1 UDB माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, तुमच्यापैकी पुष्कळजण देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याची इच्छा धरतात, तर तुम्हांला माहीत असायला पाहिजे की जे आपण शिक्षक आहोत त्या आपला सर्वांचा इतरांपेक्षा काटेकोरपणे न्याय होईल. BSB BSB: Not many of you should become teachers, my brothers, because you know that we who teach will be judged more strictly.
2 UDB कारण आपण पुष्कळ पापे करतो परंतू जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो जे उच्चारतो त्या प्रमाणे परिपूर्ण मनुष्य आहे. ते त्यांच्या सर्व कृत्यांना वश करू शकतील. BSB BSB: We all stumble in many ways. If anyone is never at fault in what he says, he is a perfect man, able to control his whole body.
3 UDB उदाहरणार्थ, आपण घोड्यांच्या तोंडांना लगाम घालतो यासाठी की, त्यांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात आणि त्या लगामाने आपण त्याचे संपूर्ण शरीर नियंत्रणात करून जिथे पाहिजे तिथे वळवू शकतो, BSB BSB: When we put bits into the mouths of horses to make them obey us, we can guide the whole animal.
4 UDB किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले व जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते व त्याच्या साहाय्याने नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते. BSB BSB: Consider ships as well. Although they are so large and are driven by strong winds, they are steered by a very small rudder wherever the pilot is inclined.
5 UDB त्याचप्रकारे जीभ ही शरीराचा लहानसा भाग आहे, पण जर तिला ताब्यात ठेवता आले नाही तर तिच्या बोलण्याद्वारे आपण लोकांना जखमा करू शकतो. फक्त विचार करा, कितीतरी मोठे जंगल लहानशा आगीने पेट घेते! BSB BSB: In the same way, the tongue is a small part of the body, but it boasts of great things. Consider how small a spark sets a great forest ablaze.
6 UDB होय, ज्या प्रकारे लहानशी आग ही जंगलास भस्म करते त्याच प्रकारे जीभ देखील पुष्कळ लोकांना नष्ट करणारी ज्वाला आहे. आपल्या बोलण्याद्वारे आपणाला किती वाईट हे प्रगट होते. आणि आपण जे काही बोलतो त्याद्वारे आपले विचार आणि कृती विटाळते. ज्या प्रकारे एक छोटीशी ठिणगी सभोवताल्या परिसरास भस्म करण्यासाठी कारणीभूत ठरते त्याच प्रकारे जीभ ही आपल्याला अपवित्र करते व आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते, ती तर नरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते. BSB BSB: The tongue also is a fire, a world of wickedness among the parts of the body. It pollutes the whole person, sets the course of his life on fire, and is itself set on fire by hell.
7 UDB जरी पशू, पक्षी, सरपटणारे जीवजंतु, साप आणि समुद्रातील निरनिराळ्या जातीचे जीव माणूस पाळू शकतो आणि प्रत्यक्षात त्याने तसे केले आहे. BSB BSB: All kinds of animals, birds, reptiles, and creatures of the sea are being tamed and have been tamed by man,
8 UDB पण कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. आणि जेव्हा लोक आपल्या जीभेद्वारे वाईट बोलतात तेव्हा आपणास कळते की ते स्वत:वर ताबा न मिळवता येत असल्याने अशा वाईट गोष्टी बोलतात. जसे सापाचे विष लोकांना मारून टाकते, तसेच आपण जे काही बोलतो ते इतरांना हानी पोहचवू शकते. BSB BSB: but no man can tame the tongue. It is a restless evil, full of deadly poison.
9 UDB देव जो आपला प्रभू आणि स्वर्गीय पिता याची स्तुती आपण आपल्या जिभेने करतो आणि त्याच जीभेने आपण इतरांचे वाईट व्हावे म्हणून देवाजवळ मागतो. जे की फार चूकाचे आहे, कारण देवाने मनुष्यास आपल्या सारखे बनवीले आहे. BSB BSB: With the tongue we bless our Lord and Father, and with it we curse men, who have been made in God’s likeness.
10 UDB आम्ही देवाची स्तुती करतो, पण त्याच तोंडाने आपण इतरांबद्दल वाईट गोष्टींची मागणी देखील करतो, माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, हे असे असू नये. BSB BSB: Out of the same mouth come blessing and cursing. My brothers, this should not be!
11 UDB एकाच झऱ्यातून गोड व कडू पाणी येऊ शकत नाही. BSB BSB: Can both fresh water and salt water flow from the same spring?
12 UDB माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, अंजिराच्या झाडाला जैतुनाची फळे येतील काय? किंवा द्राक्षवेलीला अंजिर लागतील काय? कधीच नाही. तसेच खारट पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी येऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे, आपण जे चांगले तेच आपण बोलले पाहिजे, आणि जे वाईट आहे ते तोंडातून बोलू नये. BSB BSB: My brothers, can a fig tree grow olives, or a grapevine bear figs? Neither can a salt spring produce fresh water.
13 UDB तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे अशासाठी की आपल्या चांगल्या कृत्यांमुळे तुम्ही विवेकी आहात असे लोकांस दिसून यावे. कारण शाहाणपणाने राहणे हे आपल्याला इतरांशी प्रेमळपणे वागण्यास मदत करते. BSB BSB: Who is wise and understanding among you? Let him show it by his good conduct, by deeds done in the humility that comes from wisdom.
14 UDB पण जर तुमच्या ह्रदयात कटूता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू नका आणि खरेपणाविरुद्ध लबाडी करू नका. BSB BSB: But if you harbor bitter jealousy and selfish ambition in your hearts, do not boast in it or deny the truth.
15 UDB जे अशा प्रकारचे शहाणपण विचारात आणतात, ते शहाणपण देवाकडून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे, जे फक्त विचारांद्वारे आणि कृतीद्वारे देवाला आदर न देणारे असे आहेत. ते त्यांच्या स्वतःच्या मनाला इच्छील असे आपल्या मनात विचार आणि कृती करतात. सैतान त्यांना जे करावयास लावतो तेच ते करतात. BSB BSB: Such wisdom does not come from above, but is earthly, unspiritual, demonic.
16 UDB हे लक्षात ठेवा की जे लोक असे दृष्टिकोन बाळगतात ते स्वतःचे नियंत्रण करीत नाहीत. ते प्रत्येक प्रकारचे वाईट करतात, इतर लोकांकडून घेतात आणि असा देखावा करतात की ते बरोबर करत आहेत, जे की ते चूकीचे असतात. BSB BSB: For where jealousy and selfish ambition exist, there will be disorder and every evil practice.
17 UDB पण लोक जेव्हा देवाकडून लाभलेल्या शहाणपणाने शहाणे होतात, तेव्हा ते मुळात पवित्र जे की देवाच्या नजरेत खूप महत्वाचे असणारे, शांतीप्रीय जीवन जगण्यास इतरांची मदत करणारे, लोकांच्या काय गरजा आहेत त्याकडे ते आपले लक्ष केंद्रीत करणारे, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे, तसेच ते पक्षपात न करणारे व निष्कपट असे बनतात. BSB BSB: But the wisdom from above is first of all pure, then peace-loving, gentle, accommodating, full of mercy and good fruit, impartial, and sincere.
18 UDB जे लोक शांततेच्या मार्गाने शांती स्थापन करण्याचा प्रयत्न करतात ते इतरांना शांतीने वागण्यास कारणीभूत ठरतात. याचा परिणाम असा होती की ते सर्व नीतिपूर्ण कृत्यांनी वागतात. BSB BSB: Peacemakers who sow in peace reap the fruit of righteousness.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.