1 UDB प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला, अशासाठी की त्याच्या कडून आलेले शुभवर्तमान विदीत करावे, ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून, तुम्हा सर्व रोम वासीयांना हे पत्र मी लिहीत आहे. BSB BSB: Paul, a servant of Christ Jesus, called to be an apostle, and set apart for the gospel of God—
2 UDB देवाच्या संदेष्ट्याच्या द्वारे पवित्र शास्त्रात हे पूर्वीच कळवीले होते की येशू ख्रिस्त येणार आहे. BSB BSB: the gospel He promised beforehand through His prophets in the Holy Scriptures,
4 UDB परंतू त्याच्या दैवी स्वभावामुळे तो, देवाचाच पूत्र आहे हे त्याने दाखवले. देवाने, जेव्हा तो मेला असता आपल्या आत्म्याच्याद्वारे त्याला पून्हा जीवंत केले तेव्हाही त्याने हे आपणास दाखवले की तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे. BSB BSB: and who through the Spirit of holiness was declared with power to be the Son of God by His resurrection from the dead: Jesus Christ our Lord.
5 UDB त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्तानेच आम्हांला प्रेषित असे नियूक्त केले आहे. अशासाठी की जे यहूदी नाहीत त्यांना त्याच्याठायी विश्वास करावा आणि त्याच्या आज्ञेचे पालन करावे. BSB BSB: Through Him and on behalf of His name, we received grace and apostleship to call all those among the Gentiles to the obedience that comes from faith.
6 UDB तुम्हीही जे रोममध्ये राहता, देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात. BSB BSB: And you also are among those who are called to belong to Jesus Christ.
7 UDB ज्या लोकांवर देवाने प्रेम केले, व ज्यांना त्याने आपले लोक होण्याकरता बोलाविले, असे जे लोक आहेत त्या सर्वांना मी हे पत्र लिहित आहे. आपला देवा पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति सतत लाभो. BSB BSB: To all in Rome who are loved by God and called to be saints: Grace and peace to you from God our Father and the Lord Jesus Christ.
8 UDB सुरुवातीलाच रोममध्ये राहणाऱ्या तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण त्याने जे काही आम्हासाठी केले त्याच्याचद्वारे मी असे करू शकतो. मी आणखी त्याचे आभार मानतो कारण तुमचा विश्वास रोम साम्राज्यात सगळीकडे जाहीर होत आहे. BSB BSB: First, I thank my God through Jesus Christ for all of you, because your faith is being proclaimed all over the world.
9 UDB कारण पाहा, ज्या देवाची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता लोकांना सांगून करतो, तोच माझ्याविषयी साक्षी आहे की, मी तुमची नेहमी प्रार्थनेत आठवण करतो. BSB BSB: God, whom I serve with my spirit in preaching the gospel of His Son, is my witness how constantly I remember you
10 UDB माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हांला भेटता येणे शक्य व्हावे. BSB BSB: in my prayers at all times, asking that now at last by God’s will I may succeed in coming to you.
11 UDB मला तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे. यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि विश्वासात, ख्रिस्ताला आदर देण्यात तुम्ही अधिकाधिक वाढावे. BSB BSB: For I long to see you so that I may impart to you some spiritual gift to strengthen you,
12 UDB म्हणजे मला हे सांगायचे आहे की, आम्ही येशूवर कसा विश्वास केला, हे सांगण्याद्वारे आपण ऐकमेकांना विश्वासामध्ये प्रोत्साहन देऊ या. BSB BSB: that is, that you and I may be mutually encouraged by each other’s faith.
13 UDB बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हांला भेट देण्याची मला इच्छा झाली. यासाठी की, जे यहूदीतर तुमच्यामध्ये आहेत, त्यांनी येशूच्याठायी विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे तुमच्यामध्येसुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हांला माहीत असावे. BSB BSB: I do not want you to be unaware, brothers, how often I planned to come to you (but have been prevented from visiting until now), in order that I might have a harvest among you, just as I have had among the other Gentiles.
