1 UDB आता, वल्हांडण सण सुरू होण्या आधीचा तो दिवस होता. येशूला आपल्या पित्याकडे परत जाण्याची आणि या जगाला सोडण्याची त्याची वेळ आली आहे हे माहित होते. या जगात जे त्याच्याबरोबर होते त्यांच्यावर त्यांनी किती प्रीती केली, आणि त्याच्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्याने त्यांच्यावर प्रीती केली हे त्याने दाखवून दिले. BSB BSB: It was now just before the Passover Feast, and Jesus knew that His hour had come to leave this world and return to the Father. Having loved His own who were in the world, He loved them to the very end.
2 UDB येशू आणि त्याचे शिष्य त्यांचे रात्रीचे भोजन घेण्याआधी, येशूला धरून त्याच्या शत्रूंच्या हाती द्यावे असे विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात आधीच घातले होते. BSB BSB: The evening meal was underway, and the devil had already put into the heart of Judas, the son of Simon Iscariot, to betray Jesus.
3 UDB पित्याने येशूला पूर्ण शक्ती आणि सर्व गोष्टींवर पूर्ण अधिकार दिला आहे हे त्याला आधीच माहित होते. तो स्वतः देवाकडून आला आहे आणि देवाकडे लवकरच परत जाईल हे देखील त्याला माहित होते. BSB BSB: Jesus knew that the Father had delivered all things into His hands, and that He had come from God and was returning to God.
4 UDB येशू भोजनावरून उठला. त्याने आपली बाह्यवस्त्रे काढली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधले. BSB BSB: So He got up from the supper, laid aside His outer garments, and wrapped a towel around His waist.
5 UDB त्याने एका गंगाळात थोडे पाणी ओतले आणि शिष्यांचे पाय धुवायला सुरूवात केली आणि त्या कापडाने पुसून त्यांच्या पायांना कोरडे करू लागला. BSB BSB: After that, He poured water into a basin and began to wash the disciples’ feet and dry them with the towel that was around Him.
6 UDB मग तो शिमोन पेत्राकडे आला, जो त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुण्यासाठी येता काय?” BSB BSB: He came to Simon Peter, who asked Him, “Lord, are You going to wash my feet?”
7 UDB येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुमच्यासाठी काय करत आहे, ते तुला आता समजणार नाही, परंतु नंतर तुला ते कळेल.” BSB BSB: Jesus replied, “You do not realize now what I am doing, but later you will understand.”
8 UDB पेत्र म्हणाला, “आपणास माझे पाय कधीही धुवू देणार नाही!” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुझा माझा काही संबंध नाही.” BSB BSB: “Never shall You wash my feet!” Peter told Him. Jesus answered, “Unless I wash you, you have no part with Me.”
9 UDB म्हणून शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका! माझे हात धुवा आणि माझे डोके देखील धुवा!” BSB BSB: “Then, Lord,” Simon Peter replied, “not only my feet, but my hands and my head as well!”
10 UDB येशू त्याला म्हणाला, “ज्याने स्नान केले आहे तर त्याला केवळ पाय धुण्याची आवश्यकता आहे. त्याचे उर्वरित शरीर आधीच स्वच्छ आहे. तुम्ही स्वच्छ आहात, परंतु तुम्ही सर्व नाही.” BSB BSB: Jesus told him, “Whoever has already bathed needs only to wash his feet, and he will be completely clean. And you are clean, though not all of you.”
11 UDB त्याला धरून देणारा कोण आहे हे त्याला माहित होते. यामुळे तो म्हणाला “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.” BSB BSB: For He knew who would betray Him. That is why He said, “Not all of you are clean.”
12 UDB त्याने त्यांचे पाय धुऊन झाल्यानंतर, त्याने आपली बाह्यवस्त्रे पुन्हा घातली. मग तो पुन्हा त्याच्या जागी बसला आणि म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय केले आहे ते तुम्हाला समजले काय? BSB BSB: When Jesus had washed their feet and put on His outer garments, He reclined with them again and asked, “Do you know what I have done for you?
13 UDB तुम्ही मला ‘गुरूजी’ आणि ‘प्रभू’ म्हणता. तर तुम्ही हे बरोबर म्हणता, कारण मी तसाच आहे. BSB BSB: You call Me Teacher and Lord, and rightly so, because I am.
