1 UDB एक आठवडाभर चालणारा वल्हांडण नावाचा सण साजरा करण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक होता. त्या दिवसांमध्ये ते आणखी एक सण साजरा करत असत. त्या सणाला ते खमिर न घातलेल्या भाकरीचा सण असे म्हणत असत. मुख्य याजक आणि यहूदी नियमशास्त्र शिकवणारे लोक येशूला गुप्तपणे अटक कशी करावी आणि त्याला ठार कसे करावे याविषयीची योजना आखत होते. BSB BSB: Now the Passover and the Feast of Unleavened Bread were two days away, and the chief priests and scribes were looking for a covert way to arrest Jesus and kill Him.
2 UDB परंतु ते एकमेकांना असे म्हणत होते की, “आपण हे कार्य सणाच्या दिवसांमध्ये करू नये कारण तसे केले तर लोक आपल्यावर खूप रागावतील आणि कदाचित दंगल घडेल.” BSB BSB: “But not during the feast,” they said, “or there may be a riot among the people.”
3 UDB येशू बेथानी या गावामध्ये शिमोनाच्या घरी होता त्याला कोडी देखील म्हणत असत. ते जेवण करत असतांना एक स्त्री त्याच्याकडे आली. तिच्या हातामध्ये एक दगडाची बरणी होती आणि त्या बरणीमध्ये अतिशय मोलवान सुगंधित अत्तर होते ज्याचे नाव जटामांसी असे होते. तिने ती बरणी उघडली आणि त्यातील सर्व अत्तर येशूच्या डोक्यावर ओतले. BSB BSB: While Jesus was in Bethany reclining at the table in the home of Simon the Leper, a woman came with an alabaster jar of expensive perfume, made of pure nard. She broke open the jar and poured it on Jesus’ head.
4 UDB तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांना राग आला आणि ते स्वतःशी असे म्हणाले, “त्या अत्तराची किती नासधूस केली आहे!” BSB BSB: Some of those present, however, expressed their indignation to one another: “Why this waste of perfume?
5 UDB ते कदाचित वर्षभराच्या मजुरी एवढ्या किमतीत विकता आले असते आणि त्यातून जो पैसा आला असता तो गरीब लोकांना देता आला असता!”म्हणून त्या लोकांनी तिला रागावले. BSB BSB: It could have been sold for over three hundred denarii and the money given to the poor.” And they scolded her.
6 UDB परंतु येशू म्हणाला, “तिला रागावणे बंद करा! तिने माझ्यासाठी जे काही केले आहे ते अतिशय योग्य आहे असे मी मानतो. म्हणून तुम्ही तिला अधिक त्रास देऊ नका. BSB BSB: But Jesus said, “Leave her alone; why are you bothering her? She has done a beautiful deed to Me.
7 UDB तुम्हामध्ये गरीब लोक तर नेहमीच असणार आहेत. म्हणून तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. परंतु मी येथे तुम्हासोबत फार जास्त वेळ राहणार नाही. BSB BSB: The poor you will always have with you, and you can help them whenever you want. But you will not always have Me.
8 UDB तिला जे करावयाचे होते ते तिने अतिशय योग्य असे केले आहे. मी लवकरच मरणार आहे. हे जणू काय तिला माहिती झाले आहे म्हणून तिने माझा देह पुरण्या अगोदरच तयार करण्यासाठी माझ्या शरीरावर अभिषेक केला आहे. BSB BSB: She has done what she could to anoint My body in advance of My burial.
9 UDB मी तुम्हाला हे सांगतो: संपूर्ण जगामध्ये जेथे कोठे माझे अनुयायी शुभवर्तमानाची घोषणा करतील ते त्या-त्या ठिकाणी हिने माझ्यासाठी काय केले तेही सांगतील आणि लोक तिची आठवण करतील.” BSB BSB: And truly I tell you, wherever the gospel is preached in all the world, what she has done will also be told in memory of her.”