14 UDB कारण मी सर्व लोकांना जे ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख, सुक्षीत व अशीक्षीत यांना देवाचे शुभवर्तमान सांगने कायद्याने भाग आहे. BSB BSB: I am obligated both to Greeks and non-Greeks, both to the wise and the foolish.
15 UDB त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे. BSB BSB: That is why I am so eager to preach the gospel also to you who are in Rome.
17 UDB या सुवर्तेद्वारे देवाने लोकांना कसे स्वत:जवळ आणले, हे प्रगट केले. पवित्र शास्त्रात फार पूर्वी लिहिल्या प्रमाणे ते आहे की, जे देवाच्याठायी भरवसा ठेवतात, त्यांना तो सर्वकाळासाठी स्वत:जवळ आणणार. BSB BSB: For the gospel reveals the righteousness of God that comes by faith from start to finish, just as it is written: “The righteous will live by faith.”
21 UDB कारण जरी गैरयहूद्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते त्याच्याविषयी मूर्ख गोष्टींचा विचार करत गेले आणि देव स्वत: विषयी त्यांना काय प्रगट करू इछ्चितो त्याविषयी ते नासमज असे झाले. BSB BSB: For although they knew God, they neither glorified Him as God nor gave thanks to Him, but they became futile in their thinking and darkened in their foolish hearts.
22 UDB जरी गर्वाने त्यांनी स्वत:ला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. BSB BSB: Although they claimed to be wise, they became fools,
23 UDB आणि तो सर्वकाळ असणारा व वैभवशाली देव आहे, असे त्यांनी मान्य करण्याचे नाकारले, उलट अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी, यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली. BSB BSB: and exchanged the glory of the immortal God for images of mortal man and birds and animals and reptiles.
24 UDB यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व अनैतीक अशुद्धतेमुळे सोडून दिले, याचा परिणाम असा झाला की त्यांनी एकमेकांच्या देहाला लैंगिक पापांनी विटाळवीले. BSB BSB: Therefore God gave them over in the desires of their hearts to impurity for the dishonoring of their bodies with one another.
26 UDB म्हणून देवाने गैरयहूदी लोकांच्या बळकट इच्छेप्रमाणे त्यांना लज्जास्पद लैंगिक पाप करण्यास मोकळे सोडले, याचा परिणाम असा झाला की त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले. BSB BSB: For this reason God gave them over to dishonorable passions. Even their women exchanged natural relations for unnatural ones.
27 UDB तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले. पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे देवाने त्यांना त्यांच्या शरिरामध्ये व्याधी दिल्या, ज्यांचे ते हकदार होते. BSB BSB: Likewise, the men abandoned natural relations with women and burned with lust for one another. Men committed indecent acts with other men and received in themselves the due penalty for their error.
28 UDB आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली. याचा परिणाम असा झाला की त्यांनी असे वाईट पाप करण्यास सूरू केले जे कोणी आतापर्यंत केले नसेल. BSB BSB: Furthermore, since they did not see fit to acknowledge God, He gave them up to a depraved mind, to do what ought not to be done.
29 UDB ते सर्व प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धि अशा इच्छांनी भरलेले होते व दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करणारे आणि दुसऱ्यांना हानी पोहचवणारे अशी इच्छा ते करत होते. BSB BSB: They have become filled with every kind of wickedness, evil, greed, and depravity. They are full of envy, murder, strife, deceit, and malice. They are gossips,
30 UDB ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, विशेष करून देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच BSB BSB: slanderers, God-haters, insolent, arrogant, and boastful. They invent new forms of evil; they disobey their parents.
31 UDB पूष्कळांनी असे मूर्खपणाचे कृत्ये केलीत जे देवाचा अपमान करणारी होती, ते दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियांबद्दल वात्सल्य नसणारे, दुसऱ्याप्रती दुष्ट वागणूक देणारे असे होते. BSB BSB: They are senseless, faithless, heartless, merciless.
32 UDB जरी देवाच्या नितिमत्वाचा नियम सांगतो की, जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत, असे त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करत गेले आणि इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देत गेले. BSB BSB: Although they know God’s righteous decree that those who do such things are worthy of death, they not only continue to do these things, but also approve of those who practice them.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.