1 ULB नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, BSB BSB: Then Job answered:
2 ULB “या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात. BSB BSB: “I have heard many things like these; miserable comforters are you all.
3 ULB तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता? BSB BSB: Is there no end to your long-winded speeches? What provokes you to continue testifying?
4 ULB जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो. BSB BSB: I could also speak like you if you were in my place; I could heap up words against you and shake my head at you.
5 ULB अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता. आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते. BSB BSB: But I would encourage you with my mouth, and the consolation of my lips would bring relief.
6 ULB परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार? BSB BSB: Even if I speak, my pain is not relieved, and if I hold back, how will it go away?
7 ULB खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस. BSB BSB: Surely He has now exhausted me; You have devastated all my family.
8 ULB तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते. BSB BSB: You have bound me, and it has become a witness; my frailty rises up and testifies against me.
9 ULB देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात. BSB BSB: His anger has torn me and opposed me; He gnashes His teeth at me. My adversary pierces me with His eyes.
10 ULB लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात. BSB BSB: They open their mouths against me and strike my cheeks with contempt; they join together against me.
11 ULB देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे. BSB BSB: God has delivered me to unjust men; He has thrown me to the clutches of the wicked.
12 ULB मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला. BSB BSB: I was at ease, but He shattered me; He seized me by the neck and crushed me. He has set me up as His target;
13 ULB त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या कंबरेत बाण सोडतो तो दया दाखवीत नाही. तो माझे पित्ताशय धरतीवर रिकामे करतो. BSB BSB: His archers surround me. He pierces my kidneys without mercy and spills my gall on the ground.
14 ULB देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो. BSB BSB: He breaks me with wound upon wound; He rushes me like a mighty warrior.
15 ULB मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते. BSB BSB: I have sewn sackcloth over my skin; I have buried my horn in the dust.
16 ULB रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या पापण्यांवर मरणाची छाया आहे. BSB BSB: My face is red with weeping, and deep shadows ring my eyes;
17 ULB तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही, आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले. BSB BSB: yet my hands are free of violence and my prayer is pure.
18 ULB हे धरती, माझे रक्त लपवू नकोस. माझ्या रडण्याला विश्रांतीस्थान देऊ नकोस. BSB BSB: O earth, do not cover my blood; may my cry for help never be laid to rest.
19 ULB स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. जो माझी त्या सर्वसमर्थासमोर हमी घेईल. BSB BSB: Even now my witness is in heaven, and my advocate is on high.
20 ULB माझे मित्र माझा उपहास करतात, पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात. BSB BSB: My friends are my scoffers as my eyes pour out tears to God.
21 ULB जशी एखादी व्यक्ति आपल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो. BSB BSB: Oh, that a man might plead with God as he pleads with his neighbor!
22 ULB जेव्हा काही वर्ष जातील, तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.” BSB BSB: For when only a few years are past I will go the way of no return.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.