10 UDB मग यहूदा इस्कार्योत हा मुख्य याजकाकडे गेला आणि येशूला कसे धरून देता येईल यात कशा प्रकारे त्यांची मदत होऊ शकते याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली. तो येशूच्या बारा शिष्यांपैकी एक शिष्य असूनही त्याने हे कार्य केले! BSB BSB: Then Judas Iscariot, one of the Twelve, went to the chief priests to betray Jesus to them.
11 UDB मुख्य याजकांनी हे ऐकले तेव्हा ते अतिशय आनंदित झाले. कारण तो त्यांना मदत करण्यास इच्छा दर्शवत होता. त्याच्या मोबदल्यात ते एक मोठी पैशांची रक्कम त्याला देतील. यहूदा त्याला मान्य झाला आणि येशूला त्यांच्या हाती देण्याची संधी तो पाहू लागला. BSB BSB: They were delighted to hear this, and they promised to give him money. So Judas began to look for an opportunity to betray Jesus.
12 UDB सणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्याला बेखमीर भाकरीचा सण असे म्हणतात. त्या दिवशी ते वल्हांडणाकरीता एका कोकऱ्याला ठार करतात, येशूचे शिष्य त्याला म्हणाले “वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी आम्ही कोठे जावे आणि आपणासाठी जेवण तयार करावे अशी तुझी इच्छा आहे?” BSB BSB: On the first day of the Feast of Unleavened Bread, when the Passover lamb was to be sacrificed, Jesus’ disciples asked Him, “Where do You want us to prepare for You to eat the Passover?”
13 UDB मग येशूने आपल्या शिष्यांपैकी दोघांना तयारी करण्यासाठी निवड केली. तो त्यांना म्हणाला, “यरूशलेमेत जा. एक मनुष्य तेथे तुम्हाला भेटेल त्याच्या हातामध्ये पाण्याने भरलेला एक मोठे रांजन असेल. त्याच्या मागे जा. BSB BSB: So He sent two of His disciples and told them, “Go into the city, and a man carrying a jug of water will meet you. Follow him,
14 UDB तो जेव्हा एका घरात शिरेल तेव्हा त्या घराच्या मालकाला असे म्हणा आम्हा शिष्यांसोबत वल्हांडणाचे भोजन करावे अशी आमच्या गुरुजींची इच्छा आहे. त्या करीता तू आम्हांला खोली दाखव. BSB BSB: and whichever house he enters, say to the owner, ‘The Teacher asks: Where is My guest room, where I may eat the Passover with My disciples?’
15 UDB घराच्या वरच्या माळ्यावरील एक मोठी खोली तो तुम्हाला दाखवेल. ती खोली तयार केलेली आहे आणि तेथे आपण जेवण करू शकतो. मग तेथे तुम्ही आपल्यासाठी जेवण तयार करा.” BSB BSB: And he will show you a large upper room, furnished and ready. Make preparations for us there.”
16 UDB अशा रितीने ते दोन शिष्य कार्य करण्यास पुढे गेले. ते शहरात गेले आणि त्याने त्यांना जे सर्व सांगितले होते तसेच त्यांना आढळले. वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी त्यांनी तेथे भोजन तयार केले. BSB BSB: So the disciples left and went into the city, where they found everything as Jesus had described. And they prepared the Passover.
17 UDB संध्याकाळ झाल्यानंतर येशू आपल्या बारा शिष्यांसहीत त्या घरी पोहोंचला. BSB BSB: When evening came, Jesus arrived with the Twelve.
18 UDB बारा शिष्य तेथे बसून जेवण करत असतांना, येशू म्हणाला, “तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका: माझ्या शत्रूंनी मला अटक करावी यासाठी तुमच्यापैकी एक व्यक्ती त्यांना मदत करणार आहे. येथे माझ्यासोबत जेवणाऱ्यामध्येच तो एक व्यक्ती बसलेला आहे.” BSB BSB: And while they were reclining and eating, Jesus said, “Truly I tell you, one of you who is eating with Me will betray Me.”
