1 ULB परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या. BSB BSB: Give thanks to the LORD, call upon His name; make known His deeds among the nations.
2 ULB त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला; BSB BSB: Sing to Him, sing praises to Him; tell of all His wonders.
3 ULB त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो. BSB BSB: Glory in His holy name; let the hearts of those who seek the LORD rejoice.
4 ULB परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या. BSB BSB: Seek out the LORD and His strength; seek His face always.
5 ULB त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. BSB BSB: Remember the wonders He has done, His marvels, and the judgments He has pronounced,
6 ULB तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो, BSB BSB: O offspring of His servant Abraham, O sons of Jacob, His chosen ones.
7 ULB तो परमेश्वर आपला देव आहे. त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत. BSB BSB: He is the LORD our God; His judgments carry throughout the earth.
8 ULB तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो. BSB BSB: He remembers His covenant forever, the word He ordained for a thousand generations—
9 ULB त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली. BSB BSB: the covenant He made with Abraham, and the oath He swore to Isaac.
10 ULB ही त्याने याकोबासाठी नियम, आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला. BSB BSB: He confirmed it to Jacob as a decree, to Israel as an everlasting covenant:
11 ULB तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुझा वतनभाग असा म्हणून देईन.” BSB BSB: “I will give you the land of Canaan as the portion of your inheritance.”
12 ULB हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, होय फार थोडे, आणि देशात परके होते. BSB BSB: When they were few in number, few indeed, and strangers in the land,
13 ULB ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले. BSB BSB: they wandered from nation to nation, from one kingdom to another.
14 ULB त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली. BSB BSB: He let no man oppress them; He rebuked kings on their behalf:
15 ULB तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका. BSB BSB: “Do not touch My anointed ones! Do no harm to My prophets!”
16 ULB त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला. BSB BSB: He called down famine on the land and cut off all their supplies of food.
17 ULB त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; योसेफ गुलाम म्हणून विकला गेला. BSB BSB: He sent a man before them—Joseph, sold as a slave.
18 ULB त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या. BSB BSB: They bruised his feet with shackles and placed his neck in irons,
19 ULB त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले. BSB BSB: until his prediction came true and the word of the LORD proved him right.
20 ULB तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले. BSB BSB: The king sent and released him; the ruler of peoples set him free.
21 ULB त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले, BSB BSB: He made him master of his household, ruler over all his substance,
22 ULB अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे. BSB BSB: to instruct his princes as he pleased and teach his elders wisdom.
23 ULB नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला. BSB BSB: Then Israel entered Egypt; Jacob dwelt in the land of Ham.
24 ULB देवाने आपले लोक फारच वाढवले, आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले. BSB BSB: And the LORD made His people very fruitful, more numerous than their foes,
25 ULB आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले. BSB BSB: whose hearts He turned to hate His people, to conspire against His servants.
26 ULB त्याने आपला सेवक मोशे आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले. BSB BSB: He sent Moses His servant, and Aaron, whom He had chosen.
27 ULB त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली. BSB BSB: They performed His miraculous signs among them, and wonders in the land of Ham.
28 ULB त्याने त्या देशात काळोख केला, पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही. BSB BSB: He sent darkness, and it became dark—yet they defied His words.
29 ULB त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले आणि त्यांचे मासे मरण पावले. BSB BSB: He turned their waters to blood and caused their fish to die.
30 ULB त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, त्यांच्या अधिपतींच्या खोलितदेखील बेडूक होते. BSB BSB: Their land teemed with frogs, even in their royal chambers.
31 ULB तो बोलला, आणि गोमाशा व उवा त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या. BSB BSB: He spoke, and insects swarmed—gnats throughout their country.
32 ULB त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला. BSB BSB: He gave them hail for rain, with lightning throughout their land.
33 ULB त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली. BSB BSB: He struck their vines and fig trees and shattered the trees of their country.
34 ULB तो बोलला आणि टोळ आले. असंख्य नाकतोडे आले. BSB BSB: He spoke, and the locusts came—young locusts without number.
35 ULB टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले; BSB BSB: They devoured every plant in their land and consumed the produce of their soil.
36 ULB त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले. BSB BSB: Then He struck all the firstborn in their land, the firstfruits of all their vigor.
37 ULB त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही. BSB BSB: He brought Israel out with silver and gold, and none among His tribes stumbled.
38 ULB ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती. BSB BSB: Egypt was glad when they departed, for the dread of Israel had fallen on them.
39 ULB त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला. BSB BSB: He spread a cloud as a covering and a fire to light up the night.
40 ULB इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले. BSB BSB: They asked, and He brought quail and satisfied them with the bread of heaven.
41 ULB त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले. BSB BSB: He opened a rock, and water gushed out; it flowed like a river in the desert.
42 ULB कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती. BSB BSB: For He remembered His holy promise to Abraham His servant.
43 ULB त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले. BSB BSB: He brought forth His people with rejoicing, His chosen with shouts of joy.
44 ULB त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या. BSB BSB: He gave them the lands of the nations, that they might inherit the fruit of others’ labor,
45 ULB ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम आणि आपले नियमशास्त्र पाळावे. परमेश्वराची स्तुती करा. BSB BSB: that they might keep His statutes and obey His laws. Hallelujah!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.