1 ULB परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या. कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते. BSB BSB: Hallelujah! Give thanks to the LORD, for He is good; His loving devotion endures forever.
2 ULB परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल? किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील? BSB BSB: Who can describe the mighty acts of the LORD or fully proclaim His praise?
3 ULB जे काही योग्य आहे ते करतात आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत. BSB BSB: Blessed are those who uphold justice, who practice righteousness at all times.
4 ULB हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर; तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर. BSB BSB: Remember me, O LORD, in Your favor to Your people; visit me with Your salvation,
5 ULB मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा, तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन, आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन. BSB BSB: that I may see the prosperity of Your chosen ones, and rejoice in the gladness of Your nation, and give glory with Your inheritance.
6 ULB आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले; आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली. BSB BSB: We have sinned like our fathers; we have done wrong and acted wickedly.
7 ULB आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वासनियतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली. BSB BSB: Our fathers in Egypt did not grasp Your wonders or remember Your abundant kindness; but they rebelled by the sea, there at the Red Sea.
8 ULB तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे. BSB BSB: Yet He saved them for the sake of His name, to make His power known.
9 ULB त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला. मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले. BSB BSB: He rebuked the Red Sea, and it dried up; He led them through the depths as through a desert.
10 ULB त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले, आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले. BSB BSB: He saved them from the hand that hated them; He redeemed them from the hand of the enemy.
11 ULB परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले. त्यापैकी एकही जण वाचला नाही. BSB BSB: The waters covered their foes; not one of them remained.
12 ULB नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली. BSB BSB: Then they believed His promises and sang His praise.
13 ULB परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले; त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही. BSB BSB: Yet they soon forgot His works and failed to wait for His counsel.
14 ULB रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली, आणि त्यांनी देवाला आव्हान दिले. BSB BSB: They craved intensely in the wilderness and tested God in the desert.
15 ULB त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले, पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला. BSB BSB: So He granted their request, but sent a wasting disease upon them.
16 ULB त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले. BSB BSB: In the camp they envied Moses, as well as Aaron, the holy one of the LORD.
17 ULB जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले. BSB BSB: The earth opened up and swallowed Dathan; it covered the assembly of Abiram.
18 ULB त्यांच्यात अग्नीने पेट घेतला; अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले. BSB BSB: Then fire blazed through their company; flames consumed the wicked.
19 ULB त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली. BSB BSB: At Horeb they made a calf and worshiped a molten image.
20 ULB त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली. BSB BSB: They exchanged their Glory for the image of a grass-eating ox.
21 ULB ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले, ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती. BSB BSB: They forgot God their Savior, who did great things in Egypt,
22 ULB त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली. BSB BSB: wondrous works in the land of Ham, and awesome deeds by the Red Sea.
23 ULB म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते. BSB BSB: So He said He would destroy them—had not Moses His chosen one stood before Him in the breach to divert His wrath from destroying them.
24 ULB नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही, BSB BSB: They despised the pleasant land; they did not believe His promise.
25 ULB पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली, आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही. BSB BSB: They grumbled in their tents and did not listen to the voice of the LORD.
26 ULB म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात मरू देईन. BSB BSB: So He raised His hand and swore to cast them down in the wilderness,
27 ULB त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन, आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन. BSB BSB: to disperse their offspring among the nations and scatter them throughout the lands.
28 ULB त्यांनी बआल-पौराची पूजा केली, आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले. BSB BSB: They yoked themselves to Baal of Peor and ate sacrifices offered to lifeless gods.
29 ULB त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले, आणि त्यांच्यात मरी पसरली. BSB BSB: So they provoked the LORD to anger with their deeds, and a plague broke out among them.
30 ULB पण फिनहास मध्यस्थी उठला; आणि मरी बंद झाली. BSB BSB: But Phinehas stood and intervened, and the plague was restrained.
31 ULB हे त्यास नितीमत्व असे सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले. BSB BSB: It was credited to him as righteousness for endless generations to come.
32 ULB त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला, आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले. BSB BSB: At the waters of Meribah they angered the LORD, and trouble came to Moses because of them.
33 ULB त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला, आणि तो अविचाराने बोलला. BSB BSB: For they rebelled against His Spirit, and Moses spoke rashly with his lips.
34 ULB परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही. BSB BSB: They did not destroy the peoples as the LORD had commanded them,
35 ULB पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले, व त्यांचे मार्ग शिकले. BSB BSB: but they mingled with the nations and adopted their customs.
36 ULB आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली, ते त्यांच्यासाठी सापळा बनले. BSB BSB: They worshiped their idols, which became a snare to them.
37 ULB त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला. BSB BSB: They sacrificed their sons and their daughters to demons.
38 ULB त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले, त्यांनी आपली मुले आणि मुली, ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला, त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली. BSB BSB: They shed innocent blood—the blood of their sons and daughters, whom they sacrificed to the idols of Canaan, and the land was polluted with blood.
39 ULB ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले, आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले. BSB BSB: They defiled themselves by their actions and prostituted themselves by their deeds.
40 ULB त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला, त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला. BSB BSB: So the anger of the LORD burned against His people, and He abhorred His own inheritance.
41 ULB त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले, आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले. BSB BSB: He delivered them into the hand of the nations, and those who hated them ruled over them.
42 ULB त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले, आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले. BSB BSB: Their enemies oppressed them and subdued them under their hand.
43 ULB अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला, पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले, आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले. BSB BSB: Many times He rescued them, but they were bent on rebellion and sank down in their iniquity.
44 ULB तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली, तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले. BSB BSB: Nevertheless He heard their cry; He took note of their distress.
45 ULB त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली, आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली. BSB BSB: And He remembered His covenant with them, and relented by the abundance of His loving devotion.
46 ULB त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात त्यांच्यावर दया येईल असे केले. BSB BSB: He made them objects of compassion to all who held them captive.
47 ULB हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार. आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर; म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू. BSB BSB: Save us, O LORD our God, and gather us from the nations, that we may give thanks to Your holy name, that we may glory in Your praise.
48 ULB इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर, ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.” परमेश्वराची स्तुती करा. BSB BSB: Blessed be the LORD, the God of Israel, from everlasting to everlasting. Let all the people say, “Amen!” Hallelujah!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.