19 UDB हे ऐकूण शिष्य अतिशय दुःखी झाले आणि ते त्याला एकामागून एक असे म्हणाले, “खात्रीने मी तो नाही!” BSB BSB: They began to be grieved and to ask Him one after another, “Surely not I?”
20 UDB त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्हा बारा शिष्यांपैकी तो एक आहे, तो सध्या माझ्यासोबत ताटामध्ये भाकर मोडून घास खात आहे. BSB BSB: He answered, “It is one of the Twelve—the one who is dipping his hand into the bowl with Me.
21 UDB मनुष्याच्या पुत्राने मरावे हे निश्चित केलेले आहे कारण हे माझ्याविषयी लिहिलेले आहे. परंतु जो मनुष्य माझा विश्वासघात करतो त्याच्यासाठी भयंकर शासन ठेवलेले आहे. त्याचा जन्मच झाला नसता तर फार बरे झाले असते!” BSB BSB: The Son of Man will go just as it is written about Him, but woe to that man by whom He is betrayed! It would be better for him if he had not been born.”
22 UDB ते जेवण करत असतांना त्याने एका हातात भाकर घेतली आणि त्याबद्दल देवाचे आभार मानले. त्यानंतर तिचे तुकडे-तुकडे केले आणि त्यांना दिले आणि तो त्यांना म्हणाला, “ही भाकर माझे शरीर आहे. ही घ्या आणि ती खा.” BSB BSB: While they were eating, Jesus took bread, spoke a blessing and broke it, and gave it to the disciples, saying, “Take it; this is My body.”
23 UDB हे झाल्यानंतर ज्या प्यालामध्ये द्राक्षरस होता तो त्याने घेतला आणि त्यासाठी त्याने देवाचे आभार मानले. मग त्याने तो प्याला त्या सर्वांना दिला आणि ते सर्व त्यातून प्याले. BSB BSB: Then He took the cup, gave thanks, and gave it to them, and they all drank from it.
24 UDB तो त्यांना म्हणाला, “हा द्राक्षरस माझे रक्त आहे. माझे शत्रू मला ठार करतील तेव्हा ते वाहणार आहे. देवाने बऱ्याच लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी जो करार तयार केला आहे तो माझ्या रक्ताने निश्चित केला जाईल. BSB BSB: He said to them, “This is My blood of the covenant, which is poured out for many.
25 UDB तुम्ही हे जाणावे अशी माझी इच्छा आहे. देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करेल तेव्हा मी द्राक्षरस पेईन तो पर्यंत मी द्राक्षारस पिणार नाही.” BSB BSB: Truly I tell you, I will no longer drink of the fruit of the vine until that day when I drink it anew in the kingdom of God.”
26 UDB त्यानंतर त्यांनी एक गीत गायले आणि ते जैतूनांच्या डोंगराकडे निघून गेले. BSB BSB: And when they had sung a hymn, they went out to the Mount of Olives.
27 UDB ते आपल्या मार्गामध्ये असतांना येशूने त्यांना म्हटले, देव माझ्याविषयी जे काही म्हणाला ते त्यांनी शास्त्रलेखात लिहून ठेवले आहे, ‘मी मेंढपाळांना ठार करेन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ माझ्याविषयी लिहून ठेवण्यात आलेले हे शब्द खरे ठरतील. तुम्ही मला सोडून पळून जाल. BSB BSB: Then Jesus said to them, “You will all fall away, for it is written: ‘I will strike the Shepherd, and the sheep will be scattered.’
28 UDB परंतु देव जेव्हा मला पुन्हा जिवंत करेल मी तुम्हापुढे गालील जिल्ह्यात जाईन आणि तेथे मी तुम्हाला भेटेन.” BSB BSB: But after I have risen, I will go ahead of you into Galilee.”
