि तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो, “देवबाप तुम्हांला आशीर्वाद देवो! उबदार कपडे घाला आणि चांगले खा.” पण तुम्ही त्यांच्या शरीराला जे आवश्यक ते देत नाही, तर तो काय चांगले करतो? BSB BSB: If one of you tells him, “Go in peace; stay warm and well fed,” but does not provide for his physical needs, what good is that?
17 UDB त्याचप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृतीची जोड नसेल तर तो केवळ एक मृत असाच विश्वास असेल, तर मग तुम्ही खरोखरच ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. BSB BSB: So too, faith by itself, if it does not result in action, is dead.
18 UDB पण एखादा मला म्हणेल, देवावर विश्वास ठेवल्याने आणि इतरांप्रती चांगली कृत्ये केल्याने देव काही लोकांचे तारण करेल. तेव्हा मी त्याला उत्तर देईन, “देवावर विश्वास ठेवणारे लोक जर इतरांसाठी चांगले कृत्य करीत नाहीत, तर ते देवामध्ये खरोखर विश्वास ठेवतात हे तुम्ही मला सिद्ध करून दाखवू शकत नाही. परंतु इतरांसाठी चांगले कार्य करण्याद्वारे मी हे सिद्ध करेन की मी खरोखर देवावर भरवसा ठेवतो. BSB BSB: But someone will say, “You have faith and I have deeds.” Show me your faith without deeds, and I will show you my faith by my deeds.
20 UDB अरे मूढ माणसा, जो कोणी असे बोलतो की मी देवाच्याठायी विश्वास ठेवतो, परंतू चांगली कृत्ये करीत नाही, तर तो जे काही बोलतो ते वायफळ बोलने आहे. BSB BSB: O foolish man, do you want evidence that faith without deeds is worthless?
21 UDB आपला पूर्वज अब्राहाम ह्याला देवाने जे काही आज्ञापीले ते करण्याचा प्रयत्न केला, त्याने त्याचा पुत्र इसहाक याला वेदीवर परमेश्वराला अर्पण करण्याची तयारी दर्शविली, तेव्हा त्याच्या या कामामुळे तो देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरला नाही काय? BSB BSB: Was not our father Abraham justified by what he did when he offered his son Isaac on the altar?
22 UDB अशाच तऱ्हेने, अब्राहामाच्या कृतीमध्ये देवासाठी विश्वाससुद्धा बरोबरीने कार्यरत होता व त्याचा विश्वास त्याच्या कृतीमुळे पूर्ण झाला. BSB BSB: You see that his faith was working with his actions, and his faith was perfected by what he did.
23 UDB आणि अशा रीतीने पवित्र शास्त्र जे सांगते, ते परिपूणे झाले की,“अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास हा त्याचे नीतिमत्त्व मोजला गेला.” आणि त्या कारणामुळे त्याला “देवाचा मित्र” असे म्हटले गेले. BSB BSB: And the Scripture was fulfilled that says, “Abraham believed God, and it was credited to him as righteousness,” and he was called a friend of God.
25 UDB त्याचप्रमाणे राहाब वेश्येने इस्राएली हेरांना आसरा देऊन, काही वेळानंतर निराळया वाटेने तेथून निसटून जाण्यासाठी मदत केली, कारण तीने जासूंदाप्रती काळजी व्यक्त केली जे त्या देशावर हेरगिरी करण्यास आले होते. तेव्हा ही कृती तिचे नीतिमत्त्व मानले गेले. BSB BSB: In the same way, was not even Rahab the prostitute justified by her actions when she welcomed the spies and sent them off on another route?
26 UDB म्हणून, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती श्वासोच्छ्वास करत नसेल तर तो मृत असा आहे आणि त्याचे शरीर हे निरर्थक असे गणले जाते, त्याचप्रमाणे जो असे म्हणतो की माझा देवाच्याठायी विश्वास आहे परंतू तो कृत्यांवाचून मेलेला असेल तर तो देखील निरर्थक असा आहे. BSB BSB: As the body without the spirit is dead, so faith without deeds is dead.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.