1 ULB ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे. BSB BSB: Better a poor man who walks with integrity than a fool whose lips are perverse.
2 ULB ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो. BSB BSB: Even zeal is no good without knowledge, and he who hurries his footsteps misses the mark.
3 ULB मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते. BSB BSB: A man’s own folly subverts his way, yet his heart rages against the LORD.
4 ULB संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात. BSB BSB: Wealth attracts many friends, but a poor man is deserted by his friend.
5 ULB खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही. BSB BSB: A false witness will not go unpunished, and one who utters lies will not escape.
6 ULB उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात; आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे. BSB BSB: Many seek the favor of the prince, and everyone is a friend of the gift giver.
7 ULB गरीब मनुष्याचे सर्व बंधु त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात. BSB BSB: All the brothers of a poor man hate him—how much more do his friends avoid him! He may pursue them with pleading, but they are nowhere to be found.
8 ULB जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल. BSB BSB: He who acquires wisdom loves himself; one who safeguards understanding will find success.
9 ULB खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल. BSB BSB: A false witness will not go unpunished, and one who pours out lies will perish.
10 ULB मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते. BSB BSB: Luxury is unseemly for a fool—how much worse for a slave to rule over princes!
11 ULB बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे. BSB BSB: A man’s insight gives him patience, and his virtue is to overlook an offense.
12 ULB राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे. BSB BSB: A king’s rage is like the roar of a lion, but his favor is like dew on the grass.
13 ULB मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. BSB BSB: A foolish son is his father’s ruin, and a quarrelsome wife is like a constant dripping.
14 ULB घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे. BSB BSB: Houses and wealth are inherited from fathers, but a prudent wife is from the LORD.
15 ULB आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो. BSB BSB: Laziness brings on deep sleep, and an idle soul will suffer hunger.
16 ULB जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल. BSB BSB: He who keeps a commandment preserves his soul, but he who is careless in his ways will die.
17 ULB जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील. BSB BSB: Kindness to the poor is a loan to the LORD, and He will repay the lender.
18 ULB काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको. BSB BSB: Discipline your son, for in that there is hope; do not be party to his death.
19 ULB रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे; जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल. BSB BSB: A man of great anger must pay the penalty; if you rescue him, you will have to do so again.
20 ULB सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील. BSB BSB: Listen to counsel and accept discipline, that you may be wise the rest of your days.
21 ULB मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील. BSB BSB: Many plans are in a man’s heart, but the purpose of the LORD will prevail.
22 ULB प्रामाणिकपणा हि मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला. BSB BSB: The desire of a man is loving devotion; better to be poor than a liar.
23 ULB परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही. BSB BSB: The fear of the LORD leads to life, that one may rest content, without visitation from harm.
24 ULB आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही. BSB BSB: The slacker buries his hand in the dish; he will not even bring it back to his mouth.
25 ULB निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल. BSB BSB: Strike a mocker, and the simple will beware; rebuke the discerning man, and he will gain knowledge.
26 ULB जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे. BSB BSB: He who assaults his father or evicts his mother is a son who brings shame and disgrace.
27 ULB माझ्या मुला, जर तू सुचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील. BSB BSB: If you cease to hear instruction, my son, you will stray from the words of knowledge.
28 ULB भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते. BSB BSB: A corrupt witness mocks justice, and a wicked mouth swallows iniquity.
29 ULB निंदकासाठी धिक्कार आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत. BSB BSB: Judgments are prepared for mockers, and beatings for the backs of fools.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.