29 UDB मग पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले, “कदाचित सर्व शिष्य तुला सोडून देतील परंतु मी सोडणार नाही! मी तुला कधीही सोडणार नाही!” BSB BSB: Peter declared, “Even if all fall away, I never will.”
30 UDB मग येशूने त्याला म्हटले, “परंतु खरे हे आहे, की आज रात्री कोंबडा दोनदा आरवण्यापूर्वी तू मला ओळखत नाहीस असे तीनदा तू माझा नाकार करशील!” BSB BSB: “Truly I tell you,” Jesus replied, “this very night, before the rooster crows twice, you will deny Me three times.”
31 UDB परंतु पेत्र त्याला जोर देऊन हे सांगू लागला की, “त्यांनी मला ठार जरी केले तरी मी तुला ओळखत नाही असे नाकारणार नाही!” आणि इतर सर्व शिष्यांनी ही असेच म्हटले. BSB BSB: But Peter kept insisting, “Even if I have to die with You, I will never deny You.” And all the others said the same thing.
33 UDB मग त्याने पेत्र याकोब आणि योहानाला आपल्यासोबत घेतले. आणि तो अतिशय तळमळला. BSB BSB: He took with Him Peter, James, and John, and began to be deeply troubled and distressed.
34 UDB तो त्यांना म्हणाला, “मी अतिशय दुःखी झालो आहे. मी मरत आहे की काय इतक्या प्रमाणात मी दुःखी आहे. तुम्ही पुरूष येथे थांबा आणि लक्ष ठेवा!” BSB BSB: Then He said to them, “My soul is consumed with sorrow to the point of death. Stay here and keep watch.”
35 UDB तो आणखी थोडा पुढे गेला आणि तो जमिनीवर पालथा पडला. आणि मग त्याने प्रार्थना केली की शक्य असल्यास त्याला दुःख सहन करावे लागू नये. BSB BSB: Going a little farther, He fell to the ground and prayed that, if it were possible, the hour would pass from Him.
37 UDB मग तो परत आला आणि त्याचे शिष्य झोपलेले आहेत असे त्याला दिसले. त्याने त्यांना झोपेतून उठवले आणि तो त्यांना म्हणाला, “शिमोना, तू झोपत आहेस काय? तू थोडा वेळासाठी ही जागा राहू शकला नाहीस?” BSB BSB: Then Jesus returned and found them sleeping. “Simon, are you asleep?” He asked. “Were you not able to keep watch for one hour?
38 UDB आणि तो त्यांना म्हणाला, “मी जे म्हणतो ते तुम्हाला करावेसे वाटते परंतु तुम्ही शरीराने अशक्त आहात. म्हणून तुम्ही जागे राहा आणि प्रार्थना करत राहा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडाल तेव्हा तुम्हाला विरोध करता येईल!” BSB BSB: Watch and pray so that you will not enter into temptation. For the spirit is willing, but the body is weak.”
39 UDB म्हणून तो पुन्हा परत गेला आणि त्याने आधी जी प्रार्थना केली होती तिच प्रार्थना पुन्हा केली. BSB BSB: Again He went away and prayed, saying the same thing.
40 UDB जेव्हा तो परत आला. तेव्हा त्याला ते पुन्हा झोपी गेलेले दिसले. त्यांना ऐवढी झोप आली होती की ते आपले डोळे ही उघडू शकले नाही. जेव्हा त्याने त्यांना झोपेतून जागे केले त्यावेळेस त्यांना ऐवढी लाज वाटली की त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेनासे झाले. BSB BSB: And again Jesus returned and found them sleeping, for their eyes were heavy. And they did not know what to answer Him.
41 UDB मग तो पुन्हा परत गेला आणि त्याने पुन्हा प्रार्थना केली. तीसऱ्या वेळेस जेव्हा तो परत आला तेव्हा ते त्याला पुन्हा झोपी गेलेले दिसले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आताही झोपलेले आहात काय? ही त्याची वेळ नाही. माझे दुःख सहन करण्याच्या वेळेची सुरूवात होत आहे. पाहा! मनुष्याचा पुत्र धरून देण्यात यावा यासाठी पापी लोकांना कोणीतरी सहाय्य करणार आहे. BSB BSB: When Jesus returned the third time, He said, “Are you still sleeping and resting? That is enough! The hour has come. Look, the Son of Man is betrayed into the hands of sinners.
