1 UDB पाहा, जे लोक सतत पापाच्या गोष्टी करतात, त्यांना तो कठोर अशी शिक्षा करणार आहे, कारण त्याने हे स्पष्टपणे प्रगट केले आहे की तो त्यांच्यावर क्रोधीत झाला आहे. म्हणून देव जेव्हा लोकांचा न्याय करणार, तेव्हा माझ्या यहूदी मित्रा आपल्याला सबब नाही. तू जर असे म्हणशील की जे गैरयहूदी आहेत त्यांनाच त्यांच्या वाइट कृत्यांचे फळ मिळणार, परंतू तुमच्यातील जर कोणी असे बोलतो तर, देवाने तुम्हास शिक्षा करावी यासाठी तुम्ही बोलत आहात. कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वत:लाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तू ही तीच गोष्ट करतोस. BSB BSB: You, therefore, have no excuse, you who pass judgment on another. For on whatever grounds you judge the other, you are condemning yourself, because you who pass judgment do the same things.
2 UDB आता आपणांला माहीत आहे की, जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो. आणि देवाचा न्याय योग्य असतो. BSB BSB: And we know that God’s judgment against those who do such things is based on truth.
3 UDB यास्तव तुम्हीसुद्धा जे अशा वाईट गोष्टी करता, आणि जे इतरांचा न्याय करता, पण तुम्हीसुद्धा त्याच गोष्टी करता. म्हणून निश्चितपणे तुम्हांला माहीत आहे की, देव तुमचा न्याय करील आणि स्वत:ची सुटका करुन घेणे तुम्हांला शक्य होणार नाही. BSB BSB: So when you, O man, pass judgment on others, yet do the same things, do you think you will escape God’s judgment?
4 UDB आणि तुम्ही असेही म्हणायला नको की, देव आमच्याशी अत्यंत दयाळूपणे आणि सहनशीलतेने वागत आहे, म्हणून मला माझ्या पापांपासून वळण्याची काही गरज नाही. परंतू कदाचित तुम्ही पश्चाताप करावा यासाठी देव तुमच्याशी दयाळूपणे वागत आहे, हे तुम्हास समजले पाहिजे. BSB BSB: Or do you disregard the riches of His kindness, tolerance, and patience, not realizing that God’s kindness leads you to repentance?
5 UDB पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वत:च तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवीत आहात. जेव्हा देव तुम्हाला त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. BSB BSB: But because of your hard and unrepentant heart, you are storing up wrath against yourself for the day of wrath, when God’s righteous judgment will be revealed.
7 UDB नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. कारण देवाने त्यांचा आदर करावा अशी त्यांची इच्छा आहे. BSB BSB: To those who by perseverance in doing good seek glory, honor, and immortality, He will give eternal life.
8 UDB परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात, व अनीतिने चालतात आणि जे वाइट न करण्याचे देवाने सांगितले तेच करतात, त्यांना तो क्रोधाने भरपाई करून देईल. BSB BSB: But for those who are self-seeking and who reject the truth and follow wickedness, there will be wrath and anger.
9 UDB जो जे वाईट ते करतो, त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दु:खे येतील. म्हणजे पहिल्यांदा यहूद्यांवर ज्यांनी देवाच्या वचनावर विश्वास केला नाही, कारण देवाने त्यांना त्याचे लोक होण्यास बोलावले होते व नंतर गैरयहूदी लोकांवर संकटे येतील. BSB BSB: There will be trouble and distress for every human being who does evil, first for the Jew, then for the Greek;
10 UDB परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांति मिळेल, प्रथम यहूद्यांना ज्यांना देवाने त्याचे होण्यास बोलावले व मग गैरयहूदी लोकांना मिळेल. BSB BSB: but glory, honor, and peace for everyone who does good, first for the Jew, then for the Greek.
11 UDB देवाजवळ पक्षपात नाही, त्याच्याजवळ कोणताही व्यक्ती असा महत्वाचा नाही, त्याला सर्वजन सारखेच आहेत. BSB BSB: For God does not show favoritism.
12 UDB परंतू जे सर्व गैरयहूदी देवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात, ते देवापासून सर्वकळसाठी विभक्त केले जातील आणि जितक्यांनी यहूदी असता देवाने मोशेद्वारे दिलेल्या नियम शास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल. BSB BSB: All who sin apart from the law will also perish apart from the law, and all who sin under the law will be judged by the law.
13 UDB कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नितिमान आहेत असे नाही. परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे करतात ते देवाच्या नजरेत नीतिमान ठरतील. BSB BSB: For it is not the hearers of the law who are righteous before God, but it is the doers of the law who will be declared righteous.
15 UDB म्हणजे ते त्यांच्या ह्दयात नियमशास्त्र लिहिले आहे, असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात. BSB BSB: So they show that the work of the law is written on their hearts, their consciences also bearing witness, and their thoughts either accusing or defending them
16 UDB देव त्यांना त्यांच्या कृत्यांप्रमाणे म्हणजेच त्यांनी जे विचारात आणले आणि ते करण्याद्वारे न्याय करणार आहे. त्यांनी लपून केलेल्या कृत्यांबद्दलही तो त्यांचा न्याय करणार आहे. आणि ख्रिस्त त्यांच्यावर न्यायाधीश असा तो नेमून देणार आहे, तोच त्यांना परखून त्यांचा न्याय करणार. माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील. BSB BSB: on the day when God will judge men’s secrets through Christ Jesus, as proclaimed by my gospel.
