1 UDB सार्दीस शहरातील विश्वासणाऱ्यांचे गट एकत्र येतात त्यांच्या देवदूताला हा संदेश लिही, मी तुला ह्या गोष्टी लिहित आहे. ज्याच्याकडे देवाचे सात आत्मे आणि सात तारे आहेत तो मी आहे. जे काही तू केले आहेस ते सर्व मला ठाऊक आहे. तू जिवंत असल्यासारखा दिसतो परंतु तू मेलेला आहेस. BSB BSB: “To the angel of the church in Sardis write: These are the words of the One who holds the seven spirits of God and the seven stars. I know your deeds; you have a reputation for being alive, yet you are dead.
2 UDB आपल्या या झोपेतून जागा हो. तुझ्याकडे अद्यापही ज्या गोष्टी आहेत त्या सांभाळून ठेव. ज्या गोष्टी सध्या मरणास टेकल्या आहेत त्याही सांभाळून ठेव. तू जे काही करतोस त्यापैकी काहीही समाधानकारक नाही असे माझ्या देवाला वाटते. हे मला ठाऊक आहे म्हणून तू हे करणे अवश्यक आहे. BSB BSB: Wake up and strengthen what remains, which is about to die; for I have found your deeds incomplete in the sight of My God.
3 UDB तू जेव्हा देवाचा संदेश आणि त्याचे सत्य ऐकले व ते स्वीकारले त्या गोष्टींची नेहमी आठवण ठेव. नेहमी त्याचे पालन कर आणि पापमय स्वभावापासून मागे फिर. जसा एखादा चोर लपून छपून येतो तसाच जेव्हा तुला अपेक्षा असणार नाही त्यावेळेस मी तुझ्याकडे येईन. मी तुझा न्याय करण्यासाठी कोणत्या वेळेस येईन ते तुला कधी कळणार नाही. BSB BSB: Remember, then, what you have received and heard. Keep it and repent. If you do not wake up, I will come like a thief, and you will not know the hour when I will come upon you.
4 UDB परंतु सार्दीस शहरामध्ये तुझ्याकडे काही विश्वासणारे असे आहेत जे चुकीचे कार्य करत नाहीत. त्यांनी आपली वस्त्रे मलिन केली नाहीत असे ते आहेत. ते आज माझ्यासोबत राहण्याच्या पात्रतेचे आहेत. म्हणून ते माझ्यासोबत राहतील आणि ते सर्व प्रकारे शुद्ध असतील ज्या लोकांनी शुभ्र पांढरी वस्त्रे घातली आहेत त्यांच्या सारखे ते होतील. BSB BSB: But you do have a few people in Sardis who have not soiled their garments, and because they are worthy, they will walk with Me in white.
5 UDB जे सैतानावर विजय मिळवितात त्यांना मी पांढऱ्या वस्त्रांमध्ये सुशोभीत करेल. ज्या ज्या लोकांना अनंतकाळचे जीवन आहे. त्यांची नावे ज्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहे त्यातून मी ह्या लोकांची नावे कधीही खोडणार नाही. माझ्या स्वर्गीय पित्यासमोर आणि त्याच्या देवदूतां समोर ते माझे आहेत असा मी त्यांचा स्वीकार करेन. BSB BSB: Like them, he who overcomes will be dressed in white. And I will never blot out his name from the Book of Life, but I will confess his name before My Father and His angels.
6 UDB विश्वासणाऱ्यांचे समुह एकत्र येतात त्यांना देवाच्या आत्म्याचा संदेश काय आहे हे समजण्यासाठी देवाच्या आत्म्याचे शब्द प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका. BSB BSB: He who has an ear, let him hear what the Spirit says to the churches.
7 UDB फिलदेल्फिया या शहरामध्ये विश्वासणाऱ्यांचे जे गट एकत्र आलेले आहेत त्यांच्या देवदूतांना तू हा संदेश लिही. मी तुला या गोष्टी सांगत आहे. जो सत्य आणि जो पवित्र तो मी आहे. प्राचीन यरूशलेम शहरांमध्ये लोकांना प्रवेश देण्याचा अधिकार जसा राजा दावीद याच्याकडे होता तसाच माझ्या राज्यात लोकांनी प्रवेश करावा असा अधिकार माझ्याकडे आहे. मी जे दार उघडतो ते कोणाच्यानेही बंद करवत नाही आणि जे दार मी बंद करतो ते कोणाच्यानेही उघडले जाऊ शकत नाही असा मी आहे. BSB BSB: To the angel of the church in Philadelphia write: These are the words of the One who is holy and true, who holds the key of David. What He opens no one can shut, and what He shuts no one can open.
