1 ULB माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले, BSB BSB: My son, if you have put up security for your neighbor, if you have struck hands in pledge with a stranger,
2 ULB तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस. BSB BSB: if you have been trapped by the words of your lips, ensnared by the words of your mouth,
3 ULB ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर, कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर. BSB BSB: then do this, my son, to free yourself, for you have fallen into your neighbor’s hands: Go, humble yourself, and press your plea with your neighbor.
4 ULB तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको. BSB BSB: Allow no sleep to your eyes or slumber to your eyelids.
5 ULB शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव. BSB BSB: Free yourself, like a gazelle from the hand of the hunter, like a bird from the snare of the fowler.
6 ULB अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो. BSB BSB: Walk in the manner of the ant, O slacker; observe its ways and become wise.
7 ULB तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही. BSB BSB: Without a commander, without an overseer or ruler,
8 ULB तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते. BSB BSB: it prepares its provisions in summer; it gathers its food at harvest.
9 ULB अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? BSB BSB: How long will you lie there, O slacker? When will you get up from your sleep?
10 ULB “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.” BSB BSB: A little sleep, a little slumber, a little folding of the hands to rest,
11 ULB असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल. BSB BSB: and poverty will come upon you like a robber, and need like a bandit.
12 ULB दुर्जन व वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो, BSB BSB: A worthless person, a wicked man, walks with a perverse mouth,
13 ULB त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो, आणि आपल्या बोटांनी खुणा करतो. BSB BSB: winking his eyes, speaking with his feet, and pointing with his fingers.
14 ULB त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; तो नेहमी वैमनस्य पसरतो. BSB BSB: With deceit in his heart he devises evil; he continually sows discord.
15 ULB यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल; कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल. BSB BSB: Therefore calamity will come upon him suddenly; in an instant he will be shattered beyond recovery.
16 ULB परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः BSB BSB: There are six things that the LORD hates, seven that are detestable to Him:
17 ULB गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात, BSB BSB: haughty eyes, a lying tongue, hands that shed innocent blood,
18 ULB मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात, BSB BSB: a heart that devises wicked schemes, feet that run swiftly to evil,
19 ULB लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत. BSB BSB: a false witness who gives false testimony, and one who stirs up discord among brothers.
20 ULB माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस. BSB BSB: My son, keep your father’s commandment, and do not forsake your mother’s teaching.
21 ULB ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर; ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. BSB BSB: Bind them always upon your heart; tie them around your neck.
22 ULB जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल. BSB BSB: When you walk, they will guide you; when you lie down, they will watch over you; when you awake, they will speak to you.
23 ULB कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे. BSB BSB: For this commandment is a lamp, this teaching is a light, and the reproofs of discipline are the way to life,
24 ULB ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते. BSB BSB: to keep you from the evil woman, from the smooth tongue of the adulteress.
25 ULB तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो. BSB BSB: Do not lust in your heart for her beauty or let her captivate you with her eyes.
26 ULB वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल. BSB BSB: For the levy of the prostitute is poverty, and the adulteress preys upon your very life.
27 ULB मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय? BSB BSB: Can a man embrace fire and his clothes not be burned?
28 ULB जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय? BSB BSB: Can a man walk on hot coals without scorching his feet?
29 ULB जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे; जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. BSB BSB: So is he who sleeps with another man’s wife; no one who touches her will go unpunished.
30 ULB जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली. BSB BSB: Men do not despise the thief if he steals to satisfy his hunger.
31 ULB पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल. BSB BSB: Yet if caught, he must pay sevenfold; he must give up all the wealth of his house.
32 ULB जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे; जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो. BSB BSB: He who commits adultery lacks judgment; whoever does so destroys himself.
33 ULB जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही. BSB BSB: Wounds and dishonor will befall him, and his reproach will never be wiped away.
34 ULB कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते; सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही. BSB BSB: For jealousy enrages a husband, and he will show no mercy in the day of vengeance.
35 ULB तो काही खंडणी स्वीकारणार नाही, आणि त्यास बहुत दाने दिली तरी तो शांत राहणार नाही. BSB BSB: He will not be appeased by any ransom, or persuaded by lavish gifts.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.