42 UDB म्हणून आता ऊठा! चला आता जाऊया! पाहा! मला धरून देण्यासाठी मदत करणारा आला आहे!” BSB BSB: Rise, let us go. See, My betrayer is approaching!”
43 UDB तो हे बोलत असतांनाच यहूदा तेथे पोहचला. येशूच्या बारा शिष्यांपैकी एक शिष्य तो होता असे असूनही येशूच्या शत्रूंनी येशूला धरून द्यावे यासाठी तो त्यांना मदत करत होता. त्याच्यासोबत लोक तलवारी व भाले घेऊन आले होते. यहूदी सभास्थानाच्या पुढाऱ्यांनी त्या मनुष्यांना पाठवले होते. BSB BSB: While Jesus was still speaking, Judas, one of the Twelve, arrived, accompanied by a crowd armed with swords and clubs, sent from the chief priests, scribes, and elders.
44 UDB येशूचा विश्वासघात करणाऱ्या यहूदाने त्या लोकांच्या समुदायाला अगोदरच सांगून ठेवले होते की, “तुम्हाला ज्या व्यक्तिला धरायचे आहे, मी त्या व्यक्तीचे चुंबन घेईन. जेव्हा मी त्याचे चुंबन घेईन तेव्हा तुम्ही त्याला धरा आणि दूर घेऊन जा.” BSB BSB: Now the betrayer had arranged a signal with them: “The One I kiss is the man; arrest Him and lead Him away securely.”
45 UDB यहूदा येशूला धरण्यासाठी आला असता लगेचच तो येशूच्या जवळ गेला आणि त्याने म्हटले, “अहो गुरूजी!” आणि मग त्याने येशूचे चुंबन घेतले. BSB BSB: Going directly to Jesus, he said, “Rabbi!” and kissed Him.
46 UDB मग त्या लोकांनी येशूला पकडले. BSB BSB: Then the men seized Jesus and arrested Him.
47 UDB परंतु त्यांच्या जवळच उभ्या असणाऱ्या येशूच्या शिष्यांपैकी एकाने आपली तलवार ऊपसली आणि मुख्य याजकाच्या एका सेवकावर त्याने हल्ला केला, तो वार केल्यामुळे त्याचा केवळ कान कापल्या गेला. BSB BSB: And one of the bystanders drew his sword and struck the servant of the high priest, cutting off his ear.
48 UDB येशूने त्यांना म्हटले, “मी जणुकाय एखादा दरोडेखोर आहे असा समज करून तुम्ही मला पकडण्यासाठी तलवारी आणि भाले घेऊन येता हे किती वेडेपणाचे आहे. दररोज मंदिराच्या अंगणामध्ये मी लोकांना शिकवत होतो! तुम्ही मला तेव्हा का अटक केली नाही? परंतु हे सर्व यासाठी घडत आहे, की संदेष्ट्यांनी शास्त्रलेखांमध्ये माझ्या विषयी लिहिलेले सर्व काही खरे व्हावे.” BSB BSB: Jesus asked the crowd, “Have you come out with swords and clubs to arrest Me as you would an outlaw?
50 UDB त्या वेळेस त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. BSB BSB: Then everyone deserted Him and fled.
51 UDB त्या वेळेस एक तरुण येशूच्या मागे मागे चालत होता. त्याने त्याच्या शरीराभोवती केवळ एक तागाचे वस्त्र गुंडाळलेले होते. लोकांनी त्याला धरले, तेव्हा BSB BSB: One young man who had been following Jesus was wearing a linen cloth around his body. They caught hold of him,
52 UDB त्यांच्यापासून दूर पळून जाण्यासाठी त्याने स्वतःला झटका दिला आणि त्यांच्या हाती तागाचे वस्त्र मागे राहिले आणि तो नग्न अवस्थेतच पळून गेला. BSB BSB: but he pulled free of the linen cloth and ran away naked.