14 UDB मी तुमचा गुरू आणि प्रभू असून तुमचे पाय धुतले तर तुम्ही देखील एकमेकांचे पाय धुवावेत. BSB BSB: So if I, your Lord and Teacher, have washed your feet, you also should wash one another’s feet.
15 UDB जसे मी तुमच्यासाठी केले तसे तुम्ही केले पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे अनुसरण्यासाठी एक उदाहरण दिले आहे. BSB BSB: I have set you an example so that you should do as I have done for you.
16 UDB मी तुम्हाला खरे सांगतो: एक दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही, किंवा एका संदेशवाहकाला ज्याने पाठवले त्या पाठवणाऱ्यापेक्षा तो मोठा नाही. BSB BSB: Truly, truly, I tell you, no servant is greater than his master, nor is a messenger greater than the one who sent him.
17 UDB जर तुम्हाला या गोष्टी माहित आहेत, तुम्ही त्या कराल तर, तुम्ही किती धन्य व्हाल. BSB BSB: If you know these things, you will be blessed if you do them.
18 UDB मी तुमच्या सर्वांबद्दल हे बोलत नाही. मी ज्याला निवडले आहे त्याला मी ओळखतो. तथापि, शास्त्रलेखामध्ये जे काय लिहिले आहे ते झाले पाहिजे: ‘एक मित्र म्हणून ज्याने माझ्याबरोबर माझी भाकर खाल्ली, तोच माझ्याविरुध्द गेला आहे आणि मला एका शत्रूप्रमाणे वागवले आहे.’ BSB BSB: I am not speaking about all of you; I know whom I have chosen. But this is to fulfill the Scripture: ‘The one who shares My bread has lifted up his heel against Me.’
19 UDB आता ते होईल तेव्हा मी देव आहे यावर तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून त्याने मला त्यांना धरून देण्यापूर्वीच मी तुम्हाला हे सांगत आहे. BSB BSB: I am telling you now before it happens, so that when it comes to pass, you will believe that I am He.
20 UDB मी तुम्हाला खरे सांगतो: मी ज्याला तुमच्याकडे पाठवतो त्याचा स्वीकार तुम्ही केला, तर तुम्ही माझा देखील स्वीकार करत आहात; आणि जो कोणी मला स्वीकारतो, तर ज्याने मला पाठवले आहे त्या माझ्या पित्याचा देखील स्वीकार करतो.” BSB BSB: Truly, truly, I tell you, whoever receives the one I send receives Me, and whoever receives Me receives the One who sent Me.”
21 UDB येशूने हे बोलल्यानंतर, तो त्याच्या स्वतःमध्ये अस्वस्थ झाला. त्याने गंभीरतेने घोषीत केले, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: तुमच्यापैकी एकजण मला माझ्या शत्रूच्या हाती धरून देणार आहे.” BSB BSB: After Jesus had said this, He became troubled in spirit and testified, “Truly, truly, I tell you, one of you will betray Me.”
22 UDB शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्यापैकी कोणाविषयी तो बोलत आहे याबद्दल ते गोंधळून गेले होते. BSB BSB: The disciples looked at one another, perplexed as to which of them He meant.
23 UDB शिष्यांतील एक जण, ज्याला येशू विशेषकरून प्रीती करत असे, तो योहान, येशूच्या उराशी टेकलेला होता. BSB BSB: One of His disciples, the one whom Jesus loved, was reclining at His side.
24 UDB येशू कोणत्या शिष्याविषयी बोलत होता हे त्याने त्याला विचारले पाहिजे असे शिमोन पेत्राने योहानाकडे खुणावून म्हटले. BSB BSB: So Simon Peter motioned to him to ask Jesus which one He was talking about.
25 UDB म्हणून योहान येशूच्या सामोरे झाला आणि शांतपणे त्याला विचारले, “प्रभूजी, तो कोण आहे?” BSB BSB: Leaning back against Jesus, he asked, “Lord, who is it?”
26 UDB येशूने उत्तर दिले, “मी या वाटीत हा भाकरीचा तुकडा वाटीत बुडविल्यानंतर ज्याला देईन तोच तो एक आहे.” मग त्याने भाकरीचा तुकडा वाटीत बुडवून घेतला आणि तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याला दिला. BSB BSB: Jesus answered, “It is the one to whom I give this morsel after I have dipped it.” Then He dipped the morsel and gave it to Judas son of Simon Iscariot.
