1 ULB माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव, आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. BSB BSB: My son, keep my words and treasure my commandments within you.
2 ULB माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा, आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप. BSB BSB: Keep my commandments and live; guard my teachings as the apple of your eye.
3 ULB ती आपल्या बोटांस बांध; ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव. BSB BSB: Tie them to your fingers; write them on the tablet of your heart.
4 ULB “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण, BSB BSB: Say to wisdom, “You are my sister,” and call understanding your kinsman,
5 ULB अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून, ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील. BSB BSB: that they may keep you from the adulteress, from the stranger with seductive words.
6 ULB माझ्या घराच्या खिडकीजवळील जाळ्यातून मी बाहेर पाहिले; BSB BSB: For at the window of my house I looked through the lattice.
7 ULB आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता. BSB BSB: I saw among the simple, I noticed among the youths, a young man lacking judgment,
8 ULB तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे, BSB BSB: crossing the street near her corner, strolling down the road to her house,
9 ULB त्या दिवशी संध्याकाळी संधिप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला. BSB BSB: at twilight, as the day was fading into the dark of the night.
10 ULB आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते. BSB BSB: Then a woman came out to meet him, with the attire of a harlot and cunning of heart.
11 ULB ती वाचाळ व स्वच्छंदी असून, तिचे पाय घरी राहत नाही; BSB BSB: She is loud and defiant; her feet do not remain at home.
12 ULB कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते. BSB BSB: Now in the street, now in the squares, she lurks at every corner.
13 ULB मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली; निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली, BSB BSB: She seizes him and kisses him; she brazenly says to him:
14 ULB “आज मी माझी शांत्यर्पणे केली; मी आपले नवस फेडले, BSB BSB: “I have made my peace offerings; today I have paid my vows.
15 ULB ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस. BSB BSB: So I came out to meet you; I sought you, and I have found you.
16 ULB मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे. BSB BSB: I have decked my bed with coverings, with colored linen from Egypt.
17 ULB मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे. BSB BSB: I have perfumed my bed with myrrh, with aloes, and with cinnamon.
18 ULB ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ. BSB BSB: Come, let us take our fill of love till morning. Let us delight in loving caresses!
19 ULB माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे. BSB BSB: For my husband is not at home; he has gone on a long journey.
20 ULB त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे; तो पौर्णिमेच्या दिवशी परत घरी येईल.” BSB BSB: He took with him a bag of money and will not return till the moon is full.”
21 ULB तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले; आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली. BSB BSB: With her great persuasion she entices him; with her flattering lips she lures him.
22 ULB तो तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो, BSB BSB: He follows her on impulse, like an ox going to the slaughter, like a deer bounding into a trap,
23 ULB जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो, तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही, किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो. BSB BSB: until an arrow pierces his liver, like a bird darting into a snare—not knowing it will cost him his life.
24 ULB आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. BSB BSB: Now, my sons, listen to me, and attend to the words of my mouth.
25 ULB तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस; तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस. BSB BSB: Do not let your heart turn aside to her ways; do not stray into her paths.
26 ULB कारण तिने पुष्कळांना घायाळ करून पाडले आहे, त्यांची संख्या मोजू शकत नाही. BSB BSB: For she has brought many down to death; her slain are many in number.
27 ULB तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे; तो मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरून जातो. BSB BSB: Her house is the road to Sheol, descending to the chambers of death.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.