53 UDB ज्या लोकांनी येशूला पकडले होते ते त्याला घेऊन मुख्य याजकाच्या घरी गेले. त्याच्या घरी यहूदी लोकांची संपूर्ण धर्मसभा एकत्र झालेली होती. BSB BSB: They led Jesus away to the high priest, and all the chief priests, elders, and scribes assembled.
54 UDB येशूच्या मागे मागे थोडे अंतर ठेवून पेत्र जात होता. मुख्य याजक ज्या घरात राहत असे त्याच्या घराच्या अंगणात पेत्र गेला आणि मुख्य याजकाच्या घराचे रक्षण करणाऱ्या लोकांसोबत जाऊन बसला. शेकोटीच्या बाजुला बसून तो स्वतःला शेकत होता. BSB BSB: Peter followed Him at a distance, right into the courtyard of the high priest. And he sat with the officers and warmed himself by the fire.
55 UDB येशूला ठार करावे या उद्देशाने यहूदी धर्मसभेच्या लोकांनी येशूविषयी खोटे बोलणारे काही लोक जमवले होते. त्या धर्मसभेत मुख्य याजक आणि इतर यहूदी पुढारी होते. परंतु त्यांना यश येत नव्हते, BSB BSB: Now the chief priests and the whole Sanhedrin were seeking testimony against Jesus to put Him to death, but they did not find any.
56 UDB कारण अनेक लोकांनी जरी त्याच्याविरुद्ध खोटे बोलले असले तरीही त्यांचे ते बोलणे ऐकमेकांसोबत विसंगत होते. BSB BSB: For many bore false witness against Jesus, but their testimony was inconsistent.
57 UDB शेवटी काही लोक उभे राहिले आणि त्यांनी त्याच्यावर खोटे आरोप केले व असे म्हणाले, BSB BSB: Then some men stood up and testified falsely against Him:
58 UDB “तो बोलत असतांना आम्ही त्याला असे म्हणतांना ऐकले आहे, “मनुष्यांनी बनवलेले हे मंदिर मी तोडून टाकेन आणि कोणाची ही मदत न घेता मी दुसरे एक मंदिर केवळ तीन दिवसात पुन्हा एकदा उभारेन.” BSB BSB: “We heard Him say, ‘I will destroy this man-made temple, and in three days I will build another that is made without hands.’”
59 UDB परंतु यांच्यापैकी काही लोक जे काही बोलत होते त्यांच्याशी इतर लोक सहमत नव्हते. BSB BSB: But even their testimony was inconsistent.
62 UDB येशू म्हणाला, “मी आहे. आणखी तुम्ही मनुष्याच्या पुत्राला मला देवाच्या सोबत जो सर्वशक्तीमान आहे, त्याच्या सोबत राज्य करतांना पाहाल. आकाशातील ढगांवर बसून मी उतरत असतांना देखील तुम्ही मला पाहाल!” BSB BSB: “I am,” said Jesus, “and you will see the Son of Man sitting at the right hand of Power and coming with the clouds of heaven.”
63 UDB येशूचे हे शब्द ऐकल्यावर मुख्य याजक इतका आश्चर्यचकीत झाला की त्याने आपली बाह्य वस्त्रे फाडली. आणि मग तो म्हणाला, “ह्या मनुष्याच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी आता आम्हांला आणखी मनुष्याची गरज नाही, BSB BSB: At this, the high priest tore his clothes and declared, “Why do we need any more witnesses?