8 UDB तू केलेले सर्व काही मला ठाऊक आहे. मी तुझ्यासाठी दार उघडले आहे आणि ते कोणीही बंद करू शकत नाही याची जाणिव असू दे. जरी तू अल्प शक्तीचा असलास तरी मी जे काही म्हणालो त्याचे पालन केले आहेस हे मला ठाऊक आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवतो याचा तू नाकार केलेला नाहीस. BSB BSB: I know your deeds. Behold, I have placed before you an open door, which no one can shut. I know that you have only a little strength, yet you have kept My word and have not denied My name.
9 UDB काळजी घे. सैतानाचे अनुसरण करण्याऱ्यांसोबत तुम्हापैकी काही लोक भेटतात ह्या विषयी मला जाणिव आहे. ते यहूदी असल्याचा दावा करतात परंतु मला ठाऊक आहे ते खरेखुरे यहूदी नाहीत. ते खोटे बोलत आहेत. त्यांनी तुझ्याकडे यावे असे मी करीन आणि तुझ्या पायांजवळ ते नम्रपणे नमन करतील आणि मी तुझ्यावर प्रीती करतो ह्याची ते स्वीकृती देतील. BSB BSB: As for those who belong to the synagogue of Satan, who claim to be Jews but are liars instead, I will make them come and bow down at your feet, and they will know that I love you.
10 UDB तू माझ्या आज्ञा पाळू नये असा प्रयत्न करणाऱ्यांपासून मी तुझी सुरक्षा करीन कारण तू धैर्याने दुःख सहन करावे अशी मी तुला आज्ञा दिली असता तू माझे आज्ञा पालन केले आहे. संपूर्ण जगातील सर्व लोकांसोबत ते लवकरच असे करणार आहेत. BSB BSB: Because you have kept My command to persevere, I will also keep you from the hour of testing that is about to come upon the whole world, to test those who dwell on the earth.
11 UDB मी लवकर परत येईन. देवाने तुझ्यासाठी राखून ठेवलेले प्रतिफळ तू गमावू नये कोणी कारण बनू नये म्हणून मी तुला जे सांगितले ते करत राहा. BSB BSB: I am coming soon. Hold fast to what you have, so that no one will take your crown.
12 UDB जे सैतानावर विजय मिळवितात त्यांना मी सुरक्षा दिली आहे. माझ्या देवाच्या मंदिरातील खांबांप्रमाणे ते मजबूत होतील आणि तेथे ते सदासर्वकाळ उभे राहतील. ते माझ्या देवाचे आहे असे चिन्ह आणि ते माझे आहेत हेही त्यावरून मी दाखवून देईन. माझ्या देवापासून उतरलेले नवे शहर म्हणजे नवे यरूशलेम हे नाव आणि हे लोक देवाने दिले आहेत असे शब्द मी त्यांच्यावर अंकित करीन. BSB BSB: The one who overcomes I will make a pillar in the temple of My God, and he will never again leave it. Upon him I will write the name of My God, and the name of the city of My God (the new Jerusalem that comes down out of heaven from My God), and My new name.
13 UDB विश्वासणाऱ्यांच्या समुहाच्या मंडळीला देवाचा आत्मा काय म्हणतो हे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे आहे म्हणजे देवाचा संदेश त्यांच्या लक्षात येईल. BSB BSB: He who has an ear, let him hear what the Spirit says to the churches.
14 UDB लावदिकीयाच्या शहरात विश्वासणाऱ्यांचे जे गट एकत्र येतात त्यांच्या देवदूताला हा संदेश लिही. ‘मी तुला या गोष्टींविषयी लिहित आहे. देवाने दिलेले सर्व अभिवचन खात्रीने पूर्ण होतील असे मी सांगतो. मी देवाविषयी खरेपणाने आणि अचूकपणे साक्ष देणारा आहे. देवाने माझ्याद्वारे सर्व गोष्टी निर्माण केल्या. BSB BSB: To the angel of the church in Laodicea write: These are the words of the Amen, the faithful and true Witness, the Originator of God’s creation.