27 UDB यहूदाने जसेच त्या भाकरीच्या तुकडयाला घेतले, लागलीच सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि त्याचा ताबा घेतला. येशू त्याला म्हणाला, “तुला जे करावयाची आवश्यकता आहे, ते लवकर करून टाक.” BSB BSB: And when Judas had taken the morsel, Satan entered into him. Then Jesus said to Judas, “What you are about to do, do quickly.”
28 UDB येशू त्याला असे का म्हणाला होता हे मेजावर बसलेल्या एकालाही समजले नाही. BSB BSB: But no one at the table knew why Jesus had said this to him.
29 UDB काहींना वाटले की कारण यहूदाजवळ पैशांची थैली होती, म्हणून येशू त्याला सांगतो आहे की, जा आणि वल्हांडण सणाच्या आवश्यक गोष्टी विकत घे. येशू गरिबांना काहीतरी देण्याकरिता यहूदाला सांगत होता असे इतरांना वाटले. BSB BSB: Since Judas kept the money bag, some thought that Jesus was telling him to buy what was needed for the feast, or to give something to the poor.
30 UDB भाकरीचा तुकडा घेतल्यानंतर, यहूदा त्याच क्षणी बाहेर निघून गेला. त्यावेळी रात्र होती. BSB BSB: As soon as he had received the morsel, Judas went out into the night.
31 UDB यहूदा बाहेर गेल्यानंतर, येशू म्हणाला, “आता मी, मनुष्याचा पुत्र, मी काय करत आहे देव त्याच्याबद्दल लोकांना कळवेल. तसेच देव काय करत आहे त्याबद्दल मी सुध्दा लोकांना कळवणार आहे आणि लोक त्यासाठी त्याची स्तुती करतील. BSB BSB: When Judas had gone out, Jesus said, “Now the Son of Man is glorified, and God is glorified in Him.
32 UDB मी, मनुष्याचा पुत्र, लोकांना देवाशी ओळख करून देणार आहे आणि मी जसे त्याला सन्मान देत आलो आहे तसेच देव देखील मला सन्मानित करणार आहे. देव विलंब न लावता असे करणार आहे. BSB BSB: If God is glorified in Him, God will also glorify the Son in Himself—and will glorify Him at once.
33 UDB लहान मुलानों, मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल; परंतु, मी जसे यहूद्यांना सांगितले, आणि मी तुम्हाला देखील सांगतो, जेथे मी जात आहे, तेथे तुम्हाला येता येणार नाही. BSB BSB: Little children, I am with you only a little while longer. You will look for Me, and as I said to the Jews, so now I say to you: ‘Where I am going, you cannot come.’
35 UDB जर तुम्ही एकमेकांवर प्रीती केली, तर तुम्ही माझे शिष्य आहात हे सर्व लोकांना माहित होईल.” BSB BSB: By this everyone will know that you are My disciples, if you love one another.”
36 UDB शिमोन पेत्राने त्याला म्हटले, “प्रभूजी, आपण कोठे जात आहात?” येशूने उत्तर दिले, “जेथे मी जात आहे, तेथे आता तुला माझ्याबरोबर येता येत नाही; परंतु नंतर तू येशील.” BSB BSB: “Lord, where are You going?” Simon Peter asked. Jesus answered, “Where I am going, you cannot follow Me now, but you will follow later.”
37 UDB पेत्र म्हणाला, “प्रभूजी, मी आताच आपणाबरोबर का येऊ शकत नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण देईन! BSB BSB: “Lord,” said Peter, “why can’t I follow You now? I will lay down my life for You.”
38 UDB येशूने उत्तर दिले, “पेत्रा, खरोखर माझ्यासाठी तू आपला प्राण देशील काय? मी तुला खरे सांगतो: तू मला ओळखत नाहीस असे तू तीन वेळा म्हणशील त्याआधी सकाळी कोंबडा आरवणार नाही!” BSB BSB: “Will you lay down your life for Me?” Jesus replied. “Truly, truly, I tell you, before the rooster crows, you will deny Me three times.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.