64 UDB कारण त्याने देवाच्या विरुद्ध काय बोलले हे तुम्ही आताच ऐकले आहे! त्याने देवाविरुद्ध दुष्ट गोष्टी बोलल्या आहेत! म्हणून तुम्ही आता काय निर्णय घेणार?” ते सर्वजण म्हणाले की येशू दोषी आहे आणि त्याला मरण दंडाची शिक्षा व्हावी यास तो पात्र आहे. BSB BSB: You have heard the blasphemy. What is your verdict?” And they all condemned Him as deserving of death.
65 UDB मग त्यांच्यापैकी काही लोक येशूवर थुंकू लागले. त्यांनी त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्याला ते मारू लागले आणि त्यांनी त्याला म्हटले, “जर तू संदेष्टा आहेस तर तुला कोणी मारले ते आम्हांला सांग!” येशूची राखण करणाऱ्या लोकांनी आपल्या हातांनी येशूला मारले. BSB BSB: Then some of them began to spit on Him. They blindfolded Him, struck Him with their fists, and said to Him, “Prophesy!” And the officers received Him with slaps in His face.
66 UDB मुख्य याजकाच्या घराच्या बाहेर अंगणात पेत्र बसलेला असता त्या मुख्य याजकाच्या घरात काम करणारी एक मुलगी त्याच्या जवळ आली. BSB BSB: While Peter was in the courtyard below, one of the servant girls of the high priest came down
67 UDB शेकोटीच्या बाजूला बसून पेत्र शेकत असतांना तिने त्याला निरखून पाहिले. नंतर ती म्हणाली, “नासरेथचा तो मनुष्य येशू ह्याच्या सोबत तू देखील होता!” BSB BSB: and saw him warming himself there. She looked at Peter and said, “You also were with Jesus the Nazarene.”
68 UDB परंतु त्याने ते नाकारले आणि तो म्हणाला, “तू कशाविषयी बोलत आहेस ते मला ठाऊक नाही! त्यापैकी मला काहीही समजत नाही.” मग तो तिथून उठला आणि अंगणाच्या बाहेरील दरवाज्याजवळ जाऊन तो उभा राहिला. BSB BSB: But he denied it. “I do not know or even understand what you are talking about,” he said. Then he went out to the gateway, and the rooster crowed.
69 UDB ती काम करणारी मुलगी पुन्हा एकदा त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला पाहिले व ती आजूबाजूच्या उभ्या असलेल्या लोकांना म्हणाली, “ज्या माणसाला त्यांनी अटक केली आहे त्या मनुष्यासोबत हा पुरुष देखील मी पाहिलेला आहे.” BSB BSB: There the servant girl saw him and again said to those standing nearby, “This man is one of them.”
70 UDB परंतु त्याने पुन्हा एकदा नकार दिला. थोड्या वेळानंतर त्याच्या अवतीभोवती जे लोक उभे होते ते पेत्राला म्हणाले, “तू देखील गालीली या ठिकाणचा आहेस. येशूच्या सोबत जे लोक होते त्यांच्यापैकी तू देखील एक आहेस हे निश्चित खरे आहे.” BSB BSB: But he denied it again. After a little while, those standing nearby said once more to Peter, “Surely you are one of them, for you too are a Galilean.”
71 UDB परंतु तो जर खरे बोलत नसेल तर देव त्याला शिक्षा करो असे तो म्हणू लागला, तो म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात मी त्याला ओळखत नाही!” BSB BSB: But he began to curse and swear, “I do not know this man of whom you speak!”
72 UDB त्याचवेळेस कोंबडा दुसऱ्यांदा आरवला. त्यानंतर येशूने काय म्हटले होते ते पेत्राला आठवले. “कोंबडा दोनदा आरवण्यापूर्वी तू तीन वेळेस मला ओळखण्यास नकार देशील” त्याने येशूचा तीनदा नाकार केला आहे हे त्याला जाणवू लागले आणि तो रडू लागला. BSB BSB: And immediately the rooster crowed a second time. Then Peter remembered the word that Jesus had spoken to him: “Before the rooster crows twice, you will deny Me three times.” And he broke down and wept.