15 UDB तू माझ्यासाठी जे काही केलेस ते सर्व मला ठाऊक आहे; तू माझ्यावर विश्वास ठेवतो याचा नाकार करीत नाहीस परंतु तुझे माझ्यावर जास्त प्रेम ही नाही. जे थंड ही नाही किंवा गरम ही नाही. अशा पाण्यासारखा तू आहेस तू एक तर गरम किंवा थंड असला तर बरे झाले असते असे मला वाटते. BSB BSB: I know your deeds; you are neither cold nor hot. How I wish you were one or the other!
16 UDB तू गरम ही नाहीस आणि थंड ही नाहीस म्हणून मी तुला नाकारतो कोमट पाण्याच्या गुळण्या करून थुंकून टाकावे तसे मी तुला थुंकून देईन. BSB BSB: So because you are lukewarm—neither hot nor cold—I am about to vomit you out of My mouth!
17 UDB तू म्हणाला आहेस ‘मी श्रीमंत झालो आहे आणि मी खूप धन गोळा केले आहे. मला कशाचीही कमतरता नाही! परंतु तुझ्यात असंख्य गोष्टींची कमतरता आहे याची तुला जाणीवही नाही. लाचार गरीब आंधळे नग्न आणि टाकलेल्या अशा लोकांसारखा तू आहेस. BSB BSB: You say, ‘I am rich; I have grown wealthy and need nothing.’ But you do not realize that you are wretched, pitiful, poor, blind, and naked.
18 UDB तो माझ्याकडून जसे काय शुद्ध सोने विकत घ्यावे तसेच तुझ्यात ज्या गोष्टींची कमतरता आहेत त्या गोष्टी तू माझ्याकडून मिळवाव्यात असा मी तुला सल्ला देतो तू जर हे करशील तर तू खरोखर श्रीमंत होशील. तू नग्नतेत आणि लज्जेत राहण्यापेक्षा जर माझ्याकडून शुभ्र वस्त्रे विकत घेशील तर बरे होईल म्हणजे मला तुला नीतिमान करण्यास मदत होईल. तुझ्या आजाराने ग्रस्त डोळ्यांमध्ये घालण्यासाठी तू माझ्याकडून अंजन घ्यावे आणि ते तुझ्या डोळ्यात घालावे असे कर म्हणजे तुला सत्य समजून सांगण्यास मला सोपे जाईल. BSB BSB: I counsel you to buy from Me gold refined by fire so that you may become rich, white garments so that you may be clothed and your shameful nakedness not exposed, and salve to anoint your eyes so that you may see.
19 UDB ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांना मी रागावतो आणि त्यांच्या चुका दुरूस्त करतो म्हणून तू तुझ्या पूर्ण हृदयाने तुझ्या सर्व पापमय स्वभावापासून मागे फिर. BSB BSB: Those I love I rebuke and discipline. Therefore be earnest and repent.
20 UDB तुमच्या दाराच्या जवळ उभा राहून आणि वाट बघत मी दार ठोठावत आहे. हे करून तुमच्यापैकी प्रत्येकाला प्रतिसाद देण्याची मी संधी देत आहे याची जाणिव असू द्या. जो कोणी माझा आवाज ऐकतो माझ्यासाठी दार उघडतो आणि मला आत येण्याचे आमंत्रण देतो त्या प्रत्येकाच्या जवळ मी जाईन आणि मित्र एकमेकांसोबत जसे राहतात तसा मी त्यांच्यासोबत राहिन आणि आम्ही एकत्र भोजन करू. BSB BSB: Behold, I stand at the door and knock. If anyone hears My voice and opens the door, I will come in and dine with him, and he with Me.
22 UDB विश्वासणाऱ्यांच्या गटांच्या समुहाला देवाचा आत्मा काय सांगत आहे हे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे म्हणजे त्यांना देवाचा संदेश समजेल.’’ BSB BSB: He who has an ear, let him hear what the Spirit says to the churches.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.