17 UDB परंतु आता तुम्ही जे स्वत:ला यहूदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, BSB BSB: Now you, if you call yourself a Jew; if you rely on the law and boast in God;
18 UDB त्या तुम्हांस देवाची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही शिकवता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे. BSB BSB: if you know His will and approve of what is superior because you are instructed by the law;
19 UDB तुम्हाला याची खात्री आहे की जे गैरयहूदी आहेत त्यांना योग्य मार्ग माहित नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात आणि त्याद्वारे तुम्ही ज्यांना देवाबद्दल काहीच माहीत नाही अशांना देवाबद्दल मार्गदर्शन करतात. BSB BSB: if you are convinced that you are a guide for the blind, a light for those in darkness,
20 UDB तुम्हाला याची खात्री आहे की जे देवाबद्दल मुर्खतेच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि जे ज्यांना देवाबद्दल काहीच माहीत नाही अशा बालकांसारखे असणाऱ्यांचे तुम्ही मार्गदर्शन करू शकता. कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे. BSB BSB: an instructor of the foolish, a teacher of infants, because you have in the law the embodiment of knowledge and truth—
21 UDB मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता आणि ह्या गोष्टी असल्याचा दावा करता, ते तुम्ही स्वत:ला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश लोकांना करता पण तुम्ही स्वत: चोरी का करता? BSB BSB: you, then, who teach others, do you not teach yourself? You who preach against stealing, do you steal?
22 UDB तुम्ही जे अविवाहित त्यांना व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही जे दुसऱ्यांना मूर्तीपूजा करण्यास मनाई करता, ते तुम्हीच ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून दुर जात नाही. BSB BSB: You who forbid adultery, do you commit adultery? You who abhor idols, do you rob temples?
23 UDB तुम्ही जे नियमशास्त्राविषयी बढाई मारता की, आमच्याकडे देवाचा नियम आहे, त्याच नियमांचे तुम्ही पालन करत नाही. याचा परिणाम असा होतो की तुम्हीच देवाचा अपमान करता. BSB BSB: You who boast in the law, do you dishonor God by breaking the law?
24 UDB शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुम्ही आपल्या वाडवडीलांप्रमाणे नसावे, जे तुम्ही यहूदी आहात, तुमच्यामुळे गैरयहूदी लोक देवाला वाईट असे बोलतात, कारण तुमची कृत्ये तशी आहेत. ‘विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.” जे गैरयहूदी आहेत ते असे म्हणतात, कदाचित ह्यांचा देव ढोंगी असावा कारण ह्यांच्या अशा वागण्याने तो त्यांना शिक्षाहि करत नाही. BSB BSB: As it is written: “God’s name is blasphemed among the Gentiles because of you.”
25 UDB तुम्ही जर नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे कारण तसे करण्याने तो देवाने मोशेला दिलेले नियम पाळतो. पण जर तुम्ही जे सुंता झालेले असूनही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झालेल्यांपेक्षाही अधिक वाईट आहा. BSB BSB: Circumcision has value if you observe the law, but if you break the law, your circumcision has become uncircumcision.
26 UDB याचा अर्थ असा की, सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर तो देखील देवाच्या लोकांतील एक असा बनतो. जरी त्याची सुंता झालेली नसेल. BSB BSB: If a man who is not circumcised keeps the requirements of the law, will not his uncircumcision be regarded as circumcision?
27 UDB ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही परंतू तो जर नियमशास्त्र पूर्णपणे पाळत असेल तर, तुम्हांला शिक्षा केल्याने देव दाखवून देईल की तो जे काही करतो ते चांगल्यासाठी करतो. कारण जे तुम्ही सुंता झालेले आहा, तेच तुम्ही नियमशास्त्र मोडता. BSB BSB: The one who is physically uncircumcised yet keeps the law will condemn you who, even though you have the written code and circumcision, are a lawbreaker.
28 UDB कारण देवाच्या विधी करण्याद्वारे कोणी खरोखर यहूदी होत नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता केल्याने ही देव त्याला मान्य करिल असे ही नाही. BSB BSB: A man is not a Jew because he is one outwardly, nor is circumcision only outward and physical.
29 UDB याउलट आपण ज्यांचे देवाने अंत:करण पालटले, ते आपण यहूदी आहोत. देवाने आपल्याला त्याच्या विधी पाळण्याने नव्हे, तर आपण देवाच्या आत्म्याला आपला स्वभाव बदलण्यास परवानगी दिल्याने आपला स्विकार केला. जरी इतर लोक आपली स्तुती करत नसतील, तरी देव आपली प्रशंसा करेल. BSB BSB: No, a man is a Jew because he is one inwardly, and circumcision is a matter of the heart, by the Spirit, not by the written code. Such a man’s praise does not come from men, but from God.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.